हे वाचा-राम, कृष्ण आणि गांधींप्रमाणे तुम्ही… कंगनाची पंतप्रधान मोदींच्या वाढदिवशी खास पोस्ट
काय आहे शाहरुखची पोस्ट
शाहरुखने पंतप्रधानांना एक दिवस सुट्टी घेण्याचा सल्ला देत अशी बर्थडे पोस्ट केली आहे की, ‘देशाच्या आणि देशातील नागरिकांच्या कल्याणासाठी तुमचे समर्पण खरोखर वाखाणण्याजोगे आहे. तुमची सर्व ध्येय पूर्ण करण्यासाठी तुम्हाला शक्ति आणि आरोग्य लाभो. सर, एक दिवस सुट्टी घ्या आणि तुमचा खास दिवस एन्जॉय करा. वाढदिवसाच्या शुभेच्छा.’ सोशल मीडियावर ही पोस्ट व्हायरल होते आहे.
शाहरुख खान का होतोय ट्रोल?
पंतप्रधानांसाठी अशी पोस्ट केल्यानंतर शाहरुखला ट्रोल केले जाते आहे. किंग खानच्या या पोस्टवर अशा कमेंट्स येतायंत की, शाहरुखचा पठाण सिनेमा येत असल्यामुळे बॉयकॉटपासून वाचण्यासाठी त्याने ही पोस्ट केली आहे. एका ट्विटर युजरने म्हटले आहे की, ‘तू यावर्षी आणि गेल्यावर्षी सोडून कधी ती पंतप्रधान मोदींनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या नाहीस. मग आता काय बदललं? आता पठाण सिनेमा येतोय ना…’. काही युजरनी त्याचा ममता बॅनर्जींसोबतचा फोटो शेअर करत त्याला ट्रोल केले आहे.
हे वाचा-हे काय! भरपूर मानधन घेऊनही सनी देओलने दिला काम करण्यास नकार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बॉलिवूडमधील विविध कलाकारांनी शुभेच्छा दिल्या आहेत. अक्षय कुमार, कंगना रणौत, विवेक अग्निहोत्री, अनुपम खेर, अजय देवगण, शंकर महादेवन, सनी देओल, रितेश देशमुख, अभिषेक बच्चन, आलिया भट्ट इ. आणि बॉलिवूडमधील विविध दिग्गज कलाकारांनी पंतप्रधानांना शुभेच्छा दिल्या आहेत.
Source link
MajhiNews Marathi News, Latest Marathi News, Marathi News Paper, Maharashtra Breaking News | मराठी ताज्या बातम्या