जोडीदाराबरोबर झालाय वाद तर पाठवा असे क्युट मेसेज आणि त्वरीत काढा राग

नेहमी राग बॉयफ्रेंडनेच काढला पाहिजे असं कुठे म्हटलं नाही. एखाद्या वेळी भांडण झाल्यावर गर्लफ्रेंडनेही राग काढावा. भांडणं वाढण्यापेक्षा आपल्या बॉयफ्रेंडला वेळीच पुन्हा शांत करणं हे नातं सांभाळण्यासाठी महत्त्वाचं असतं. पण प्रत्येकवेळी त्याची वाट पाहण्याची गरज नाही. तुम्हीही पुढाकार घेऊन त्याची समजून काढू शकता.

गर्लफ्रेंडने आपल्या बॉयफ्रेंडचा अथवा जोडीदाराचा राग शांत करण्यासाठी क्यूट मेसेज पाठवून राग शांत करावा. कधी कधी रागात बोलण्याने वाद अधिक वाढतात. त्यापेक्षा त्याचा राग शांत करण्यासाठी काही क्युट मेसेजची मदत तुम्ही घेऊ शकता. त्यासाठी तुम्ही आमच्या या लेखाचा नक्कीच आधार घेऊ शकता. (फोटो सौजन्य – Canva)

त्याच्या डोळ्यांची करा प्रशंसा

त्याच्या डोळ्यांची करा प्रशंसा

भांडण झाल्यानंतर सर्वात आधी डोळे बोलतात. शब्द सुचत नाहीत पण त्या डोळ्यातून सर्व काही व्यक्त होत असतं. मग अशावेळी त्याच्या डोळ्यातील प्रेमाबद्दल त्याला जाणीव करून द्या आणि त्याचा राग घालवा.

राग रूसवा काढण्यासाठी शब्द

राग रूसवा काढण्यासाठी शब्द

भांडण झाल्यानंतर प्रत्येकवेळी त्याने तुमच्याकडे यावं असा विचार करू नका. कधीतरी तुम्हीही पुढाकार घ्या आणि त्याला हा राग – रूसवा सोडण्यासाठी दोनच ओळी लिहून पाठवा. त्याचा राग नक्कीच निघून जाईल. थोडेसे रोमँटिक आणि थोडेसे सामंजस्याने नाते जपायला शिका.

हेही वाचा :  पाहूनच जीव गुदमरतो! Titanic पाहण्यासाठी जाणाऱ्या पाणबुड्या आतून असतात तरी कशा? पाहा हा Video

(वाचा – जोडीदाराचा मूड ठेवायचा असेल कायम रोमँटिक तर ही जुनी गाणी तुमच्या लिस्टमध्ये हवीतच )

फक्त तुझ्यासाठी असण्याची भावना

फक्त तुझ्यासाठी असण्याची भावना

प्रत्येकाला वाटते की, आपण ज्याच्यावर प्रेम करतो तो फक्त आपलाच आहे आणि हीच भावना असल्यामुळे हक्काने भांडण होते. पण हीच भावना आपल्याही मनात आहे हे तुम्ही तुमच्या जोडीदाराला जाणवून द्या.

(वाचा – International Women’s Day 2023: आई, बहीण, बायको, मैत्रिणी सकाळीच पाठवा शुभेच्छा संदेश आणि नातं करा अधिक घट्ट)

त्याला पाहण्यासाठी उतावीळ

त्याला पाहण्यासाठी उतावीळ

भांडण झाल्यानंतर काही जणांना एकमेकांशी न बोलण्याची अथवा एकमेकांना न बघण्याची सवय असते. पण असं अजिबात करू नका. तो जर रागावला असेल तर त्याला पाहण्यासाठी आपण किती उतावीळ आहोत याची जाणीव करून द्या. कदाचित हे एखाद्यासाठी चीजी असेल पण तुमच्या जोडीदारासाठी नक्कीच हे शब्द आपलेसे असतील.

(वाचा – आई म्हणून अनुष्काने…विराटच्या डोळ्यात आले पाणी, म्हणाला ती माझी प्रेरणा आहे)

त्याच्यासारखा प्रेमळ कोणीच नाही

त्याच्यासारखा प्रेमळ कोणीच नाही

रागात एकमेकांना काहीही बोलले जाते. रागावर नियंत्रण नसताना त्रास होतो. मात्र डोकं थोडं शांत झाल्यानंतर आपण एकत्र घालवलेले क्षण आठवा आणि त्याच्यासारखा काळजी घेणारा आणि प्रेमळ कोणीच नाही हे आठवल्यानंतर त्याला नक्की मेसेज पाठवा.

हेही वाचा :  Stop! कोणाकडेही 'या' गोष्टी चुकूनही शेअर करू नका... अन्यथा आयुष्यभर पाश्चात्ताप करावा लागेल

तोच आहे सर्वस्व

तोच आहे सर्वस्व

कितीही भांडण झालं तरीही तोच आपलं जग आहे आणि सर्वस्व आहे हे त्याला भांडणानंतर मेसेज पाठवून पुन्हा एकदा जाणवून द्या. त्याच्यासाठीही हा क्षण अधिक प्रेमाचा आणि कायम आठवणीत राहणारा ठरू शकतो. अचानक आलेल्या अशा क्यूट मेसेजमुळे तो राग कुठच्या कुठे विसरून जाईल

त्याच्यासाठी शायरी

त्याच्यासाठी शायरी

कधी कधी प्रेमात शायरी लिहिणंही चांगलं असतं. आजकाल गुगलवर सर्वच उपलब्ध होतं. अशा शायरीचा आधार घेत त्याला आपल्या मनातील भावना कळवल्या तर नक्कीच त्याचा राग शांत होईल.

तुमचाही जोडीदार रागावला असेल तर असे साधे पण त्याचा राग घालवणारे क्यूट मेसेज तुम्ही पाठवा आणि त्वरीत त्यांचा राग काढा.

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Maharastra Politics : मुख्यमंत्र्यांचा मुक्काम, विरोधकांना फुटणार घाम? 15 जागांवर कोण ठरणार सामनावीर?

Maharastra Loksabha Election 2024 : महायुतीच्या जागावाटपात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) लोकसभेच्या तब्बल 15 …

जगातील 50 श्रीमंत शहरांच्या यादीत भारतातील दोन प्रमुख शहरं; Washington DC लाही टाकलं मागे

Worlds 50 Wealthiest Cities: जगातील सर्वात श्रीमंत 50 शहरांची यादी जाहीर करण्यात आली आहे. सर्वाधिक …