लाल रंगाच्या गाऊनमध्ये आमिर खानची मुलगी आयराची एंगेजमेंट, किरण रावचा साधा लूक पाहून हडबडून जाल

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखल्या जाणारे आमिर खानची मुलगी आयरा खान (Ira Khan) हिचा बॉयफ्रेंड नुपूर शिखरेबरोबर मुंबईत एंगेजमेंट सोहळा पार पडला. आयरा खान ही अभिनेता आमिर खान आणि त्याची पहिली पत्नी रीना दत्ता यांची मुलगी आहे. 1997 मध्ये आयराचा जन्म झाला होता. आयरा ही सध्या इंटरनेट सेन्सेशन बनली आहे आणि सोशल मीडियावर तिचे खूप मोठे चाहते आहेत. अभिनेता असणाऱ्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवण्याऐवजी, आयराने दिग्दर्शक म्हणून कॅमेऱ्याच्या मागे स्वतःसाठी एक स्थान निर्माण केले आहे. या एंगेजमेंटच्या निमित्ताने एका भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यामध्ये आयराने लाला रंगाचा सुंदर ड्रेस परिधान केला होता. या शाही सोहळ्याला आमिर खानसह संपूर्ण कुटुंबियांची उपस्थिती पाहायला मिळाली. आयरा खानच्या लूकला पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या. या परफेक्ट लूकसाठी तिने सुंदर दागिने देखील घातले होते.या सोहळ्याचे काही फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत. (फोटो सौजन्य : @etimes , @NBT)

हेही वाचा :  पाकिस्तानी अभिनेत्री उस्ना शहा लग्नबंधनात अडकली; भारतीय नववधूचा लूक केल्याने ट्रोल

​आयराचे दागिने

यावेळी आयराने लाल रंगावर जाईल अशी सिल्वर ज्वेलरी परिधान केली होती. यावेळी तिने गळ्यात एक चोकर परिधान केला होता. तर हातामध्ये तिने कडे देखील घातले होते. (वाचा :- प्राजक्ता माळीचा निळ्याशार ड्रेसमध्ये पारंपारिक लूक, चाहते म्हणतात ”निले निले अंबरपर चांद जब आए”)

​आयरा खानचा ड्रेस

या शाही कार्यक्रमामध्ये आयराने लाला रंगाचा डीपनेक ड्रेस परिधान केला होता. या प्लेन गाऊनमध्ये आयरा खूपच सुंदर दिसत होती. या गाऊनला दिलेल्या नेकलाईन सर्वांचे लक्ष वेधून घेतले. (वाचा :- लिंबू कलरच्या ड्रेसमध्ये सई ताम्हणकरचा हॉट अंदाज, चाहते म्हणतात ‘मराठीतली उर्फी नको बनूस’)

​नुपूर शिखरेचा असा होता लूक

यावेळी नुपूर शिखरेने थ्री पिस परिधान केला होता. यामध्ये तो खूपच हॅन्डसम दिसत होता. यावेळी त्याने ब्लकरंगाचा सुट घातला होता. त्याच प्रमाणे यावेळी त्यांने बो लावून त्याने त्याचा लूक पूर्ण केला. (वाचा :- त्या रात्री रडून मला श्वास घेणं ही कठीण झालं होतं, दुसऱ्या मुलीसाठी त्याने मला सोडलं, जे झालं ते ऐकून हादरुन जाल)

​आमिर खानच्या लूकवर विशेष चर्चा

लेकीच्या एंगेजमेंट सोहळ्यासाठी आमिर खाननेही विशेष तयारी केली होती. या सोहळ्या दरम्यान आमिर खानने पांढऱ्या रंगाचा कुर्ता पायजमा परिधान केला होता. त्याचबरोबर या लूकला आमिर खानची पांढरी दाढीही शोभून दिसत होती. या लूकला शोभेल असा आमिरने काळ्या रंगाचा गॉगलही घातलेला दिसला. एकंदरीतच आमिरच्या या हटके लूकची त्याच्या चाहत्या वर्गात चर्चा होतेय. (वाचा :- लाखोंचे जॅकेट आणि पर्स घेऊन, Kareena Kapoor ची लंडन स्वारी, पर्सची किंमत ऐकून म्हणाल यात तर एक घर येईल)

हेही वाचा :  Health tips : भाजीतून कडीपत्ता काढून टाकता का? 'हे' आहेत त्याचे आरोग्यदायी फायदे

​किरण रावचा सिम्पल लूक

यावेळी किरणने ब्लू रंगाची हॅन्डलूमची साडी परिधान केली होती. यावेळी तूने ग्लॉगल लावून तिचा लूक पूर्ण केला. तिच्या या साध्या लूकला पाहून सर्वांनी आश्चर्य व्यक्त केले. यामध्ये आमिर खान, किरण राव, आयराचा भाऊ जुनैद खान, आझाद राव खान यांच्यासह जवळची मित्र मंडळीही उपस्थित होती. (वाचा :- वन शोल्डर ड्रेसमध्ये भूमी पेडणेकरच्या मादक अदा, चाहते म्हणतात हॉटनेस म्हणजे तुच)

​ऑक्टोबरमध्ये रिंग देऊन केले प्रपोज

आयरा खान आणि नुपूर शिकरे हे दोघे एकमेकांना दोन वर्षांपासून डेट करतायत. एका कार्यक्रमादरम्यान नुपूरने आयराला रिंग देऊन प्रपोजदेखील केले आणि गुडघ्यावर बसून, अंगठी देऊन लग्नाची मागणी घातली होती. या प्रसंगाचा व्हिडीओदेखील सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. (वाचा :- अतरंगी कपड्यात एली अवरामचा ग्लॅमरस अवतार, लूक पाहून तुम्ही ही म्हणाल हिने तर उर्फीलापण मागे टाकलं)

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

मावळचे अब्जाधीश खासदार श्रीरंग बारणे झाले दहावी पास, म्हणाले ‘आता पुढील शिक्षण…’

Shrirang Barane Passed SSC Exam : शिक्षण घेण्यासाठी वयाची मर्यादा नसते, माणूस आयुष्यभर विद्यार्थी दशेतच …

अजित पवारांना वाहतुकीच्या नियमाचा विसर, पुण्यात उलट दिशेने चालवली वाहने

Ajit Pawar Violated Traffic Rules : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात वाहतुकीचे नियम मोडल्याचे समोर आलं …