IND vs BAN : भारत विरुद्ध बांगलादेश पहिली टेस्ट मॅच, कधी कुठं पाहाल सामना?

India vs Bangladesh Match Live Streaming : भारतीय क्रिकेट संघ (Team India) सध्या बांगलादेश दौऱ्यावर असून दौऱ्यातील एकदिवसीय सामने पार पडले असून आता कसोटी सामने भारत खेळवले जाणार आहेत. एकदिवसीय मालिकेत भारत 2-1 ने पराभूत झाला असून आता कसोटी मालिकेत कशी कामगिरी करतो? हे पाहावे लागेल. कसोटी मालिकेत एकूण दोन सामने खेळवले जाणार आहेत. यातील पहिला सामना आजपासून सुरु होत आहे. कसोटी सामन्यांचा वर्ल्ड कप अर्थात वर्ल्ड टेस चॅम्पियनशिपच्या दृष्टीनं ही कसोटी मालिका महत्त्वाची आहे. तर मालिकेतील पहिल्या सामन्याबद्दलची माहिती जाणून घेऊ…

कधी होणार सामना?

भारत विरुद्ध बांगलादेश हा पहिल्या कसोटी सामना आज अर्थात 14 डिसेंबर रोजी होणार आहे. भारतीय वेळेनुसार सकाळी 9 वाजता सामना खेळवला जाईल. त्यापूर्वी अर्धातास आधी नाणेफेक होणार आहे. 

कुठे आहे सामना?

News Reels

हा भारत विरुद्ध बांगलादेश पहिल्या कसोटी सामना बांगलादेशच्या चटोग्राम येथील झहूर अहमद चौधरी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.  

कुठे पाहता येणार सामना?

भारत विरुद्ध बांगलादेश पहिल्या कसोटी सामन्याचं लाईव्ह टेलिकास्ट सोनी स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध चॅनलवर होईल. तसेच Sony Liv अॅपद्वारे या सामन्याचं लाईव्ह स्ट्रिमिंग पाहता येऊ शकतं. याशिवाय https://marathi.abplive.com/ येथेही तुम्हाला सामन्याचे अपडेट्स पाहता येतील.   

हेही वाचा :  तैजूल इस्मालनं टाकला असा चेंडू की विराट झाला कन्फ्यूज; अवघ्या एका धावेवर गमावली विकेट

भारताचा कसोटी संघ:
केएल राहुल (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (विकेटकिपर), केएस भरत (विकेटकिपर), रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, उमेश यादव, अभिमन्यू, नवदीप सैनी, सौरभ कुमार, जयदेव उनादकट.

बांगलादेश संघ:
शकीब अल हसन (कर्णधार), महमुदुल्लाह, लिटन दास, खालिद अहमद, नजमुल हुसेन शांतो, नुरुल हसन, इबत हुसेन, मोमिनुल हक, मेहंदी हसन मिर्झा, शरीफुल इस्लाम, यासिर अली, तैजुल इस्लाम, झाकीर हसन, मुशफिकर रहिम , तस्किन अहमद, रेहमान रझा, अनामूल हक.

कसं आहे कसोटी मालिकेचं वेळापत्रक?

भारत आणि बांगलादेश यांच्यातील पहिली कसोटी 14 ते 18 डिसेंबर दरम्यान झहूर अहमद चौधरी स्टेडियम येथे खेळवली जाणार आहे. तर दुसरी आणि अंतिम कसोटी 22 ते 26 डिसेंबर दरम्यान ढाका येथील मीरपूर येथील शेर-ए-बांगला स्टेडियमवर खेळवली जाईल. या स्टेडियममध्ये तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेचे सामने खेळले गेले होते, ज्यामध्ये भारताला 2-1 नं पराभवाचा सामना करावा लागला.

हे देखील वाचा-

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

विराटचा फोन हरवल्यावर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया, झोमॅटोवाले म्हणतात ‘अनुष्काचा फोन वापर’

Virat Kohli Lost Phone tweet : भारतीय संघाचा (Team India) माजी भारतीय कर्णधार विराट कोहली …

IND vs AUS : केएस भरत की ईशान किशन? कोणाला मिळणार प्लेईंग 11 मध्ये जागा?

IND vs AUS, Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना …