साधीसुधी दिसत असली तरी फार खास आहे ‘ही’ भारतीय न्यूज अँकर; सत्य समजल्यावर बसेल धक्का

First AI News Anchor: सध्या सोशल मीडियावर आर्टिफिशीएल इंटेलिजन्स म्हणजेच कृत्रिम बुद्धीमत्तेवर आधारित कनसेप्ट बेस फोटोंची चांगलीच चलती आहे. आर्टिफिशीएल इंटेलिजन्स म्हणजेच AI चा वापर हा केवळ फोटोंसाठी केला जात नाही तर या माध्यमातून चक्क एखाद्या खऱ्याखुऱ्या माणसांप्रमाणे दिसणाऱ्या व्यक्तीही साकारता येतात. असाच एक प्रयोग भारतामधील ओडिशा राज्यातील खासगी वृत्तवाहिनीने केला आहे. या वृत्तवाहिनीने चक्क एआय बेस न्यूज अँकरच्या माध्यमातून वृत्तांकन केलं आहे.

फोटोत दिसणारी महिला एआय जनरेटेड आहे

वर फोटोत दिसणारी न्यूज अँकर ही खरीखुरी व्यक्ती नसून एएआय असल्याचं सांगितलं तर तुमचा त्यावर विश्वास बसणार नाही. मात्र ही अँकर इतकी हुबेहूब दिसत आहे की पहिल्यांदा तिला पाहणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला ती एआय जनरेटेड आहे असं वाटणार नाही. कंपनीने जारी केलेल्या माहितीनुसार ओडिशामधील हातमागावर विणलेल्या साडीच्या पेहरावात दिसत असलेली ही महिला अँकर ओटीव्ही नेटवर्कसाठी काम करणार आहे. ही एआय अँकर टीव्ही आणि ऑनलाइन माध्यमांमधून प्रेक्षकांना भेटणार आहे. ही अँकर ओडिया आणि इंग्रजी अशा 2 भाषांमध्ये बातम्या वाचून दाखवणार आहे. 

हेही वाचा :  'या' 43 पैकी एकही App मोबाईलमध्ये असेल तर तात्काळ डिलीट करा! McAfee चा सल्ला

अँकरचं नावही ठेवलं

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार या एआय अँकरला नावही देण्यात आलं आहे. या अँकरला ‘लिजा’ (Lisa) असं नाव देण्यात आलं आहे. ‘लिजा’च्या माध्यमातून ओटीव्ही ओडिया पत्रकारितेमधून पहिल्यांदाच स्थानिक भाषेत एआय न्यूज अँकरचा वापर करणार आहे. ‘लिजा’ अनेक भाषा बोलू शकते असंही कंपनीने म्हटलं आहे.

न अडखळता देऊ शकते बातम्या

रविवारी (9 जुलै 2023 रोजी) पहिल्यांदा ‘लिजा’ला जगासमोर आणण्यात आलं. तिचा व्हिडीओ ट्वीट करताना ओटीव्हीने, “ही आहे लिजा. ओटीव्ही आणि ओडिशामधील पहिली एआय न्यूज अँकर… ती टीव्ही ब्रॉडकास्टींग आणि पत्रकारितेमध्ये क्रांती घडवण्यासाठी सज्ज आहे,” असं म्हटलं आहे. तसेच पुढे, “ओटीव्हीची एएआय न्यूज अँकर लिसामध्ये अनेक भाषा बोलण्याची क्षमता आहे. ती ओडिया भाषेत तसेच इंग्रजीमध्ये अगदी न अडखळता बातम्या देऊ शकते. ती टीव्ही आणि डिजीटल माध्यमावर तुम्हाला पहायला मिळेल,” असंही कंपनीने म्हटलं आहे.

इतरांशी बोलू शकेल इतकं प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न

‘लिसा’ला ओडिया भाषेमध्ये बोलण्याचं प्रशिक्षण देणं फारच कठीण काम होतं. मात्र आम्हाला हे साध्य करता आलं याचं समाधान आहे. आम्ही अजूनही या प्रकल्पावर काम करत आहोत. आम्ही तिला या क्षमतेपर्यंत प्रशिक्षित करण्याच्या विचारात आहोत की न अडखळता तिने समोरच्या व्यक्तींशी संवादही साधला पाहिजे, असं ओटीव्ही डिजीटल बिझनेसच्या प्रमुख लसिता मंगत पांडा यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा :  न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यापूर्वी भारताला मोठा धक्का, स्टार खेळाडू दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

देशभर चर्चेत असलेल्या पोर्श कारची किंमत किती? स्पीड, मायलेज सर्वच जाणून घ्या…

Pune Accident News:  पुण्यातील कल्याणीनगर हिट अँड रन प्रकरणामुळं राज्यात एकच खळबळ उडाली आहे. पोर्श …

सनरुफ, 360-डिग्री कॅमेरा… आणि काय हवं? MG च्या नव्या कारचा फर्स्ट लूक पाहून विचाराल, किंमत किती?

MG Astor facelift Revealed:  काही कार ज्यावेळी रस्त्यावरून जातात तेव्हा त्या इकत्या कमाल वाटतात की, …