Ramesh Deo Birthday: रील ते रिअल लाईफ कपल गोल्स, ५८ वर्षांचा संसार आणि आयुष्यभराचे प्रेम

अभिनेता रमेश देव यांचा आज वाढदिवस. पण तुम्हाला माहीत आहे का? रमेश देव आणि सीमा देव यांना ऑफस्क्रिन आणि ऑनस्क्रिन बेस्ट जोडी मानलं जातं. मजेशीर बाब ही आहे की, दोघांनीही मराठीपेक्षा हिंदी चित्रपटांमध्ये अधिक काम केले आहे. मराठीत लीड रोलमध्ये तर हिंदी चित्रपटांमध्ये दुय्यम तरीही दर्जेदार भूमिकांमध्ये ही जोडी दिसून आली आहे. पण केवळ अभिनयच नाही तर दोघांची लव्ह स्टोरीही त्यांच्या चाहत्यांना आवडते. एक आदर्श जोडी म्हणून या जोडीकडे पाहिले जाते. रमेश देव यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचं आयुष्य असणाऱ्या त्यांची पत्नी सीमा देव यांच्यासह नातं कसं जोडलं गेलं पाहूया. (फोटो सौजन्य – @ajinkkyadeo Instagram)

​अशी होती पहिली भेट​

​अशी होती पहिली भेट​

सीमा देव या चित्रपटातील ऑडिशनसाठी आईसह चर्नीरोडवरून निघाल्या होत्या. मात्र योगायोग असा की, त्याचवेळी रमेश देवही रेल्वेच्या त्याच डब्यात शिरले होते. त्यावेळी रमेश देव यांचा ‘आंधळा मागतो एक डोळा’ प्रदर्शित झाला होता आणि सीमाने त्यांना ओळखले. आईला सांगितल्यावर मात्र आईने लक्ष देऊ नकोस असे सांगितले होते. पण सीमा यांच्या सौंदर्याने आधीच मोहीत झालेले रमेश देव संपूर्ण डबा रिकामा असतानाही त्यांच्याच बाजूला जाऊन बसले होते. तर पहिल्याच दिवशी सीमा यांच्या आईशीही त्यांचा वाद झाला होता.

हेही वाचा :  बापरे! दूध 790 रुपये, साखर 290... महागाईच्या भस्मासूर जगू देईना

​रमेश देव आणि सीमा देव यांचा पहिला चित्रपट​

​रमेश देव आणि सीमा देव यांचा पहिला चित्रपट​

रमेश देव हे आपली पत्नी सीमा देव यांच्यापेक्षा १२ वर्षांनी मोठे होते. इतकंच नाही तर राजपूत सिसिदिया घराण्याशी रमेश देव यांचा संबंध होता. १९५० मध्ये आपल्या मराठी चित्रपटातील करिअरला त्यांनी सुरूवात केली. लहानसहान भूमिका करत नंतर लीड रोल त्यांना मिळू लागले. त्याचवेळी नलिनी सराफ ऊर्फ सीमा यांनी आपल्या करिअरला सुरूवात केली. दुसरा योगायोग असा की, ‘जगाच्या पाठीवर’ या मराठी चित्रपटातून सीमा देव यांनी एंट्री घेतली ज्यामध्ये त्या रमेश देव यांच्यासह काम करत होत्या आणि हाच रमेश देव यांच्यासह त्यांचा चित्रपट ब्लॉकबस्टरही ठरला.

(वाचा – एका कमेंटवरून सुरू झाली राहुल वैद्य आणि दिशा परमारची Love Story, नॅशनल टीव्हीवर प्रपोज करून जिंकले मन)

​१२ वर्षांचं अंतर पण मन जडल्यावर…​

​१२ वर्षांचं अंतर पण मन जडल्यावर…​

यानंतर रमेश आणि सीमा यांनी अजिबात मागे वळून पाहिले नाही. साधारण दोन दशके मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये दोघेही कार्यरत राहिले. यातील अनेक चित्रपट हिट ठरले आणि प्रेक्षकांनीही या दोघांचे चित्रपट उचलून धरले. याचदरम्यान दोन वर्षांनी १९६२ मध्ये ‘वरदक्षिणा’ चित्रपटातील प्लॉटनुसार रमेश देव हे सीमाचे लग्न अन्य कोणाशी लग्न लावताना प्रेम होते असं दाखविण्यात आले होते आणि याच दरम्यान दोघांनाही खऱ्या आयुष्यातही एकमेकांवरील प्रेमाची जाणीव झाली.

हेही वाचा :  Weather News : पहाटेची थंडी, दुपारचा उकाडा; दिवसभरात नेमकं किती वेळा बदलतंय हवामान?

(वाचा – 25th Anniversary: लग्नाआधी तासतास फोनवर बोलायचे चंकी पांडे आणि भावना, फिल्मी स्टाईलने केले होते प्रपोज)

​१९६२ मध्ये केले लग्न​

​१९६२ मध्ये केले लग्न​

एकमेकांवरील प्रेम व्यक्त केल्यानंतर त्याच वर्षी दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि लग्नही केले. पण सीमा देव यांची आई सतत त्यांच्याबरोबर सेटवर असायच्या. एक दिवस सीमा यांच्यासह बोलण्याची संधी मिळाल्यानंतर रमेश देव यांनी ती संधी साधत शायराना अंदाजामध्ये प्रेम व्यक्त केल्याचे एका मुलाखतीत सांगितले होते. तर नैसर्गिक अभिनय आणि दोघांचा मिळताजुळता स्वभाव यामुळेच प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिल्याचेही सांगितले होते.

(वाचा – नणंद आणि भावजयीचे नाते होईल अधिक मैत्रीचे, ईशा-श्लोका अंबानीच्या नात्यातून घ्या प्रेरणा)

​५८ वर्षांचा संसार​

​५८ वर्षांचा संसार​

२०२१ मध्ये रमेश देव आणि सीमा देव यांच्या लग्नाला ५८ वर्षे पूर्ण झाली. मात्र रमेश देव यांनी मागच्या वर्षी अर्थात २०२२ मध्ये जगाचा निरोप घेतला. शेवटच्या क्षणापर्यंत सीमा देव यांनी रमेश देव यांची साथ दिली. प्रेम असावे तर असे असंच आजच्या पिढीलाही वाटेल आणि आदर्श घेता येईल असा या दोघांचा संसार होता. अभिनय आणि अजिंक्य अशी दोन मुले जी दोन्ही याच क्षेत्रात कार्यरत आहेत आणि दोघांनीही चांगले नाव कमावले आहे.

हेही वाचा :  'राज ठाकरे भाजपचे नवे डार्लिंग बनले, पण..', राऊतांचा टोला; म्हणाले, 'राणे जेवढे..'

नात्यात एकमेकांना समजून घेणे, एकमेकांसह आयुष्यभर राहण्याचं केवळ वचनच न देता ते निभावणं अत्यंत गरजेचे आहे आणि रमेश देव आणि सीमा देव यांच्याकडे पाहून असंच प्रेम मिळावं इतकंच मनात येतं. रमेश देव हे प्रेक्षकांच्या मनात अजरामरच राहतील!

अशाच अधिक लाइफस्टाइल, हेल्थ, फॅशन, ब्युटी, होम डेकोर, रिलेशनशिप, हॅक्स यावरील अधिक माहितीसाठी क्लिक करा maharashtratimes.com

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Loksabha : बारामतीच्या सभेत बोलताना रोहित पवारांना अश्रू अनावर, अजितदादांनी केली नक्कल, म्हणाले ‘आमच्या पठ्ठ्यानं…’

Rohit Pawar burst into tears : येत्या सात मे रोजी होणाऱ्या तिसऱ्या टप्प्यातील लोकसभेच्या (Loksabha Election) …

‘मुंबईत गिरगावमध्ये नोकरीची संधी पण मराठी उमेदवार नको’; महिला HR ची संतापजनक पोस्ट

HR LinkedIn Post Related to Marathi People : सध्या सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत …