टीम इंडियाचा वेल्सवर 4-2 ने विजय, उपांत्यपूर्व फेरीत पोहोचण्यासाठी न्यूझीलंडचं आव्हान

Hockey WC 2023: भारतीय हॉकी संघानं वेल्सचा 4-2 च्या फरकानं पराभव करत विश्वचषकातील दुसरा विजय नोंदवला आहे. या विजयासह भारताच्या उपांत्यपूर्व फेरीत पोहोचण्याच्या आशा वाढल्या आहेत.  ग्रुप डीच्या अखेरच्या सामन्यात भारताने वेल्सचा पराभव केला. भारताचा हा दुसरा विजय आहे. याआधी भारताने स्पेनचा 2-0 च्या फरकाने पराभव केला होता. तर इंग्लंडविरोधातील सामना बरोबरीत  राहिला होता. (India vs Wales Match) भारत आणि वेल्स यांच्यातील ही लढत अतिशय रोमांचक झाली. मात्र अखेरच्या क्वार्टरमध्ये टीम इंडियानं बाजी मारली. उपांत्य पूर्व फेरीत पोहोचण्यासाठी आता भारतापुढे आता न्यूजीलंडच्य संघाचं आव्हान आहे. न्यूझीलंड आणि टीम इंडियामध्ये क्रॉस ओवर सामना होणार आहे. हा सामना 22 जानेवारी रोजी होणार आहे. 

कलिंगा स्टेडिअममध्ये झालेल्या सामन्यात भारतासाठी शमशेर सिंह आणि आकाशदीप सिंह यांनी गोल केले.  शमशेर सिंह याने भारतासाठी पहिला गोल केला. पहिल्या हाफमध्ये दोन गोलने आघाडी घेतली होती. पण तिसऱ्या क्वार्टरच्या अखेरीस वेल्सने जबरदस्त पुनरागमन केले.

ग्रुप डी मध्ये भारतीय संघ दुसऱ्या क्रमांकावर

पेनल्टी कार्नरवर गोल करत वेल्सने 2-2 ने बरोबरी केली. चौथ्या क्वार्टरमध्ये दोन गोल करत भारतीय संघानं हा सामना जिंकला. ग्रुप डी मध्ये भारतीय संघ दुसऱ्या क्रमांकावर आहे. तीन सामन्यात दोन विजयासह टीम इंडियानं सात गुणांची कमाई केली आहे. इंग्लंडचा संघ डी ग्रुपमध्ये आघाडीवर आहे. इंग्लंडकडे सात गुण आहेत. 

रंगतदार सामन्यात शमशेर सिंह याने टीम इंडियासाठी 21 व्या मिनिटाला पेनाल्टी कॉर्नरवर जबरदस्त गोल केला. शमशेर सिंह याच्यानंतर आकाशदीप याने लागोपाठ दोन गोल केले. आकाशदीप याने 32 व्या आणि 45 व्या मिनिटाला फील्ड गोल केले. चौथ्या क्वार्टरमध्ये टीम इंडियाच्या कर्णधाराने पेनाल्टी कॉर्नरवर गोल करत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. आकाशदीप सिंहला प्लेअर ऑफ दी मॅचचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. 

हेही वाचा :  आजची निर्णायक लढत नरेंद्र मोदी स्टेडियमवर, मैदानासंबधी या खास गोष्टी नक्की वाचा!

आणखी वाचा:
IND vs NZ Latest Bews Update : न्यूझीलंडनं सामना गमावला पण ब्रेसवेलनं मनं जिंकली, चाहत्यांनी ठोकला कडक सॅल्यूट

IND vs NZ Latest Bews Update : शुभमनचं वादळी द्विशतक अन् नेटकऱ्यांकडून सारा तेंडुलकर ट्रोल, काहींनी तर एंगेजमेंटची घोषणाच केली!



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

विराटचा फोन हरवल्यावर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया, झोमॅटोवाले म्हणतात ‘अनुष्काचा फोन वापर’

Virat Kohli Lost Phone tweet : भारतीय संघाचा (Team India) माजी भारतीय कर्णधार विराट कोहली …

IND vs AUS : केएस भरत की ईशान किशन? कोणाला मिळणार प्लेईंग 11 मध्ये जागा?

IND vs AUS, Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना …