मुंबई, 17 सप्टेंबर- लोकप्रिय कॉमेडियन-अभिनेता राजू श्रीवास्तव गेल्या एक महिन्यापेक्षा अधिक काळ रुग्णालयात भरती आहेत. हृदय विकाराचा झटका आल्यांनंतर त्यांना दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. इतक्या दिवसानंतर अजूनही त्यांना शुद्ध आलेली नाहीय. परंतु आधीपेक्षा त्यांच्या प्रकृतीत थोडी सुधारणा झाल्याचं त्यांचा भाऊ दीपू श्रीवास्तव यांनी सांगितलं होतं. दरम्यान आता समोर आलेली वृत्ताने सर्वांनाच चिंताग्रस्त केलं आहे. मीडिया रिपोर्टनुसार, राजू श्रीवास्तव यांना दिल्लीच्या एम्स रुग्णलयातून मुंबईत शिफ्ट केलं जाणार आहे.
नुकतंच राजू श्रीवास्तव यांच्याबाबत एक बातमी समोर आली होती. त्यानुसार राजू श्रीवास्तव यांना दिल्लीच्या एम्स रुग्णालयातून हालवून मुंबईच्या रुग्णालयात भरती केलं जाणार आहे. याबाबत मीडियाने राजू श्रीवास्तव यांचा भाऊ दीपू श्रीवास्तव यांच्याशी संवाद साधला असता, सत्य समोर आलं आहे. दीपू श्रीवास्तव यांनी सांगितलं की, एम्स रुग्णालयात योग्य उपचार सुरु आहेत. त्यामुळे त्यांना इथून मुंबईला शिफ्ट करण्याची कोणतीही योजना बनवलेली नाहीय.
दीपू श्रीवास्तव यांनी पुढं सांगितलं की, राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीत आधीपेक्षा चांगली सुधारणा झाली आहे. रिकव्हरी थोडी कमी वेगाने होत आहे. परंतु आम्हाला विश्वास आहे की, राजू यांची प्रकृती लवकरच ठणठणीत होईल आणि आम्ही त्यांना घरी घेऊन जाऊ. आमचा याठिकाणी उपचार करत असलेल्या डॉक्टरांवर पूर्णपणे विश्वास आहे. त्यामुळे त्यांना मुंबईला शिफ्ट करण्याचा विचार केलेला नाहीय.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Comedian, Entertainment
Source link
MajhiNews Marathi News, Latest Marathi News, Marathi News Paper, Maharashtra Breaking News | मराठी ताज्या बातम्या