लहान मुलांचं आधार बनवण्यासाठी ही कागदपत्र पुरेशी, UIDAI ने जारी केली यादी


आधार कार्ड हे अत्यंत महत्त्वाचे दस्तऐवज आहे. आधार कार्ड भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) द्वारे जारी केले जाते. मुलाला शाळेत प्रवेश देण्यापासून ते विविध सरकारी योजनांतर्गत लाभ मिळवण्यापर्यंत आधार कार्डची मागणी केली जाते. यावरून आधार कार्डचे महत्त्व किती आहे, याचा अंदाज येतो. मुलाकडे आधार नसेल, तर ठराविक वेळेत आधार बनवून घ्या, असे शाळेकडून सांगण्यात येतं. मुलांचं आधार कार्ड कसं तयार होतं, याबाबत पालकांच्या मनात अनेक प्रश्न असतात. मुलाचं आधार कार्ड मिळवण्यासाठी पालकांना कोणत्या अटी पूर्ण कराव्या लागतात? या सर्व प्रश्नांची उत्तरे देत UIDAI ने ट्विट केले आहे. यामध्ये नवताज बालक किंवा पाच वर्षाखालील मुलांचे आधार कार्ड काढण्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत हे सांगितले आहे. त्याबद्दल जाणून घेऊया…

पालकांपैकी एकाचं आधार कार्ड – UIDAI च्या ट्विटनुसार पाच वर्षांखालील मुलांचे आधार बनवण्यासाठी पालकांपैकी एकाकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे. पाच वर्षांखालील मुलांसाठी आधार बनवण्यासाठी तुम्हाला आधार केंद्र किंवा जन सुविधा केंद्राला भेट द्यावी लागेल. जिथे पालकांपैकी एकाचे आधार देऊन मुलाचे आधार कार्ड बनवता येते.

हेही वाचा :  Pregnancy: गर्भधारणेच्या पहिल्या आठवड्यात नेमकं काय होते? जाणून घ्या सुरुवातीची लक्षणं

मुलाच्या जन्म प्रमाणपत्रावरून आधार कार्ड- UIDAI च्या नियमांनुसार मुलाचे आधार कार्ड देखील जन्म प्रमाणपत्रावरून बनवले जाऊ शकते. यासाठी हॉस्पिटल, नगरपालिका किंवा महानगरपालिकेकडून बनवलेले जन्म प्रमाणपत्र मिळवता येते. या मदतीने मुलाचे आधार कार्ड बनवता येते.

हॉस्पिटल डिस्चार्ज स्लिप – प्रसूतीदरम्यान हॉस्पिटलमधून मिळालेल्या डिस्चार्ज स्लिपच्या मदतीने मुलाचे आधार कार्ड देखील बनवले जाऊ शकते. यासाठी तुम्हाला हॉस्पिटलमधून वैध डिस्चार्ज स्लिप घ्यावी लागेल. याद्वारे नवजात बाळाचे आधार कार्ड बनवता येईल.

The post लहान मुलांचं आधार बनवण्यासाठी ही कागदपत्र पुरेशी, UIDAI ने जारी केली यादी appeared first on Loksatta.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Loksabha Election 2024 : मतदान करा अन् बिअर, कॅब राईड मोफत मिळवा; कधीपर्यंत वॅलिड आहेत या ऑफर?

Loksabha Election 2024 : देशभरामध्ये लोकशाहीचा उत्सव अर्थात निवडणुकीच्या पर्वाला सुरुवात झाली असून देशातील सरकार …

महारेराचा बिल्डर लॉबीला दणका; पार्किंचा वाद टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

MAHARERA: बिल्डिंगमध्ये अपुऱ्या जागेच्या अभावी पार्किंग करण्यास अडचणी येतात. हल्ली काही बिल्डर घर खरेदी केल्यानंतरच …