Layoffs 2023 : गुगलचा तब्बल 12 हजार कर्मचाऱ्यांना नारळ; सुंदर पिचाई यांनी पत्रातून व्यक्त केल्या भावना

Google : गेल्या काही दिवसांपासून जगभरात आर्थिक मंदीमुळे (financial crisis) तंत्रज्ञान क्षेत्रातील नामांकित कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात सुरु असल्याचे पाहायला मिळत आहेत. ट्विटरने जवळपास 50 टक्के तर फेसबुकने जवळपास 11 हजार कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकले आहे. त्यानंतर आता गुगल या दिग्गज टेक कंपनीमध्ये मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. गुगलची (Google) पालक कंपनी असलेल्या अल्फाबेट इंकने (Alphabet Inc) 12,000 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याची घोषणा केली आहे. गुगलच्या मते, जागतिक स्तरावर टाळेबंदी केली जात आहे.

गुगलच्या मते जागतिक स्तरावर हा निर्णय घेण्यात आला असून याचा सर्वाधिक फटका अमेरिकेतील कर्मचाऱ्यांना बसणार आहे. 20 जानेवारी रोजी अल्फाबेट इंकने सुमारे 12,000 कर्मचार्‍यांना काढून टाकण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे अल्फाबेट इंकमधील जागतिक स्तरावर 6 टक्के कर्मचारी कमी होणार आहेत. गुगलचे सीईओ सुंदर (Sundar Pichai) पिचाई यांनी ईमेलद्वारे ही माहिती दिली आहे. कंपनीतून काढून टाकलेल्या कर्मचाऱ्यांसोबत माझी सहानुभूती नेहमीच असणार आहे, असे पिचाई यांनी म्हटले आहे. यासोबतच सुंदर पिचाई यांनी कंपनीतून काढून टाकलेल्या कर्मचाऱ्यांनाही मदत जाहीर केली आहे.

हेही वाचा :  कर्मचाऱ्यांना इन्क्रिमेंट देण्यासाठी स्वत:च्या पगारात केली कपात, कोण आहेत सतीश मल्होत्रा? जाणून घ्या

कर्मचाऱ्यांना काय मिळणार?

ज्या कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकण्यात आलंय त्यांना 2022 चा बोनस आणि सुट्टीचे उर्वरित पैसे मिळणार आहे.. यासोबतच दोन महिन्यांचा म्हणजेच 60 दिवसांचा अतिरिक्त पगारही दिला जाणार आहे. यासोबतच कंपनीने सांगितले की, काढून टाकलेल्या कर्मचाऱ्यांना 6 महिन्यांची आरोग्य सुविधा, जॉब प्लेसमेंट सेवा आणि इतर मदत दिली जाणार आहे.  

सुंदर पिचाई यांचे भावनिक ईमेल

कंपनीने गेल्या दोन वर्षांत अनेकांना नोकरी दिली होती, पण त्यावेळची आर्थिक परिस्थिती आजच्यापेक्षा वेगळी होती त्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे सुंदर पिचाई यांनी म्हटले आहे. “Googlers, माझ्याकडे तुम्हाला सांगण्यासाठी काही तरी भयानक बातमी आहे. आम्ही आमचे कर्मचारी 6 टक्के कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे सुमारे 12,000 कर्मचारी कमी होणार आहेत. आम्ही आधीच अमेरिकेमधील कर्मचार्‍यांना याबाबत एक ईमेल पाठवला आहे. या निर्णयामुळे काही अविश्वसनीय प्रतिभावान लोकांना निरोप द्यावा लागणार आहे. या लोकांना आम्ही भरती करण्यासाठी कठोर मेहनत घेतली होती आणि त्यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव छान होता. पण आता या निर्णयामुळे आम्हाला खूप दुखः होत आहे. आम्ही येथे घेतलेल्या निर्णयांची संपूर्ण जबाबदारी मी घेतो,” असे सुंदर पिचाई यांनी कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या ईमेलमध्ये म्हटलं आहे.

हेही वाचा :  सरकारसाठी आनंदाची बातमी; 6 वर्षांचा रेकॉर्ड मोडत 1.87 लाख कोटींचा GST जमा



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Maharastra Politics : कोकणात ‘ह्याका गाड, त्याका गाड’… तो काय गाडणार? ठाकरेंवर राणेंचा ‘प्रहार’

Uddhav Thackeray vs Narayan Rane : कोकणात लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं उद्धव ठाकरे विरुद्ध नारायण राणे …

सांगलीच्या जतमध्ये वाढू लागली दुष्काळची तीव्रता, आटले पाण्याचे स्त्रोत

Sangli Drought: सांगलीच्या दुष्काळी जत तालुक्यामध्ये आता पाण्याची टंचाई आणखी भीषण होण्याच्या मार्गावर आहे. उटगी …