प्रेमात केलेली ‘ही’ एक चूक येऊ शकते चांगलीच अंगलट, ढसाढसा रडल्यानंतरही पार्टनर करणार नाही भावनांचा आदर व किंमत

कोणतेही नाते हे दोन व्यक्तींनी मिळून बनते. त्यामुळच जर ते निभवायचे असेल तर दोघांकडून प्रयत्न होणे देखील तितकेच गरजेचे असते. जेव्हा दोघांपैकी केवळ एकच व्यक्ती नाते वाचवण्यासाठी धडपडत असतो आणि दुसऱ्या व्यक्तीला त्याची कदरही नसते तेव्हा अशा रिलेशनशिपचे भवितव्य काहीच नसते. हीच स्थिती खूप काळ राहिली तर नात्याशिवाय अन्य संबंध सुद्धा बिघडत जातात. एकवेळ अशी येते की दोन्ही व्यक्ती एकमेकांना एकमेकांचे शत्रू समजू लागतात.

अनेकदा जी व्यक्ती संवेदनशील असते ती भावनिकदृष्ट्या निखळून पडते. हे होऊ द्यायचे नसेल तर वेळीच नात्याची स्थिती ओळखायला हवी. अनेकांना हेच ओळखता येत नाही आणि त्याचा परिणाम म्हणून आयुष्य उध्वस्त होते. असे नाते हे अनेकदा एकतर्फी नाते म्हणूनच ओळखले जाते. आज आम्ही तुम्हाला असे काही संकेत सांगणार आहोत जे तुम्हाला नाते ओळखण्यात मदत करू शकतात. (फोटो सौजन्य :- iStock)

नेहमी तुम्हीच समजून घेत असाल तर

नेहमी तुम्हीच समजून घेत असाल तर

जर नात्यातील एकच व्यक्ती नेहमी तडजोड करत असेल तर नाते संबंध हळूहळू बिघडू लागतात आणि ते उध्वस्त व्हायला वेळ लागत नाही. तसेच या गोष्टीतून हेच दिसते की तुमचे नाते घट्ट नाही. उलट केवळ एका व्यक्तीमुळे ते टिकून असल्याने कमकुवत आहे. तडजोड करावी लागणे हे एकतर्फी प्रेमाचे सर्वात सामान्य लक्षण आहे. प्रेमात पडल्यानंतर तुम्ही जर सतत समजून घेत असाल वा तडजोड करत असाल तर सावधान व्हा. कारण जोडीदाराला सवय लागली तर तो त्याचा गैरफायदा घेऊ शकतो.
(वाचा :- ‘मी दिया मिर्झा शपथ घेते’ ओठांवर ओठ टेकून प्रेम व्यक्त करत मराठमोळ्या शब्दांत पतीचा स्वीकार,चाहत्यांकडून कौतुक)​

हेही वाचा :  '2024 ला राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री', जयंत पाटलांच्या विधानावर अजितदादांचा सुपला शॉट, म्हणतात...

ओढ फक्त तुम्हाला असेल तर

ओढ फक्त तुम्हाला असेल तर

कोणतेही नाते टिकवण्यासाठी दोन व्यक्तींचे समान प्रयत्न आवश्यक असतात. अशा परिस्थितीत, जर केवळ तुम्हीच तुमच्या जोडीदाराला भेटायला, किंवा संपर्कात राहायला, तुमच्या भावना शेअर करायला सांगत असाल, पण तो मात्र त्यासाठी काहीच प्रयत्न करत नसेल वा त्याला या गोष्टींची पर्वा नसेल तर हे देखील एकतर्फी नातेसंबंधाचे लक्षण आहे.
(वाचा :- प्रेमात पडण्याआधी समजून घ्या ग्रीन फ्लॅग म्हणजे काय.? या 5 संकेतावरूनच ओळखाल लग्न करण्यालायक आहे का तुमची निवड)​

नेहमी तुम्हीच चुकीचे ठरत असाल तर

नेहमी तुम्हीच चुकीचे ठरत असाल तर

जर तुमचा पार्टनर कोणत्याही चुकीची जबाबदारी घेत नसेल, आणि नेहमी तुम्हीच माफी मागावी आणि समजून घ्यावे अशी अपेक्षा करत असेल तर हे स्पष्टपणे एकतर्फी प्रेमाचे लक्षण आहे. कारण जर त्यालाही तुमचा आदर असेल तर प्रत्येकवेळी तो तुम्हाला चुकीचे ठरवणार नाही.

(वाचा :- सावधान..! ही 3 लोकं दुस-याचा पार्टनर हिरावून घेण्यात असतात माहीर, मित्र-मैत्रीण बनून उद्धवस्त करतात सुखी संसार)​

वारंवार स्वत:ला सिद्ध करणे

वारंवार स्वत:ला सिद्ध करणे

एकतर्फी नात्यात समोरची व्यक्ती तुम्हाला अशा स्थितीत आणते की तुम्ही स्वतःचे महत्त्व विसरता. तुम्हाला या नात्यात राहायचे आहे की नाही हे माहित नसते पण तरीही जोडीदारासाठी स्वत:ला पुन्हा पुन्हा सिद्ध करत असला तरहे सुद्धा एकतर्फी नात्याचे लक्षण आहे आणि अशा नात्यामधून तुम्ही जास्त अपेक्षा करू शकत नाहीत.

हेही वाचा :  Chandrakant Patil : चंद्रकात पाटील यांच्या वादग्रस्त वक्तव्याचे तीव्र पडसाद

(वाचा :- Valentine Day: सदगुरूंनी दिल्या प्रेम-नात्याच्या 5 भन्नाट ट्रिक्स, फॉलो केल्यास तुमच्या प्रेमात आंधळे होईल जग)​

एकटेपणा जाणवणे

एकटेपणा जाणवणे

जर तुम्ही एकतर्फी नात्यात असाल तर तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून कधीच भावनिक आधार मिळणार नाही. जेंव्हा तुम्ही तुमच्या मनातील गोंधळ त्याच्याशी शेअर घेण्याचा प्रयत्न कराल तेंव्हा ट एकत्र ग्तुम्हला इग्नोर करेल किंवा वरवर दिलासा देईल. पण मनापासून तो कधीच तुमची गोष्ट एकून घेणार नाही कारण त्याच्यासाठी तुमच्या फिलिंगला किंमत नसेल. त्यामुळे असे काही होत असेल तर हे देखील एकतर्फी नात्याचे लक्षण आहे व अशा नात्यातून तुम्ही वेळीच बाहेर पडले पाहिजे.
(वाचा :- आम्ही रोमॅंटिक डेटवर गेलो, रात्रंदिवस चॅटिंग केली, सुखी संसाराची स्वप्न रंगवली अन् एके दिवशी अचानक भयानक..!)​

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

मुंबईत मराठी-गुजराती वाद पेटला! आदित्य ठाकरे आक्रमक; मराठी उमेदवाराला प्रचार न करु दिल्याचा आरोप

Loksabha Election 2024 : नोकरीसाठी मराठी माणूस नको ही एका एचआरची पोस्ट व्हायरल झालेली असतानाच …

‘बाळासाहेब असते तर उबाठाला धू धू धुतलं असतं’ सीएम शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना असं का म्हटलं?

Shinde vs Thackeray : ‘काँग्रेस नेते विजय वड्डेटीवार यांनी मुंबई 26/11 हल्ल्यातील (Mumbai 26/11) शहिद …