Safety Tips: इंटरनेटवरील नको त्या गोष्टींपासून मुलांना असे ठेवा दूर, फॉलो करा सोपी ट्रिक्स

नवी दिल्ली: Internet Usage: आजच्या डिजिटल जगात, इंटरनेटचा वापर थोरा-मोठ्यापासून ते लहान मुलापर्यंत प्रत्येक व्यक्ती करतो. लहान मुलांना इंटरनेटवर सहसा ऑनलाइन व्हिडिओ किंवा त्यांच्या वयोगटाशी संबंधित कार्टून इत्यादी YouTube वर पाहायला आवडते. मात्र, इंटरनेटवर अनेक प्रकारचे कंटेंट उपलब्ध असतात. ज्यामुळे मुले भरकटू शकतात. असे होऊ नये याकरिता मुलांच्या इंटरनेट अ‍ॅक्टिव्हिटीवर लक्ष ठेवणे आणि त्यासाठी सुरक्षित पद्धतींचा अवलंब करणे अत्यंत आवश्यक आहे. तुम्हालाही तुमच्या मुलांचा इंटरनेट वापर सुरक्षित ठेवायचा असेल तर, ही माहिती तुमच्यासाठी. यामध्ये आज आम्ही चुकीच्या कंटेंटपासून मुलांचे संरक्षण करण्याच्या काही सोप्प्या टिप्स सांगणार आहोत. जाणून घेऊया.

वाचा: Dating Apps वर मॅच शोधताना ‘या’ चुका करूच नका, अन्यथा मोजावी लागेल मोठी किंमत

पॅरेन्ट कंट्रोल्स वापरा:

आजकाल Google सह YouTube आणि Instagram सारख्या अनेक प्लॅटफॉर्मवर Parents Control सुविधा देखील उपलब्ध आहे. तुमची मुले नियमितपणे वापरत असलेले अॅप्स नियंत्रित करण्यासाठी तुम्ही याचा वापर करू शकता.

वाचा: वर्षभर रिचार्जचे टेन्शनच नाही ! सोबत ७५ GB अधिक डेटा आणि Disney+ Hotstar फ्री, पाहा VI चा प्लान

मुलांना इंटरनेट सुरक्षिततेबद्दल शिकवा:

हेही वाचा :  कमळाला पानगळती, शिवसेनेत इनकमिंग वाढले; चार आले आणखीही येणार

हे सर्वात महत्त्वाचे काम आहे. कारण, मुलांच्या अ‍ॅक्टिव्हिटीवरवर लक्ष ठेवणे सोपे काम नाही. अशात, मुलांना इंटरनेटवरील धोक्यांची माहिती देणे आणि त्यांना इंटरनेट वापरण्याच्या योग्य मार्गांची जाणीव करून देणे आवश्यक आहे. यासोबतच मुलांना ऑनलाइन पेमेंट आणि मालवेअरच्या धोक्यांबाबत आवश्यक माहिती दिली पाहिजे.

स्वतंत्र ई-मेल आयडी तयार करा:

तुम्ही मुलांसाठी वेगळा ई-मेल आयडी देखील तयार करू शकता, त्यामुळे वेब ब्राउझिंग दरम्यान अनावश्यक जाहिराती टाळता येतील. यासोबतच तुमची मुलं कोणत्या प्रकारचा कन्टेन्ट पाहत आहे याची अचूक माहितीही तुम्हाला मिळेल. त्याच वेळी, नवीन ई-मेल आयडीवरून ब्राउझरच्या मदतीने तुम्ही असुरक्षित वेबसाइट आणि कुकीज बंद करू शकता.

वाचा: 8GB RAM ऑफर करणाऱ्या ‘या’ फोनची किंमत १२,००० पेक्षा कमी, पाहा कुठे मिळतेय ऑफर

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पेट्रोलची टाकी फूल केल्यास स्फोट होतो? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य

Viral News : पेट्रोलची टाकी फूल केली तर स्फोट होऊ शकतो असा दावा करणारा व्हिडिओ …

पंकजा मुंडे बीडमध्ये भाजपचा बालेकिल्ला राखणार का? जनतेचा कौल कोणाला?

Beed Loksabha Constituency Special Report : राज्यात लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजलं आहे. आतापर्यंत महाराष्ट्रातील दोन …