Adani Group Share Price: कट्यार काळजात घुसली! अदानींचे शेअर्स पुन्हा गडगडले; काही तासांत 4,55,46,32,50,000 पाण्यात…

Adani Group Share Price: 25 जानेवारीला अमेरिकेच्या हिंडनबर्ग या संस्थेनं उद्योगपती गौतम अदानी (Industralist Gautam Adani) यांना जोरदार झटका दिला. हिंडनबर्गनं प्रसिद्ध केलेल्या अहवालानंतर अदानींच्या उत्पन्नात तर घट झालीच परंतु त्याचसोबतच त्यांचे शेअर्सही (Adani Shares)  झपाट्यानं बुडायला सुरूवात झाली. आत्तापर्यंत या अहवालाला एक महिना होत आला तरी मात्र त्यातून अदानींच्या संपत्तीत काही सकारात्मक चिन्ह नाहीत. अदानींच्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांनाही (Investors) झटक्यावर झटके आले आहेत. त्यामुळे अदानी आता या संकटातून कसे सावरणार आणि त्यासाठी नक्की अदानी कोणते प्रयत्न करणार? यापुढे अदानींचे काय होणार याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता सगळ्यांनाच लागली आहे. त्यातून आता अदानींना अजून एक झटका लागला आहे. (Adani Group Share Price continously falling down now adani has lost  4,55,46,32,50,000 from his wealth)

गेल्या महिन्याभरातच अदानींच्या शेअर्समध्ये घसरण झाली आहे. त्यामुळे अदानींच्या शेअर्सची सध्या अवस्था अगदी बिकट आहे असंच म्हणावे लागेल. त्यातून आता काही तासांतच अदानी यांचे शेअर्स गडगडल्यानं हे 5.5 अब्ज डॉलर म्हणजेच 4,55,46,32,50,000 रूपये पाण्यात बुडाले आहे. त्यामुळे आता याचा फटाका अदानींसोबतच त्यांच्या गुंतवणूकदारांनाही बसणार आहे. अदानींची संपत्ती ही मोठ्या प्रमाणात गडगडली आहे. संपती घटल्यानं जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या (Richest) यादीतून दुसऱ्या क्रमाकांवरून ते 26 व्या क्रमांकावर गेले असतानाच आता त्यांच्या संपत्तीतून 5.5 अब्ज डॉलर्सही कमी झाले आहेत. 

हेही वाचा :  '1001% सांगतो मोदी-ठाकरे एकत्र येतील, कारण...'; शिंदे गटाच्या आमदाराचा दावा

अदानींच्या शेअर्समध्ये घसरणच

अदानी पोर्ट्स (Adani Ports) लवकरच कर्जाची परतफेड करणार आहे. आत्तापर्यंत अदानींचे कमीत कमी 10 स्टॉक्स हे 11.62 वरून 7.58 वर घसरले आहेत. शेअर्स ढासळ्यानं अदानींसमोर नवं आव्हानं असेल तर म्हणजे गुंतवणूकदारांचा विश्वास परत मिळवणे. त्यासाठी त्यांनी म्हणजेच अदानी पोर्ट्सनी यापुर्वी 1500 कोटी रूपयांच्या कर्जाची परतफेड केली आहे. अदानी पॉवर, अदानी ट्रान्समिशन, अदानी ग्रीन एनर्जी, अदानी टोटल गॅस, अदानी विल्मार कंपनीच्या शेअर्समध्ये 5 टक्क्यांनी घट झाली आहे तर अंबुजा सिमेंटचे भाव हे 2 टक्क्यांनी घसरले आहेत. 

अदानी डबघाईला…

आतापर्यंत गौतम अदानीच्या संपत्तीत मोठी घट झाली आहे. त्याचसोबत त्यांच्या शेअर्समध्येही लक्षणीय घट झाली आहे. त्यातून अदानींचे शेअर्स इतके गडगडले आहेत की आता गुंतवणूकदारांचा विश्वास निर्माण करणे फार कठीण झाले आहे. गुंतवणूकदारही झपाट्यानं अदानींचे शेअर विकायला सुरूवात केली आहे. त्यामुळे सध्या अदानींची स्थिती फार काही खास नाही. तासातासाला त्यांच्या कंपन्यांचे शेअर्स हे डबघाईलाच जात आहेत. सध्या या परिस्थितीमुळे व्यापार क्षेत्रालाही मोठा फटाक बसला आहे. 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘कालपर्यंत मलाही ठाऊक नव्हतं की…’; BJP प्रवेशानंतर शेखर सुमनची पहिली प्रतिक्रिया

Shekhar Suman Joins BJP: लोकसभा निवडणुकीचं तिसऱ्या टप्प्याचं मतदान सुरु असतानाच भारतीय जनता पार्टीची ताकद अधिक …

दगड फोडून मिळायची 10 रुपये रोजंदारी, UPSC क्रॅक करुन राम ‘असे’ बनले अधिकारी

Ram Bhajan UPSC Success Story: यूपीएससी ही देशातील सर्वात कठीण परीक्षांपैकी मानली जाते. त्यामुळे यूपीएससी …