या ५ आयुर्वेदिक भाज्यांमध्ये खच्चून भरलंय Protein,चिकन आणि अंड्याची गरजच भासणार नाही

शरीराच्या वाढीसाठी प्रथिने खूपच आवश्यक असतात. शरीरामध्ये प्रोटीनची कमतरता असल्यास स्नायू कमकूवत होतात आणि तुम्ही वृद्ध होऊ शकतात. प्रथिने शरीरामध्ये ऊतींचे बांधकाम आणि दुरुस्ती करतात, हार्मोन्सचे नियमन करतात आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतात. यामुळेच तुमच्या आहारात प्रथिन्यांचा समवेश करणे गरजेचे आहे. ज्याप्रमाणे कॅल्शियम किंवा जीवनसत्त्वे यांसारखी पोषक तत्त्वे शरीरासाठी आवश्यक असतात.
त्याचप्रमाणे प्रथिनेदेखील आवश्यक असतात. प्रथिनांच्या कमतरतेमुळे अशक्तपणा, स्नायूंचे नुकसान, थकवा, केस गळणे, त्वचा पातळ होणे, कमी रक्तदाब, अतिसार आणि इतर अनेक गंभीर आजार होऊ शकतात. आत प्रश्न राहतो तो म्हणजे प्रथिन्यांच्या कमतरतेवर कशी मत मिळवावी? प्रथिनांच्या कमतरतेपासून शरीराचे रक्षण करण्यासाठी, आपण प्रथिनेयुक्त पदार्थांचे सेवन केले पाहिजे. शाकाहारी आणि मांसाहारी गोष्टींमध्ये प्रथिने आढळतात.
आज 27 फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय प्रथिने दिवस national protein day साजरा केला जातो. यासाठी नोएडा येथील ई-260 सेक्टर 27 येथे असलेल्या ‘कपिल त्यागी आयुर्वेद क्लिनिक’चे संचालक डॉ. कपिल त्यागी यांनी आयुर्वेदातील अशा काही वनस्पती सांगितल्या आहेत ज्यामध्ये प्रथिन्यांचे प्रमाण सर्वाधिक असते. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या वनस्पती. (फोटो सौजन्य :- @Istock)

हेही वाचा :  डीपनेक ब्लाऊजमध्ये शाहरूखच्या लेकीचा जलवा

अश्वगंधा

अश्वगंधा

आयुर्वेदात अश्वगंधा ही एक शक्तिशाली औषधी वनस्पती मानली जाते. अश्वगंधा जणू संजीवनीचे काम करते. अनेक संशोधने असा दावा करतात की अश्वगंधा शरीरात शक्ती वाढवण्याची आणि हृदयाच्या श्वसनक्रिया सुधारण्याची क्षमता आहे. डॉक्टरांचा असा विश्वास आहे की हा प्रथिनांचा एक उत्तम स्रोत आहे आणि त्याचे नियमित सेवन कोर्टिसोलची पातळी कमी करण्यास, टेस्टोस्टेरॉनची पातळी वाढविण्यास, स्नायूंचा विकास आणि मजबूत करण्यास मदत करते. अश्वगंधाचा वापर तुम्ही तुमच्या दिनचार्यामध्ये करू शकता.

(वाचा – Vitamin D in India : विटामिन डी च्या अधिक सेवनाने हाडे होतील ढिसूळ, शरीरात तयार होतील दगड)

शतावरी

शतावरी

आयुर्वेदात अजून एक महत्त्वाची गोष्टी म्हणजे शतावरी ही स्नायूंच्या वाढीसाठी एक उत्तम आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. शतावरीचा वापर ऊर्जा वाढवण्याची, स्नायूंना बळकट करण्यासाठी केला जातो. यामध्ये असलेले स्टिरॉइडल सॅपोइन टेस्टोस्टेरॉनची पातळी वाढवण्यास शतावरीचा वापर केला जातो. तर अमीनो अॅसिडमुळे शरीरातील प्रथिने वाढवण्याचे काम करतात.

​(वाचा – Diet Plan For Men After 40 : चाळीशीनंतर हाडं होतात खिळखिळी, या ५ पदार्थांनी शरीर ठेवा तंदुरूस्त)​

हेही वाचा :  Honey for weight loss : आठवड्याभरात मेणासारखी वितळेल पोट, कंबर व मांड्यांवरची चरबी, मधात मिक्स करून खा ‘हे’ 6 पदार्थ!

​पांढरी मुसली

​पांढरी मुसली

पांढरी मुसली हा प्रथिनांचा उत्तम स्रोत आहे. फार पूर्वीपासून ही औषधी वनस्पती पुरुषांच्या लैंगिक विकारांवर उपचार करण्यासाठी वापरली जाते. जर तुम्ही स्नायू मजबूत करणारे औषध शोधत असाल तर तुमच्यासाठी पांढरी मुसली सर्वोत्तम पर्याय आहे.

कडू संत्रा

कडू संत्रा

आत पर्यांत तु्म्ही गोड किंवा आंबट संत्री पाहिली असतील पण कडू संत्री देखील असतात. या संत्र्यांचा आरोग्यासाठी खूप फायदा होतो. कडू संत्र्यामध्ये अल्कलॉइड्स असतात, जे स्नायूंचे नुकसान न करता चरबी कमी करण्याचे काम करतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, हा घटक चयापचय दर वाढवतो, ज्यामुळे कॅलरी बर्निंग वाढते. तुम्हाला मजबूत स्नायू हवे असतील तर याचे सेवन करा. त्यामुळे तुम्हाला जर वजन कमी करायचे असेल तर हे तुमच्यासाठी जालीम उपाय ठरू शकते.

गोखरू Tribulus terrestris

-tribulus-terrestris

गोखरू या आयुर्वेदिक औषधांमध्ये मूत्रपिंडाचे आजार, मधुमेह आणि अनेक विकारांसह अनेक परिस्थितींवर उपचार करण्यासाठी वापरले जाणारे औषधी वनस्पती आहे. या वनस्पतीमुळे कोणताही साइड इफेक्ट्स न होता टेस्टोस्टेरॉनची पातळी वाढते.
टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. हे कोणत्याही प्रकारे कोणत्याही औषधाचा किंवा उपचारांचा पर्याय असू शकत नाही. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

हेही वाचा :  ​PDF File डाउनलोड करताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर फोन होईल हॅक आणि खातं होईल रिकामं

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Raj Thackeray : ‘नारायण राणे मुख्यमंत्री झाले अन्…’, राज ठाकरेंनी भरसभेत घेतली फिरकी; सांगितला ‘तो’ किस्सा!

Raj Thackeray Kankavli Sabha : एकेकाळचे दोन शिवसैनिक आज तब्बल 20 वर्षांनी एकाच मंचावर दिसले. …

Maharastra Politics : कोकणात ‘ह्याका गाड, त्याका गाड’… तो काय गाडणार? ठाकरेंवर राणेंचा ‘प्रहार’

Uddhav Thackeray vs Narayan Rane : कोकणात लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं उद्धव ठाकरे विरुद्ध नारायण राणे …