प्रेग्नेंट आलियाला रणबीरकडून खास सपोर्ट, गरोदरपणात नवऱ्याने करायला पाहिजेत ‘ही’ कामं

बॉलिवूडमध्ये सध्या अभिनेत्री आलिया भट्टची जोरदार चर्चा आहे. प्रेग्नेंसीमध्ये आलिया अतिशय ऍक्टिव दिसत आहे. सिनेमाच्या प्रमोशन्सकरता खूप मेहनत देखील घेत आहे. आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूर सध्या आपल्या ‘ब्रम्हास्त्र’ सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत.

महत्वाची गोष्ट म्हणजे आलियाची प्रेग्नेंसी आता दुसऱ्या ट्रायमेस्टरमध्ये आहे. अशावेळी तिला पती रणबीरचा खूप मोठा सपोर्ट मिळत आहे. या दिवसांमध्ये आलिया – रणबीर एकत्र आहे. अशा परिस्थिती गर्भवती स्त्रीला जोडीदाराची साथ मिळाली तर ती खरंच खूप मोठी गोष्ट आहे.

गर्भधारणेतील दुसरे ट्रायमेस्टर अतिशय महत्वाचे आहे. यामध्ये बाळाची वाढ होणे आवश्यक असते. हा काळ बाळाच्या वाढीसाठी अत्यंत आवश्यक आहे. तसेच या काळात स्त्रिच्या शरीरात देखील खूप बदल होत असतात. अशावेळी पतीची मिळालेली साथ ही खूप कौतुकाची असते. (फोटो सौजन्य – टाइम्स ऑफ इंडिया)

प्रेग्नेंसीतील प्रवासात जोडीदाराची साथ महत्वाची

आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांच्याप्रमाणेच पालक बनण्याचा विचार प्रत्येक जोडप्यासाठी खास असतो. त्याच वेळी, जोडपे गरोदरपणात एकमेकांशी भावनिकरित्या जोडतात. विशेषतः पहिल्या गरोदरपणात दोन्ही जोडीदारांच्या मनात खूप उत्साह असतो. त्यामुळे कुटुंबातल्या आनंदासोबतच अनेक गोष्टींबद्दल भीती, असुरक्षितता आणि संभ्रमही असतो. अशा परिस्थितीत पती-पत्नी दोघांनाही वेगवेगळ्या प्रकारे भावनिक आधाराची गरज असते.

​घराची जबाबदारी समजून घ्या

एकत्र कुटुंबात गरोदर महिलांची सहज काळजी घेतली जाते, पण विभक्त कुटुंबात फक्त नवरा-बायकोच असतात आणि अशा परिस्थितीत पती-पत्नी दोघांनाही घरातील कामे सांभाळावी लागतात. स्वयंपाकघर आणि घरातील बरीच कामे महिलाच करतात आणि या गोष्टींमुळे महिलांना गर्भधारणेदरम्यान अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. अशा परिस्थितीत पतींनी घरातील रेशनची यादी बनवणे, सुपरमार्केटमध्ये जाऊन औषधांचा साठा आणि घरातील इतर जीवनावश्यक वस्तू भरणे अशा जबाबदाऱ्या पार पाडल्या पाहिजेत.

​ती खास असल्याची जाणीव करून द्या

गरोदर महिलांना भेटवस्तू मिळणे, आवडते पदार्थ खाणे, चॉकलेट खाणे आदींमुळे आनंद मिळतो. यामुळे तिचा मूड झपाट्याने बदलतो आणि तिला बरे वाटते. म्हणून, आपल्या पत्नीला विशेष वाटू द्या. कधी त्यांना बाहेर जेवायला घेऊन जा, तर कधी त्यांच्या आवडीची पुस्तके, कपडे किंवा चॉकलेट आणा. यामुळे त्यांना आनंद होईल आणि त्यांना बरे वाटेल. कारण गर्भवती स्त्रीच्या मनात प्रश्न असतो की, बाळ आल्यानंतर आपल महत्व कमी होणार आहे का? तर तिचा हा प्रश्न मुळापासून दूर करा.

​सकारात्मक विचारांची द्या साथ

गरोदरपणात वजन वाढल्याने महिलांच्या शरीराचा आकार बदलतो आणि काही वेळा महिला याविषयी नाराज होतात. पायांना सूज येणे, हनुवटी दुप्पट होणे आणि आवडीचे कपडे न घालणे या समस्यांमुळे महिलांना त्यांचे शरीर आवडत नाही आणि त्यामुळे त्या दुःखी राहू लागतात. अशा परिस्थितीत तुमच्या जोडीदाराला तुमचे शरीर स्वीकारण्यास आणि शरीर सकारात्मक राहण्यास प्रोत्साहित करा.

​फिट करण्यासाठी प्रोत्साहन द्या

गरोदरपणात तुमच्या पत्नीला हलका व्यायाम करण्यास, फिरायला जाण्यासाठी आणि योगाभ्यास करण्यास प्रोत्साहित करा. चालणे आणि व्यायाम करून गर्भवती महिलांचे स्नायू ताणणे, निरोगी वजन राखणे सोपे आहे. गर्भवती स्त्री ऍक्टिव राहिल्यामुळे ऑक्सिजनचे प्रमाण शरीरात व्यवस्थित राहते.

Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.
@majhinews1

Check Also

मोठी बातमी!! शिंदे-फडणवीस सरकारला हायकोर्टाची नोटीस

विशाल करोळे, झी मीडिया, संभाजीनगर : सत्तातरानंतर राज्यात सत्तेत आलेल्या एकनाथ शिंदे (eknath shinde) – …

करिनाच्या सुंदर सौंदर्याचं रहस्य उघड, ऋजुता दिवेकरांनी सांगितले ‘हे’ घरगुती उपाय

बॉलिवूडच्या सर्व सुंदर अभिनेत्रींनी पैकी एक अभिनेत्री म्हणजे करीना कपूर. पण बेबोच्या सदैव चमकणाऱ्या त्वचेमागे …