राखी सावंतला व्हायचंय मुख्यमंत्री, म्हणाली ‘मोदीजी चहा बनवताना…’

मुंबई, 7 ऑक्टोबर : ‘ड्रामा क्वीन’ म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री राखी सावंत ही सतत चर्चेत असते. कोणत्या न कोणत्या कारणामुळे ती प्रसिद्धी झोतात येत असते. सोशल मीडियावर राखीचे अनेक फनी व्हिडीओ, रस्त्यावरचा डान्स, वादग्रस्त वक्तव्य व्हायरल होत असतात. अशातच राखी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. आता राखीचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये तिने मुख्यमंत्री होण्याचे तिचे स्वप्न सांगितले आहे. राखीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

राखी सावंतने व्हिडीओमध्ये म्हटले आहे की, तिला मुख्यमंत्री केले तर काय करायला आवडेल. जर मला या देशाची मुख्यमंत्री बनवले तर मी ड्रीम गर्ल हेमा मालिनी जीचे गोरे गाल आणि गोरी कंबरसारखे रस्ते बनवेल. आमच्या ड्रीमगर्लसारखे रस्ते मी सुंदर बनवीन. हेमा मालिनी जींचे सौंदर्य, त्यांचा चेहरा, त्यांचे शरीर, तिची कंबर अशा खड्ड्यांपुढे मी जाणार नाही. तुम्ही हे विनोदामध्ये घेऊ नका.

हेही वाचा –  VIDEO: गरोदर आलियासाठी माधुरी दीक्षितने पाठवलं खास गिफ्ट; पाहून तुम्हीही व्हाल खुश

राखी पुढे म्हणाली की, चहा बनवताना मोदीजी पंतप्रधान झाले, तर बसून, पडून, हसत असताना मी मुख्यमंत्री का होऊ शकत नाही. सध्या राखीचं हे वक्तव्य चर्चेचा विषय ठरत आहे.

दरम्यान, बिग बाॅसमुळे राखी चांगलीच प्रकाशझोतात आलेली पहायला मिळाली. राखीचा नुकताच घटस्फोट झाला असून सध्या सोशल मीडियावर याविषयी जोरदार चर्चा रंगली आहे. अशातच राखीचा नवा बाॅयफ्रेंड आदिल खान याच्यासोबत लग्नाच्या चर्चांनाही उधाण आलंय.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.
@majhinews1

Check Also

चंद्रमुखीनंतर अमृता खानविलकरचा नवा सिनेमा; साकारणार ऐतिहासिक भूमिका

मुंबई, 07 ऑक्टोबर : यंदाची दिवाळी प्रेक्षकांसाठी खास होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि त्याचा …

हे तर रामायणाचं इस्लामीकरण! ‘आदिपुरुष’ चित्रपटाच्या दिग्दर्शकाला कायदेशीर नोटीस

मुंबई, 7 ऑक्टोबर : अभिनेता प्रभास आणि सैफ अली खान यांचा सर्वांत लोकप्रिय अभिनेत्यांमध्ये समावेश …