छातीवर वार, डोळे बाहेर काढले नंतर गुप्तांगावर….; महिलेचा मृतदेह पाहून पोलीसही हादरले

Crime News: बिहारमध्ये (Bihar) 45 वर्षांची अत्यंत निर्घृणपणे हत्या (Murder) करण्यात आली आहे. खागरिया जिल्ह्यात महिलेचा मृतदेह आढळल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. यानंतर स्थानिकांकडून आंदोलन केलं जात आहे. सुलेका देवी यांच्यावर अज्ञातांनी हल्ला करत अक्षरश: छळ केला. आरोपींनी धारदार शस्त्राने तिची हत्या केsली. दरम्यान, हत्या करण्यापूर्वी त्यांनी तिचे डोळे बाहेर काढले, स्तन कापले आणि गुप्तांगावर वार केले अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.  

सुलेखा देवी (Sulekha Devi) आपल्या शेतात काम करण्यासाठी गेल्या असता आरोपींनी त्यांच्यावर हल्ला केला. यानंतर आरोपींनी घटनास्थळावरुन पळ काढला आहे. सुलेखा देवी यांच्या कुटुंबावर झालेला हा पहिला हल्ला झाली. याआधी 25 एप्रिल 2014 मध्ये सुलेखा देवी यांचे पती बबलू सिंग आणि त्यांच्या भावाची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. पतीच्या हत्येमधील आरोपीची गतवर्षी कोर्टाने जामीनावर सुटका केली. 

जमिनीच्या वादावरुन ही हत्या झाल्याचा पोलिसांना संशय आहे. मात्र हत्येचं नेमकं कारण समजून घेण्यासाठी पोलीस सध्या तपास करत आहेत अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. 

पोलीस अधिकारी मनोज कुमार यांनी पत्रकार परिषदेत माहिती देताना सांगितलं की, घटनास्थळावरुन एक चाकू सापडला आहे. या संपूर्ण घटनेचं अत्यंत कडक पद्धतीने तपास केला जाणार आहे. 

हेही वाचा :  BCCI कडून रोहित शर्मा, विराट कोहलीला मोठा धक्का तर रवि शास्त्रींसाठी Good News

दरम्यान या हत्येमुळे त्यांच्या समाजात खळबळ उडाली असून संताप व्यक्त केला जात आहे. सुलेखा देवा यांच्या नातेवाईकांसह स्थानिकांनी आंदोलन करत आरोपींविरोधात कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. नातेवाईक आणि स्थानिकांनी राष्ट्रीय महामार्गावर आंदोलन करत कित्येक तास वाहतूक रोखून धरली होती. 

पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाल्यानंतर अखेर आंदोलन मागे घेण्यात आलं. पोलिसांनी नातेवाईक आणि स्थानिकांना आरोपी अटक केले जातील आणि कडक कारवाई केली जाईल असं आश्वासन दिलं आहे. 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Loksabha Election 2024 : बारामतीत मतदानाला थंड प्रतिसाद; तिसऱ्या टप्प्यातील एकूण आकडेवारी नेमकं काय खुणावू पाहतेय?

Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठीचं मतदान मंगळवारी पार पडलं. यावेळी देशातील 11 …

अंधश्रद्धेचा कळस! अपघातात व्यक्तीचा मृत्यू, 20 वर्षांनी नातेवाईकांची रुग्णालयच्या गेटवर पूजा, कारण काय तर..

Superstition : देश 21 व्या शतकात वावरत आहे, पण अजूनही अंधश्रद्धा मूळापासून नष्ट करण्यात आपण …