आई आणि मुलामध्ये संबंध असल्याचा संशय, बापाने खोलीत पाडला रक्ताचा सडा; मुलगी आली तर बेडवरच…

Crime News: संशयाची सुई माणसाला कोणत्याही थराला घेऊन जाते. एकदा संशयाचं भूत डोक्यात शिरलं की, मग माणसाला आपण जे समोर पाहत आहोत त्यापेक्षा जो विचार करत आहोत तेच सत्य वाटू लागतं. अनेकदा हा संशय माणसाच्या हातून अनपेक्षित गोष्टी घडवतो ज्याचा नंतर फक्त पश्चाताप होऊ शकतं. पश्चिम बंगालमध्ये अशाच संशयातून एक व्यक्तीने आपला संसार उद्ध्वस्त केला आहे. पतीने आपल्या पत्नीची हत्या करुन पळ काढला आहे. धक्कादायक म्हणजे, त्याला आपल्या पत्नी आणि मुलामध्येच संबंध असल्याचा संशय होता. 

पश्चिम बंगालच्या (West Bengal) पूर्व वर्धमान जिल्ह्यात एका महिलेची अत्यंत निर्घृणपणे हत्या (Crime) करण्यात आली आहे. महिलेच्या पतीवरच हत्येचा आरोप करण्यात आला आहे. हत्येनंतर पती फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. पत्नी आणि आपल्या मुलामध्ये अनधिकृत संबंध असल्याचा त्याला संशय होता. याप्रकरणी आरोपीच्या मुलीनेच पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. 

कालना तालपुकूर परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे. येथे मदन बाग आपली पत्नी ठाकुराणी बाग, दोन मुली आणि मुलांसहित राहत होता. महिलेच्या भावाने दिलेल्या माहितीनुसार, मदन याला आपली पत्नी आणि 16 वर्षीय मुलामध्ये संबंध असल्याचा संशय होता. यामुळेच भाचा आमच्यासोबत राहत होता. तो मालदा येथील एका हॉटेलमध्ये काम करत होता. जमाई षष्ठीसाठी तो घरी आला होता. 

हेही वाचा :  'हात दाखवा, गाडी थांबवा' तत्वावर धावते पुणे मेट्रो? Video पाहून तुम्हीही म्हणाल, 'हे पुणेकरच...'

पुढे त्यांनी सांगितलं आहे की, बहिणीने आपल्या मुलाला पाहण्याची इच्छा व्यक्त केली असावी. यामुळेच भावोजी आणि आपल्या बहिणीत त्या रात्री जोरदार भांडण झालं. यानंतर त्याने धारदार शस्त्राने हत्या केली आणि फरार झाला. सकाळ झाली तरी आई खोलीच्या बाहेर न आल्याने मुलींनी आत जाऊन पाहिलं असता त्यांना धक्काच बसला. कारण तिथे बेडवर रक्ताच्या थारोळ्यात आईचा मृतदेह पडलेला होता. 

यानंतर सर्व नातेवाईकांना घटनेची माहिती देण्यात आली. हत्येची माहिती मिळताच परिसरात खळबल उडाली आहे. पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेत तपास सुरु केला आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी मेडिकल कॉलेजला पाठवला आहे. दरम्यान याप्रकरणी आरोपीच्या मुलीने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. 

पोलीस सध्या आरोपीचा शोध घेत आहेत. कलना पोलीस ठाण्याचे प्रभारी देबाशीष नाग यांनी सांगितलं आहे की, आरोपी सध्या फरार आहे. पोलिसांचं पथक त्याचा शोध घेत आहे. Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

व्यवस्थित Zoom करून पाहा; अवकाशातून असा दिसतो ‘राम सेतू’… समोर आला पहिला स्पष्ट फोटो अन् नवी माहिती

Ram Setu high resolution photo : राम सेतू… भारतीयांसाठी कमालीचा जिव्हाळ्याचा विषय आणि संशोधकांसाठी संशोधनाचा …

PM साठी फुटपाथ मोकळे करता मग सामान्यांसाठी का नाही? हायकोर्टाचा सवाल; म्हणाले, ‘चालण्याची जागा मूलभूत अधिकार’

Bombay High Court On Footpaths Streets: मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी एका प्रकरणासंदर्भात भाष्य करताना पंतप्रधान आणि …