प्रभू श्रीरामाला 1 बहीणही होती! मग तिचा उल्लेख रामायणात का नाही?

Lord Sri Rama Sister: अयोध्येत राम मंदिराचे काम अंतिम टप्प्यात असून उर्वरित काम वेगाने पूर्ण करत आहेत. 22 जानेवारी 2024 रोजी राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा आयोजित केला आहे.  मर्यादा पुरुषोत्तम राम यांचे गुण, वडिलांचे वचन पूर्ण करण्यासाठी त्यांचा वनवास यासह विविध घटनांचा रामायणात तपशीलवार उल्लेख केला आहे. यामध्ये प्रभू रामाच्या कुटुंबातील सर्व सदस्य, वनवासात भेटलेले लोक, लंका जिंकणे यासारख्या त्यांच्या आयुष्यातील सर्व घटनांचा उल्लेख करण्यात आला आहे. पण प्रभू रामाच्या जीवनाशी निगडीत एक पात्र आहे ज्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. तसेच या पात्राचा रामायणातही उल्लेख नाही. तुम्ही कधी प्रभू रामाच्या बहिणीबद्दल ऐकलं आहे का? नाही ना? चला तर मग जाणून घेऊया. 

प्रभू रामाच्या बहिणीचे नाव शांता आहे. ती रामाची थोरली बहिण होती. राजा दशरथाची एकुलती एक मुलगी शांता हिच्याबद्दल काही कथा प्रचलित आहेत.

कौशल्याने दिला मुलीला जन्म 

दक्षिण भारतातील रामायणानुसार, राजा दशरथ यांना तीन राण्या होत्या. पहिली राणी कौशल्या, दुसरी राणी सुमित्रा आणि तिसरी राणी कैकेयी होती. प्रभू राम हे राणी कौसल्येचे पुत्र होते. पण मुलगा रामच्या आधी आई कौसल्यानेही मुलगी शांताला जन्म दिला होता. शांता 4 भावांपेक्षा मोठी होती. तसेच ती कला आणि हस्तकलेत पारंगत होती. शांता खूप सुंदर होती. पण रामायणात शांताचा उल्लेख न येण्यामागे एक खास कारण होते.

हेही वाचा :  वाघिणीच्या बछड्याचे 'आदित्य' नाव ठेणवण्यास मुनगंटीवारांचा विरोध; दानवे म्हणाले, 'तरीही आदित्य जास्त तळपत राहील'

…म्हणूनच शांताचा उल्लेख नाही

वास्तविक, राजा दशरथ आणि राणी कौशल्याची कन्या शांता आपल्या कुटुंबासोबत फार काळ राहिली नाही. त्यामुळे रामायणात तिचा उल्लेख नाही. यामागेही एक कारण आहे. पुराणात सांगितल्या जाणाऱ्या कथेनुसार, राणी कौसल्येची थोरली बहीण वर्षिणी दीर्घकाळ निपुत्रिक होती. शांताच्या जन्मानंतर ती एकदा तिची बहीण कौशल्या हिला भेटायला आली. मग ती शांताकडे बघून म्हणाला कि मुलगी खूप गोंडस आहे. तिला दत्तक घ्यावं. हे वाक्य ऐकून राजा दशरथाने तिला आपली मुलगी दत्तक देण्याचे वचन दिले. रघुकुल हे नेहमीच ‘प्राण जातील पण वचन जाऊ देणार नाही’ या गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे. म्हणून राजा दशरथने आपले वचन पाळले आणि आपली मुलगी दत्तक घेतली.

आपले वचन पाळण्यासाठी भगवान रामांना 14 वर्षे वनवास भोगावा लागला होता. प्रभू रामाचे वडील दशरथ राजाने आपली पत्नी राणी कैकेयीला वचन दिले होते की ती कधीही दोन इच्छा मागू शकते. याचा फायदा घेऊन कैकेयीने रामाचा वनवास आणि आपला मुलगा भरतसाठी सिंहासन मागितले होते. 

शृंगी ऋषी यांच्याशी विवाह 

कथेनुसार, भगवान श्रीरामांच्या मोठ्या बहिणीचा विवाह श्रृंगी ऋषींशी झाला होता. हिमाचल प्रदेशातील कुल्लू येथे शृंगी ऋषींचे एक मंदिर आहे. जेथे ऋषी शृंगी आणि रामची बहीण शांता यांची पूजा केली जाते.

हेही वाचा :  दोन तरुणींसोबत एकाच वेळी लग्न करणाऱ्या तरुणाला कोर्टाकडून दिलासा; वाचा नेमकं काय घडलं..

(Disclaimer -वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. ‘झी २४ तास’ याची खातरजमा करत नाही.)



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Silent Heart Attack मुळे तरुणाचा मृत्यू! बाईक चालवताना अचानक भररस्त्यात पडला अन्..

Man Died By Silent Heart Attack Know Symptoms: मध्य प्रदेशमधील इंदूरमध्ये मंगळवारी एक धक्कादायक घटना …

Loksabha Election 2024 : बारामतीत मतदानाला थंड प्रतिसाद; तिसऱ्या टप्प्यातील एकूण आकडेवारी नेमकं काय खुणावू पाहतेय?

Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठीचं मतदान मंगळवारी पार पडलं. यावेळी देशातील 11 …