Petrol-Diesel Prices: निवडणूक संपल्यानंतर दुसऱ्याच दिवशी इंधनदरवाढ; पाहा आजचे दर


उत्तर प्रदेशसहीत पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकीच्या मतदानाचा अंतिम टप्पा पार पडल्यानंतर तेल कंपन्यांनी या राज्यांमधील अनेक शहरांतील पेट्रोल-डिझेलच्या किंमतींमध्ये वाढ केलीय. विशेष करुन उत्तर प्रदेशमधील महत्वाच्या शहरांमधील इंधनाचे दर निवडणुकीच्या दुसऱ्याच दिवशी वाढल्याचे दिसत आहेत. विशेष म्हणजे मागील बऱ्याच काळापासून या शहरांमध्ये इंधनाचे दर स्थिर होते.

सरकारी तेल कंपन्यांनी मंगळवारी उत्तर प्रदेशमधील नोएडा, लखनऊबरोबरच बिहारची राजधानी पटना आणि हरियाणामधील गुरुग्राम येथील पेट्रोल तसेच डिझेलच्या दरांमध्ये वाढ केलीय. मुख्य चार शहरांपैकी चेन्नई वगळता इतर तीन म्हणजेच दिल्ली, मुंबई आणि कोलकात्यामध्ये इंधनाचे दर जैसे थे आहेत. या शहरांमधील इंधनाचे दर मागील चार महिन्यांपासून स्थिर आहेत. मुंबईत पेट्रोलचे दर लिटरमागे ११० रुपये इतका आहे. महाराष्ट्रातील जवळजवळ सर्वच शहरांमधील दर मुंबईप्रमाणे पूर्वीसारखेच आहेत.

चार मुख्य शहरांमधील दर खालीलप्रमाणे
दिल्ली – पेट्रोल ९५.४१ रुपये प्रति लिटर, डिझेल ८६.६७ रुपये प्रति लिटर
मुंबई – पेट्रोल १०९.९८ रुपये प्रति लिटर, डिझेल ९४.१४ रुपये प्रति लिटर
चेन्नई – पेट्रोल १०१.५१ रुपये प्रति लिटर, डिझेल ९१.५३ रुपये प्रति लिटर
कोलकत्ता – पेट्रोल १०४.६७ रुपये प्रति लिटर, डिझेल ८९.७९ रुपये प्रति लिटर

हेही वाचा :  करोना संकट संपण्याची चर्चा असतानाच WHO चा इशारा; म्हणाले, “ओमायक्रॉन हा काही शेवटचा…”

या शहरांमध्ये बदलण्यात आले दर
गुरुग्राम – पेट्रोल ९५.६८ रुपये प्रति लिटर, डिझेल ८६.९० रुपये प्रति लिटर
नोएडा – पेट्रोल ९५.६४ रुपये प्रति लिटर, डिझेल ८७.१४ रुपये प्रति लिटर
जयपूर – पेट्रोल १०७.०६ रुपये प्रति लिटर, डिझेल ९०.७० रुपये प्रति लिटर
लखनऊ- पेट्रोल ९५.२९ रुपये प्रति लिटर, डिझेल ९१.४३ रुपये प्रति लिटर
पटना – पेट्रोल १०६.२६ रुपये प्रति लिटर, डिझेल ९१.४३ रुपये प्रति लिटर

जाणून घ्या तुमच्या शहरामधील दर
देशामधील तिन्ही तेल कंपन्या एचपीसीएल, बीपीसीएल आणि आयओसी रोज सकाळी सहा वाजता इंधनाच्या नवीन दरांची घोषणा करतात. या नव्या दरांची माहिती त्यांच्या वेबसाईटवर मिळते. तर दुसरीकडे फोनवरही एसएमएस करुन नवीन दर तपासण्याची सुविधा देण्यात आलीय. 92249 92249 क्रमांकावर एसएमएस पाठवून पेट्रोल डिझेलच्या नवीन दरांबद्दल माहिती मिळवता येते. RSP < स्पेस > पेट्रोल पंप डिलरचा कोड लिहून 92249 92249 वर पाठवावा.

The post Petrol-Diesel Prices: निवडणूक संपल्यानंतर दुसऱ्याच दिवशी इंधनदरवाढ; पाहा आजचे दर appeared first on Loksatta.

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

अंधश्रद्धेचा कळस! अपघातात व्यक्तीचा मृत्यू, 20 वर्षांनी नातेवाईकांची रुग्णालयच्या गेटवर पूजा, कारण काय तर..

Superstition : देश 21 व्या शतकात वावरत आहे, पण अजूनही अंधश्रद्धा मूळापासून नष्ट करण्यात आपण …

‘माझ्याकडे चीप..ईव्हीएम हॅक करतो’ दीड कोटींचा सौदा; धक्कादायक कहाणी

EVM Machine Hack call: देशभरात लोकसभा निवडणुकीसाठी मतदान सुरु आहे.  ईव्हीएम मशिनच्या माध्यमातून हे मतदान …