शैलेश लोढा ‘तारक मेहता…’ च्या निर्मात्यांवर नाराज? म्हणाले- तुम्ही शेवटचं कधी खरं बोलला होतात

मुंबई: ‘तारक मेहता का उल्‍टा चष्मा’ (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) मालिकेत गेल्या १४ वर्षांपासून तारक मेहता ही भूमिका साकारणारे शैलेश लोढा (Shailesh Lodha) यांनी अलविदा केला. त्यांनंतर काही दिवस कार्यक्रमातून तारक मेहता गायब होते. आता कार्यक्रमाच्या निर्मात्यांनी तारक मेहता परत येत असल्याची घोषणा केली. तारक मेहता ही भूमिका छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कलाकार सचिन श्रॉफ साकारणार आहे. या सर्व घडामोडींमध्ये शैलेश लोढे यांची एक पोस्ट चर्चेत आली आहे. त्या पोस्टमध्ये शैलेश यांनी तारक मेहता कार्यक्रमाचे निर्माता असीत कुमार मोदी यांचं नाव घेता त्यांच्यावर टीका केली आहे.

हे वाचा-ते ब्रह्मास्त्र राहू दे, पण हे अस्त्र सगळ्या भारतीयांकडं असतं…हे भन्नाट मीम्स एकदा पाहाच!

शैलेश लोढा यांची पोस्ट

शैलेश लोढा यांनी त्यांच्या पोस्टमध्ये कुणाचंही थेट नाव न घेता बरंच काही सूचक वक्तव्य केली आहेत.भलेही शैलेश यांनी त्यांच्या पोस्टमध्ये जी कविता लिहिली आहे ती सध्याची परिस्थिती पाहता ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या शोचे निर्माते असीत कुमार मोदी यांच्यावर असल्याचं अनेक नेटकऱ्यांनी म्हटलं आहे. या पोस्टमध्ये शैलेश यांनी व्यंगात्म कविता लिहिली आहे.


या कवितेत त्यांनी कोणाचंही नाव घेतलं नसलं तरी त्यांनी या पोस्टद्वारे मालिकेचे निर्माते असीत मोदी यांच्यावर निशाणा साधला असल्याचं मत त्यांच्या चाहत्यांनी व्यक्त केलं आहे.

हे वाचा-रणबीर कपूर अन् कंगनाच नव्हे या बॉलिवूड कलाकारांच्याही आवडीचं आहे Beef!

दरम्यान, तारक मेहता का उल्टा चष्मामध्ये आता सचिन श्रॉफ हा अभिनेता तारक मेहतांची भूमिका साकारणार आहे. अनेक दिवसांपासून तो या मालिकेत एंट्री करणार असल्याच्या बातम्या येत होत्या मात्र आता प्रोमो प्रसिद्ध करून निर्मात्यांनी याची पुष्टी केली आहे. त्यानंतर शैलेश यांनी जी पोस्ट शेअर केली आहे त्यावरून त्यांची नाराज दिसून येत आहे.



Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.
@majhinews1
Next अजय देवगण-सिद्धार्थ मल्होत्राला ‘ते’ दृश्य भोवलं; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

Check Also

‘या’ कारणामुळे हृताला कधीच करायचं नाहीये नवऱ्यासोबत काम

मुंबई, 21  सप्टेंबर : अभिनेत्री हृता दुर्गुळे अवघ्या महाराष्ट्राची क्रश म्हणून ओळखली जाते. हृतासाठी 2022  …

हार्ट अटॅक, ब्रेन डेड आणि मृत्यू; असे होते Raju Srivastav यांचे शेवटचे काही दिवस

मुंबई, 21 सप्टेंबर : आज म्हणजे 21 सप्टेंबरला कॅमेडी किंग राजू श्रीवास्तव यांनी AIIMS रुग्णालयात …