बेबी शॉवर फंक्शनमध्ये साधा सूट,लग्नातले शूज घालून आलियाचा धमाका

लग्नाच्या दोन महिन्यांनंतरच ‘गुड न्यूज’ देणारी आलिया भट्ट लवकरच आई होणार आहे. आलिया भट्ट आणि रणबीर कपूरच्या घरी लवकरच एक छोटा पाहुणा येणार आहे. त्याच्या येण्याची तयारी सुरु झाली आहे. आलिया रणबीर त्यांच्या बाळाच्या आगमनासाठी सज्ज असलेले पाहायला मिळतात. अशातच 5 ऑक्टोबर रोजी, जोडप्याच्या घरी एक बेबी शॉवर समारंभ आयोजित करण्यात आला होता, ज्यामध्ये कपूर कुटुंबातील बहुतेक लोक उपस्थित होते. रणबीर-आलिया यांनी त्यांच्या घरीच्या बाल्कनीमध्येच लग्न केले होते. आणि हा कार्यक्रमसुद्धा घरीच करण्यात आला होता त्यामुळे चर्चांना उधाण आले आहे. यावेळी आलियाने सुंदर असा येल्लो रंगाचा सुंदर ड्रेस परिधान केले होता. त्याच प्रमाणे इतरांनी देखील येल्लो रंगाचे कपडे परिधान केले होते. कलाकर म्हटलं तर त्याचा प्रत्येक गोष्टीकडे चाहत्यांचे लक्ष असते अशात चाहत्यांचे लक्ष अलियाच्या शूजकडे गेले. लग्नात घातलेले सिल्वर शूज देखील तिने यावेळी घातले होते. (फोटो सौजन्य- इंस्टाग्राम)

​आलियाने वेधले सर्वांचे लक्ष

आलिया तिच्या उत्तम अभिनयाने सर्वांच्या चर्चेत असते. अशातच काही दिवसांपासून आलिया तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील खूप चर्चेत आहे. नुकतेच आलिया भट्टच्या बेबी शॉवरच्या फंक्शनचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यामध्ये आलिया खूपच सुंदर दिसत होती. त्याच्या चेहऱ्यावर असणाऱ्या ग्लोमुळे अनेक गोष्टी समजून येत होत्या. कपूर कुटुंबाने त्यांच्या लाडक्या सूनेसाठी पाचव्या महिन्यात आलियाचा ओटी भरण्याचा कार्याक्रम आयोजित केला होता. यावेळी नीतू कपूरपासून करिश्मा कपूर, तिची बहीण शाहीन भट्ट, करण जोहर-महेश भट्ट, आजी सोनी राजदान आणि रिद्धिमा हे सर्व उपस्थित होते.

(वाचा :- लिंबू रंगाच्या ड्रेसमध्ये अनुष्काच्या क्युट अदा, वामिकाच्या आईपुढे मलायकाही फिकी)

क्युट कपल

​अलियाचा क्युट लूक

या फंक्शनमध्ये प्रत्येकजण पारंपारिक लूकमध्ये दिसला, ज्यामध्ये आई-टू बीचा लूक असा होता, जो पाहताच बनवला जात होता. याचे कारण असे की आलिया भट्टने तिच्या बेबी शॉवर पार्टीसाठी स्वत: ला मस्टड येल्लो रंगाचा ड्रेस परिधान केला होता. या ड्रेसमध्ये ती खूपच सुंदर दिसत होती.

(वाचा :- 55 वर्षांच्या माधुरी दीक्षितचा पिंक साडीत जलवा, ग्लॅमरपुढे 48 कोटींचं नवं घर पण पाणी कम)

​अनारकली सूट

आलिया भट्ट काही महिन्यांतर बाळाला जन्म देणार आहे. अशातच यावेळी तिने चमकदार रंगाचा अनारकली सूट घातला होता, ज्याचा फॉल ते फिटिंगमध्ये अलिया खूपच सुंदर दिसत होती. हा एक प्रकारचा थ्री पीस सेट होता, ज्याचा पॅटर्न पूर्णपणे मोनोटोन लूकमध्ये ठेवण्यात आला होता. तुम्ही देखील प्रेंग्नट असाल तर असी लूक कॅरी करु शकता. या पोशाखात अभिनेत्रीच्या आरामासाठी पायजमीऐवजी जुळणारी पायघोळ असलेली ए-लाइन कुर्ती पॅन्ट परिधान केली होती. तर सेम रंगाची ओढणी घेऊन तिने तिचा लूक पूर्ण केला.

(वाचा :- प्रियांकाने थेट घेतली अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिसची मुलाखत, बॅकलेस ड्रेसमध्ये ‘देसी गर्लचाच डंका’)

​नाजूक सुंदर नक्षीने वेधले लक्ष

आलिया भट्टने स्वतःसाठी निवडलेल्या पोशाखात कोणत्याही प्रकारची हेव्ही नक्षी नव्हती, ज्यामुळे तिचा लूक खूपच साधा आणि एलिगन्ट वाटत होता. या ड्रेसवर मण्यांचे काम करण्यात आले होते. तर स्लिव्हजवर सोनेरी पट्ट्याने वर्क करण्यात आले होते.

(वाचा :- छोटाशा ऑरेंज ड्रेसमध्ये मौनी रॉयचा कहर, मादक अदांपुढे मालदिवचे सौंदर्याही फिके)

​ज्वेलरी

यालूक ला पूर्ण करण्यासाठी आलियाने सिम्पल असा ज्वेलरी सेट परिधान केला होता. त्याच सोबतच तिने हलका मेकअप ठेवला होता. यावेळी तिने सुंदर असा मांगटिका देखील लावला होता. सिम्पल लूक कॅरी करत तिने सर्वांचे मन जिंकून घेतले.

(वाचा :- करोडपती व्यावसायिकच्या पत्नीने साध्या लेहेंग्यात वेधले सर्वांचे लक्ष, लेहेंग्याची किंमत ऐकून चाहते म्हणतात ”यात एक घर येईल” )

​रणबीरचा लूक

यावेळी रणबीरही पारंपारिक लूकमध्ये पाहायला मिळाला. पेस्टल पिंक कलरचा कुर्ता घातला होता. ज्यामध्ये तो खूपच सुंदर दिसत होता. एवढेच नाही तर संपूर्ण कार्यक्रमात रणबीर त्याच्या पत्नीसोबत दिसला. तुम्ही देखील या सणांच्या दिवसांमध्ये असा लूक कॅरी करु शकता.

(वाचा :- Maheep Kapoor: मुलीवर आई पडली भारी, महिप कपूरच्या ब्लॅक लूकने सोशल मीडियावर एकच खळबळ लूकपुढे मलायकाही फेल)

​शूज केले रिपिट

यावेळीआलियाने तिच्या लग्नातील शूज रिपिट करताना दिसली. अलिया अनेकवेळा तिचे कपडे आणि अनेक गोष्टी रिपिट करताना दिसते. एका मुलाखतीमध्ये आलियाने सांगितले की आपण सर्वांनीच आपल्या गोष्टी परत वापरायला काही हरकत नाही. त्यामुळे निसर्गाचे संवर्धन देखील होते.

(वाचा :- लिंबू रंगाच्या ड्रेसमध्ये अनुष्काच्या क्युट अदा, वामिकाच्या आईपुढे मलायकाही फिकी)

अलिया म्हणते पर्यावरणासाठी हे गरजेच आहे



Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.
@majhinews1

Check Also

सरकार बदललं अन् रश्मी शुक्लांना क्लिनचीट मिळाली, फोन टॅपिंग प्रकरण निकाली!

Rashmi Shukla Phone tapping Case : महाविकास आघाडी सरकारच्या काळात समोर आलेल्या फोन टॅपिंग प्रकरणात …

“बटन स्टार्ट” कार वापरत असाल तर, चोरांची तुमच्यावर असेल नजर

सोनू  भिडे, नाशिक:-  सध्या बाजारात बटन स्टार्ट (Key Less) असलेल्या गाड्यांची मागणी वाढली आहे. या …