Natural Herbs For Thyroid : थंडीमुळे थायरॉइड बळावतो, घरच्या घरी या ५ उपयांनी मिळवा hyperthyroidism नियंत्रण

जर तुम्ही थायरॉईडचे रुग्ण असाल तर हिवाळा तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकतो. वातावरण थंड असेल तर थायरॉइडचा आणखी त्रास होऊ शकतो. याचे कारण असे की, तापमान कमी होत असताना, तुमच्या थायरॉईडला योग्यरित्या कार्य करण्यासाठी अधिक मेहनत करावी लागते. थंड हवामानामुळे तुमच्या शरीराची थायरॉईड संप्रेरकांची गरज वाढू शकते आणि तुमची लक्षणे वाढू शकतात.

थायरॉईड टाळण्यासाठी कोणते उपाय आहेत? थकवा, बद्धकोष्ठता, कोरडी त्वचा, वजन वाढणे, डोळे सुजणे, स्नायू दुखणे, ह्दयस्पंदन वेग कमी होणे यासारखी थायरॉईड आजाराची लक्षणे थंडीमध्ये अधिक तीव्र होत असतात. त्यामुळे काही गोष्टींची विशेष काळजी घ्यावी, असे तज्ञांचे म्हणणे आहे. उदाहरणार्थ, ब्ल्यूज टेस्ट वेळेवर करा, औषधांची काळजी घ्या, उन्हात बसा, शारीरिक हालचालींकडे लक्ष द्या, मिठाई किंवा गोड पदार्थ टाळा, पुरेशी झोप घ्या आणि तणाव टाळा.

​थायराइडवर रामबाण उपाय आहेत ही औषधे

वर नमूद केलेल्या उपायांव्यतिरिक्त, काही औषधी वनस्पती आहेत. ज्या थायरॉईडचे नियंत्रण आणि उपचार चांगल्या प्रकारे करू शकतात. आम्ही तुम्हाला अशाच काही औषधी वनस्पतींबद्दल सांगत आहोत. ज्या थायरॉईडचे कार्य सुधारण्यास आणि तुमची लक्षणे कमी करण्यास मदत करू शकतात.

हेही वाचा :  लाल रंगाच्या गाऊनमध्ये आमिर खानची मुलगी आयराची एंगेजमेंट, किरण रावचा साधा लूक पाहून हडबडून जाल

(वाचा – Stroke Sign : स्ट्रोक येण्याच्या ७ दिवस आधीच दिसतात ही ८ लक्षणं, वेळेत जाणून घ्या नाहीतर जीवावर बेतेल))

​अश्वगंधा

अश्वगंधा ही अशीच एक औषधी वनस्पती आहे, ज्याचे अनेक फायदे आहेत. एनसीबीआयच्या अहवालानुसार, त्यात दाहक-विरोधी, न्यूरोप्रोटेक्टिव्ह, अॅडाप्टोजेनिक, हेमॅटोपोएटिक, झोप वाढवणारे आणि चिंता-मुक्त करणारे गुणधर्म आहेत. 2019 मधील संशोधन असे सूचित करते की, अश्वगंधा अर्क वापरल्याने ऑक्सिडेटिव्ह तणाव कमी करून थायरॉईड संप्रेरकांचे उत्पादन सुधारण्यास मदत होऊ शकते. अश्वगंधाच्या सेवनाने तुमचा थायरॉइड घरगुती उपायांनी कंट्रोलमध्ये राहू शकतो.

(वाचा – Kidney Stones आणि फुफ्फुसाची घाण साफ करण्यासाठी घरीच तयार करा २ पदार्थ, काही दिवसांत मिळेल आराम)

​आले

आले हा केवळ मसाला नसून एक औषधी वनस्पती आहे. आल्याचे अनेक आरोग्य फायदे आहेत. ज्यामध्ये दाहक-विरोधी, अँटिऑक्सिडेंट आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म आहेत. यामुळे थायरॉईड ग्रंथीचे कार्य सुधारते. ही औषधी वनस्पती वजन कमी करू शकते आणि लिपिड आणि हार्मोन प्रोफाइल नियंत्रित करू शकते. आल्याचा घरगुती उपाय म्हणून वापर करून थायरॉइडवर नियंत्रण मिळवा.

(वाचा- Flax Seeds For Diabetes : साखर कंट्रोल करण्यासाठी अळशी गुणकारी, इन्सुलिन घ्यावच लागणार नाही)

हेही वाचा :  100 मीटर स्पर्धेत खेळाडूने देशाची लाज काढली! क्रीडा मंत्र्यांवर जाहीर माफी मागण्याची वेळ; पाहा VIDEO

अगरवुड

त्याला आगर किंवा अगरवुड असेही म्हणतात. आगर ही आयुर्वेदातील सर्वात खास आणि महत्त्वाची औषधी वनस्पती आहे. परफ्यूमसह अनेक गोष्टी बनवण्यासाठी याचा वापर केला जातो. पारंपारिक औषधांमध्ये, ही वनस्पती थायरॉईड कर्करोगासाठी चांगली मानली जाते. अगरवुडमध्ये अँटिऑक्सिडंट असतात जे अनेक कर्करोगाच्या पेशींसाठी हानिकारक असतात.

वाचा – Causes of Belly Fat: दररोज पोटावरची चरबी वाढतेय, शर्टच्या बटनातून ढेरी डोकावतेय? तुमच्या ७ चुकाच याला कारणीभूत)

​जिरे

जिरे आपल्या घरी अगदी सहज मिळू शकते. जिऱ्यामध्ये फायटोकेमिकल्स आणि जैविक घटक असतात जे शरीरातील विविध कार्ये सुधारतात. 2016 मध्ये, थायरॉईडाइटिसवर काळ्या जिऱ्याच्या प्रभावावर एक अभ्यास करण्यात आला. असे आढळून आले आहे की, जिरे सामान्यतः थायरॉईड स्थिती सुधारू शकतात. त्यामुळे तुम्ही आहारातही याचा समावेश करू शकतो.

(वाचा – Juice For Weight Loss : लठ्ठपणामुळे सगळीकडून लोंबकळते चरबी, या ५ ज्यूसने झपाट्याने कमी होईल वजन)

​ ससुरिया कोट्स

जिर्‍याचे रोप हे गाजरासारखे असते. ज्याचे देठ जाड आणि तंतुमय असते. त्याची मुळं गाजरासारखी बाहेरून असतात. सौदी अरेबियातील लोक याचा मोठ्या प्रमाणावर वापर करतात. या औषधी वनस्पतीमध्ये अँटिऑक्सिडेंट गुणधर्म आहेत आणि त्यात फ्लेव्होनॉइड्स आहेत. काही संशोधनांमध्ये हे औषधी वनस्पती थायरॉईडचे व्यवस्थापन करण्यासाठी प्रभावी असल्याचे आढळले आहे.

हेही वाचा :  Maharashtra Budget 2023 : सामान्यांना मोठा दिलासा, ज्योतिराव फुले योजनेत आता 5 लाखांपर्यंत उपचार

(वाचा- Diabetes च्या रुग्णांकरता अमृतासमान आहेत हे ५ हर्ब्स, डायबिटिजसह हृदयाची समस्याही राहील नियंत्रणात))

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

राज ठाकरे खरंच दुपारी झोपेतून उठतात का? स्वत: खुलासा करत म्हणाले, ‘माझ्याबद्दल…’

Raj Thackeray Morning Wake Up Time: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे सध्या त्यांनी लोकसभा …

महाराष्ट्रातले उद्योगधंदे गुजरातला कसे गेले? राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना सवाल

Raj Thackeray Kankavli Slams Uddhav Over His Comment On Gujrat: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी …