सनरुफ, 360-डिग्री कॅमेरा… आणि काय हवं? MG च्या नव्या कारचा फर्स्ट लूक पाहून विचाराल, किंमत किती?

MG Astor facelift Revealed:  काही कार ज्यावेळी रस्त्यावरून जातात तेव्हा त्या इकत्या कमाल वाटतात की, घेतली तर अशीच कार घेऊ असं अनेकजण उगाचच स्वत:ला सांगत असतात. काही मंडळी त्यासाठी कमाल प्रयत्नसुद्धा सुरू करतात. अशाच कार खरेदीच स्वप्न पाहणाऱ्यांसाठी एमडी मोटर्स लवकरत एक अफलातून कार बाजारात आणणार आहे. कंपनीच्या या कारचा लूक आतापर्यंत लपवून ठेवण्यात आला होता. पण, आता मात्र हा लूक पुन्हा सर्वांसमोर आला आहे. 

एमजी एस्टर फेसलिफ्ट असं या कारचं नाव असून, या नव्या कारच्या फोटोंवर कारप्रेमींच्या नजरा खिळल्या आहेत. लूकच्या बाबतीत ही कार फक्त एमजी मोटर्सच्याच नव्हे, तर इतरही कारच्या मॉडेलना टक्कर देत आहे. चौकटीबाहेर जात लूक आणखी उठावदार करण्यासाठी म्हणून या कारमध्ये हेटलॅम्पचा स्लीक सेट बसवण्यात आला असून, तो ग्लॉल बॅक अपर ग्रिलशी जोडण्यात आला आहे. 

कंपनीला लोगोसुद्धा ग्रिलच्या मधोमध लावून तो हलकासा वरच्या बाजूला घेण्यात आला आहे. तर, कारचं बोनेट आकारानं मोठं करण्यात आलं असून, त्याचा पृष्ठभाग आरशासारखा चकाकणारा करण्यात आला आहे. कारची चाकं जितकी कमाल आहेत तितकीच कमाल त्यांची ग्रिप आहे. एमजी मोटर्सकडून कारला टेल लॅम्प सेट देण्यात आला असून, अद्याप कारच्या मागच्या बाजूचं डिझाईन फारसं बदलण्यात आलेलं नाही. 

हेही वाचा :  WhatsApp वरील Delete केलेले मेसेज पुन्हा कसे वाचाल? वापरा 'ही' सोपी ट्रिक

कंपनीच्या माहितीनुसार कंपनीकडून ग्राहक, कारप्रेमींच्या अपेक्षा आणि मागण्या केंद्रस्थानी ठेवत कारच्या आतमध्येही काही बदल करण्यात आले आहेत. ही कार तुमच्यापर्यंत डिजिटल इंन्स्ट्रूमेंट क्लस्टरसह येणार असून, त्यामध्ये एक मोठी इन्फोटेन्मेंट स्क्रीन असेल. 

इलेक्ट्रीनक हॅडब्रेक असणाऱ्या या कारमध्ये ADAS सोबत पॅनोरॅमिक सनरुफ, 360 डिग्री कॅमेरासह इतरही कैक फिचर देण्यात आले आहेत. ड्युअर पॉवर्ड सीट असणारी ही कार काहीशी जुन्या मॉडेलसारखी दिसली तरीही प्रत्यक्षात मात्र त्यात बरेच फरक आढळत आहेत. 1.5 लीटर पेट्रोल आणि 1.3 लीटर टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिनसह ही कार सज्ज तिची एक्स शोरुम किंमत असू शकते 10 लाख रुपये. या कारच्या दराचा अधिकृत आकडा प्रतीक्षेत असला तरीही येत्या काळात भारतीय बाजारपेठेत ती होंडा एलिवेट, मारुती ग्रँड विटारा आणि सेल्टोसला टक्कर देईल असं म्हणणं गैर ठरणार नाही. Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Meloni यांनी कोणत्या मोबाईलमधून घेतला PM मोदींसोबत सेल्फी? डिस्काऊंटमध्ये घेण्याची संधी

पंतप्रधान नरेंद्र मोदी G-7 शिखर सम्मेलनात सहभागी झाले होते. या सम्मेलनात अनेक महत्त्वाच्या मुद्दांवर चर्चा …

Appleच्या वॉरंटी पॉलिसीमध्ये मोठा बदल; ग्राहकांच्या खिशाला लागणार कात्री?

Apple Warranty Check: Apple कंपनीने त्यांच्या रिपेअर आणि वॉरंटी पॉलिसीमध्ये बदल केले आहेत. कंपनीने या …