पुतिन यांच्यावर अमेरिकेची मोठी कारवाई; रशियाच्या तेल आयातीवर बंदी घालण्याचा निर्णय


रशियाने युक्रेनविरुद्धच्या युद्धात अमेरिकेच्या आवाहनाकडे दुर्लक्ष केले आहे.

युक्रेनविरुद्ध युद्ध पुकारणाऱ्या रशियाला अमेरिकेने मोठा धक्का दिला आहे. अमेरिकेने मंगळवारी रशियन तेलाच्या आयातीवर निर्बंध लादण्याचा निर्णय घेतला. अमेरिकेच्या या निर्णयामागील सर्वात मोठे कारण रशियाच्या अर्थव्यवस्थेवर निर्बंध लादण्याचे आहे. कारण रशियाने युक्रेनविरुद्धच्या युद्धात अमेरिकेच्या आवाहनाकडे दुर्लक्ष केले आहे.

असोसिएटेड प्रेसच्या म्हणण्यानुसार, युक्रेनवरील हल्ल्याचा बदला म्हणून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी रशियाच्या अर्थव्यवस्थेवर कडक कारवाई केली आहे. अमेरिकेने रशियातील तेल आयातीवर निर्बंध लादण्याचा निर्णय घेतला आहे. युक्रेनवरील हल्ल्यानंतर अनेक देशांनी रशियावर निर्बंध लादण्यास करण्यास सुरुवात केली आहे. मात्र याचा रशियावर अद्याप कोणताही प्रभाव पडलेला नाही आणि युद्ध सुरूच आहे.

रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर रशियाकडून कच्च्या तेल आणि नैसर्गिक वायूची खरेदी बंद करणार असल्याची घोषणा ऊर्जा क्षेत्रातील दिग्गज शेलने मंगळवारी केली. शेलने एका निवेदनात म्हटले आहे की ते रशियाकडून टप्प्याटप्प्याने सर्व हायड्रोकार्बन्स- कच्चे तेल, पेट्रोलियम उत्पादने, नैसर्गिक वायू आणि द्रवीभूत नैसर्गिक वायू खरेदी करणे थांबवणार आहेत.

हेही वाचा :  5 वर्षाच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार केल्यानंतर पोत्यात भरलं अन्...; पोलिसांनीही मागितली कुटुंबाची माफी

त्याच बरोबर शेलने रशियातील आपले सर्व्हिस स्टेशन आणि इतर ऑपरेशन्स बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. काही दिवसांपूर्वी युक्रेनच्या परराष्ट्रमंत्र्यांनी शेलने रशियाकडून तेल खरेदी सुरू ठेवल्याबद्दल टीका केली होती.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Maharastra Politics : मुख्यमंत्र्यांचा मुक्काम, विरोधकांना फुटणार घाम? 15 जागांवर कोण ठरणार सामनावीर?

Maharastra Loksabha Election 2024 : महायुतीच्या जागावाटपात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) लोकसभेच्या तब्बल 15 …

VIDEO : ‘तुझ्या चेहऱ्यावर स्मितहास्य.. ‘, चिमुकल्या जसप्रीतच्या मदतीसाठी अर्जुन कपूर धावला, म्हणतो ‘वडिलांच्या निधनानंतर…’

Arjun Kapoor offers to help Jaspreet :  हिरवा टी-शर्ट आणि गडद निळ्या रंगाच्या पगडीमधील एका …