गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून पतीसोबत उभारली 8 हजार कोटींची कंपनी, कोण आहे उपासना?

Upasana Taku Success Story:  भारतात  महत्त्वाकांक्षी महिला व्यावसायिकांमध्ये उपासना टाकू हे नाव अग्रस्थानी आहे. 
सध्या फिनटेक क्षेत्रात वर्चस्व गाजवणाऱ्या त्या पहिल्या महिला व्यवसायिक आहेत. 17 वर्षांहून अधिक काळ त्यांनी संबंधित क्षेत्रात काम केले आहे. स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यापूर्वी त्यांनी अमेरिकन पेमेंट फर्म PayPal साठी उत्पादन व्यवस्थापक म्हणून काम केले. HSBC मध्ये नोकरीही होती. त्या पूर्व अमेरिकेत राहात होत्या. पण 2008 मध्ये स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याचे स्वप्न घेऊन त्या भारतात परतल्या आणि त्यांनी हे स्वप्न सत्यात उतरवलं. उपासना टाकू यांच्या यशाची कहाणी जाणून घेऊया.

उपासना टाकू या MobiKwik च्या सीईओ आणि बोर्ड चेअरमन आहेत. उपासना आणि त्यांच्या पतीने मिळून या व्यवसायाची स्थापना केली होती. पंजाब टेक्निकल युनिव्हर्सिटीमधून इंजिनीअरिंग पदवी पूर्ण केल्यानंतर त्यांनी स्टॅनफोर्ड विद्यापीठातून व्यवस्थापन विज्ञान आणि इंजिनीअरिंगमध्ये पदव्युत्तर पदवी प्राप्त केली.

Success Story: आईसोबत पोलपाट लाटणं विकायचा, संघर्ष करुन संगमनेरचा केवल बनला महाराष्ट्र पोलीस

अवास्तव क्षमता आणि समस्यांचा खजिना भारतात आहे. नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांनी इतर बाजारपेठांचीही तपासणी केली. त्यांना भारतच त्यासाठी उत्तम स्थान असल्याचे लक्षात आले. पुन्हा भारतात परतणे हे धोकादायक पाऊल ठरु शकते असे वाटल्याने उपासना यांच्या कुटुंबाने त्यांना भारतात येण्यास विरोध केला. त्यांचे वडील एरिट्रियामधील अस्मारा विद्यापीठातील भौतिकशास्त्राचे प्राध्यापक आणि आई संगीतकार आहे. ते दोघे त्यावेळी आफ्रिकेत राहत होते. ते 2009 मध्ये परत आले. आपल्या उद्योजक होण्याच्या महत्वाच्या टप्प्यावर त्या PayPal मध्ये कार्यरत होत्या. पण ते सोडून त्यांनी भारतात परतण्याचा निर्णय घेतला.  मोठे घर, कार आणि इतर गोष्टींसह सर्व सुखसोयी त्यांनी मागे सोडल्या.  जोखीम पत्करून ग्रामीण बिहार आणि उत्तर प्रदेशातील ग्रामीण मायक्रोफायनान्स एनजीओ दृष्टीसाठी काम करू लागल्या. 

हेही वाचा :  ED चौकशी करत असलेला Baramati Agro घोटाळा नेमका काय? रोहित पवारांशी काय कनेक्शन?

Bank Job: स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये भरती, मुंबईत नोकरी आणि 78 हजारपर्यंत पगार

पतीसोबत कंपनीची स्थापना

2008 मध्ये नाटक पाहताना तिची पहिली भेट पती बिपिन प्रीत सिंग यांच्याशी झाली; 2011 मध्ये त्यांचा विवाह झाला. 2008 मध्ये, MobiKwik चे सह-संस्थापक सिंग यांनी प्लॅटफॉर्मची संकल्पना विकसित केली. कुटुंबाची गरज असल्याने प्रीत सिंग नोकरी सोडू शकत नव्हते. उपासना यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा देऊन औपचारिकपणे स्टार्टअप सुरू करण्याचा अधिकार त्यांना दिला. 2009 मध्ये त्यांनी हा व्यवसाय सुरू केला.

MobiKwik कंपनीने आर्थिक वर्ष 2022-2023 च्या तिसऱ्या तिमाहीत नफा कमावण्यास सुरुवात केली.  महसूल दुप्पट करुन पूर्ण वर्षाचा नफा साध्य करण्याचे कंपनीचे उद्दीष्ट आहे. मोबीक्विक प्लॅटफॉर्मने 560 कोटी रुपयांची कमाई केल्याचे त्या सांगतात.   ‘बाय नाऊ पे लेटर’ प्रोग्रामने व्यवसायाला क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांची संख्या वाढवण्यास मदत केली.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Loksabha : तिसऱ्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, देशातील ‘या’ बड्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला

Loksabha Election 2024 : तिसऱ्या टप्प्यात म्हणजे 7 मे रोजी देशात 93 जागांवर मतदान होणार …

Loksabha : बारामतीच्या सभेत बोलताना रोहित पवारांना अश्रू अनावर, अजितदादांनी केली नक्कल, म्हणाले ‘आमच्या पठ्ठ्यानं…’

Rohit Pawar burst into tears : येत्या सात मे रोजी होणाऱ्या तिसऱ्या टप्प्यातील लोकसभेच्या (Loksabha Election) …