IND vs BAN Live Streaming : भारत विरुद्ध बांगलादेश दुसरी वन-डे मॅच, कधी कुठं पाहाल सामना?

India vs Bangladesh Match Live Streaming : भारतीय क्रिकेट संघ (Team India) सध्या बांगलादेश दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात भारत तीन एकदिवसीय आणि दोन कसोटी सामने खेळणार आहे. दरम्यान एकदिवसीय मालिकेला 4 डिसेंबरला सुरुवात झाली असून पहिल्याच सामन्यात भारताला एका विकेटने पराभव स्वीकारावा लागला. अगदी रोमहर्षक अशा सामन्यात भारताचा अवघ्या एका विकेटने पराभव झाला. बांगलादेशच्या मेहदी हसनने उत्कृष्ट खेळी करत मुस्तफिजूरसोबत मिळून शेवटच्या विकेटसाठी अर्धशतकी भागिदारी करत सामना बांगलादेशसाठी जिंकला. आता दुसरा एकदिवसी सामना खेळवला जाणार आहे. तर या दुसऱ्या एकदिवसीय सामन्याबद्दलची माहिती जाणून घेऊ…

कधी होणार सामना?

भारत विरुद्ध बांगलादेश हा दुसरा एकदिवसीय सामना उद्या अर्थात 7 डिसेंबर रोजी होणार आहे. भारतीय वेळेनुसार सकाळी 11 वाजून 30 मिनिटांनी सामना खेळवला जाईल. त्यापूर्वी अर्धातास आधी नाणेफेक होणार आहे. 

कुठे आहे सामना?

News Reels

हा भारत विरुद्ध बांगलादेश पहिला एकदिवसीय सामना बांगलादेशच्या ढाका येथील शेर ए बांग्ला क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.  

कुठे पाहता येणार सामना?

भारत विरुद्ध बांगलादेश दुसऱ्या एकदिवसीय सामन्याचं लाईव्ह टेलिकास्ट सोनी स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध चॅनलवर होईल. तसेच Sony Liv अॅपद्वारे या सामन्याचं लाईव्ह स्ट्रिमिंग पाहता येऊ शकतं. याशिवाय https://marathi.abplive.com/ येथेही तुम्हाला सामन्याचे अपडेट्स पाहता येतील.   

हेही वाचा :  '...तर Burnol लाव', वसीम जाफरच्या रिप्लायनं मायकल वॉनची बोलतीच बंद

भारताचा एकदिवसीय संघ: 

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शिखर धवन, विराट कोहली, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, राहुल त्रिपाठी, ऋषभ पंत (विकेटकिपर), इशान किशन (विकेटकिपर), शाहबाज अहमद, अक्षर पटेल ,वॉशिंग्टन सुंदर , शार्दुल ठाकूर , मोहम्मद. सिराज, दीपक चहर, कुलदीप सेन, उमरान मलिक.

बांगलादेश एकदिवसीय संघ:

लिटन दास (कर्णधार), नजमुल हुसेन शांतो, यासिर अली, शकीब अल हसन, महमुदुल्ला, मेहदी हसन मिराझ, अफिफ हुसैन ध्रुबो, इबादोत हुसेन, अनामूल हक, मुशफिकुर रहीम (विकेटकीपर), नुरुल हसन, हसन महमूद, मुस्तफिजुर रहमान, मुस्तफिजुर रहमान, आणि तस्किन अहमद.

भारत विरुद्ध बांगलादेश उर्वरीत वन डे सामन्यांचं वेळापत्रक






सामना तारीख ठिकाण
दुसरा एकदिवसीय सामना 7 डिसेंबर शेर ए बांग्ला, ढाका
तिसरा एकदिवसीय सामना 10 डिसेंबर  शेर ए बांग्ला, ढाका

हे देखील वाचा-

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

विराटचा फोन हरवल्यावर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया, झोमॅटोवाले म्हणतात ‘अनुष्काचा फोन वापर’

Virat Kohli Lost Phone tweet : भारतीय संघाचा (Team India) माजी भारतीय कर्णधार विराट कोहली …

IND vs AUS : केएस भरत की ईशान किशन? कोणाला मिळणार प्लेईंग 11 मध्ये जागा?

IND vs AUS, Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना …