Kirit Somaiya : अनेकांचे घोटाळे उघड करणाऱ्या किरीट सोमय्या यांच्या कार्यालयातच मोठा घोटाळा

Kirit Somaiya News : महाविकास आघाडी सरकारचे घोटाळे उघड करणारे भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्या कार्यालयातच घोटाळा झाल्याचा समोर आले आहे .कार्यालयातीलच दोघांनी मिळून संगनमत करून श्रवणयंत्र मशिनमधील वाटपात घोटाळा केल्याचं उघड झाले आहे. 

जवळपास सात लाखांचा अपहार केल्याप्रकरणी सोमय्या यांच्या कार्यालयातील दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. प्रज्ञा गायकवाड आणि श्रीकांत गावित अशी फसवणूक करणा-यांची नावं आहेत. या संदर्भात नगर पोलिसांनी दोघांना नोटीस देऊन यापुढील तपास सुरू केला आहे. 

उद्धव ठाकरे आणि त्यांचे पार्टनर आमदार रवींद्र वायकर यांच्यावर सोमय्यांचा आरोप

किरीट सोमय्यांनी उद्धव ठाकरे आणि त्यांचे पार्टनर आमदार रवींद्र वायकर यांच्यावर नवा आरोप केला आहे. जोगेश्वरी विक्रोळी लिंकवर सुरू असलेल्या हॉटेल बांधकामात सुमारे 500 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप सोमय्यांनी केला आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना 23 ऑगस्ट 2021 रोजी त्यांनी या घोटाळ्याला मान्यता दिली, असं सांगतानाच याप्रकरणी वायकर लवकरच जेलमध्ये जातील, असा दावाही किरीट सोमय्य यांनी केला आहे.

संजय राऊत यांचे जवळचे सहकारी बाळा कदम यांना अटक करण्यात आली. 100 कोटींच्या कथित कोविड सेंटर (Covid center scam) घोटाळा प्रकरणी ही मोठी कारवाई करण्यात आली आहे. भाजप नेते किरीट सोमय्या  यांनी हा घोटाळ्याचा आरोप केला होता. संजय राऊत यांचे भागीदार सुजित पाटकर यांचा कथित लाईफलाईन हॉस्पिटल सर्व्हिसेस कंपनीचा, शंभर कोटींचा कोविड सेंटर घोटाळा प्रकरणी ही अटक करण्यात आली आहे. कदम यांच्यासह राजीव साळुंखे या आणखी एकालाही अटक करण्यात आली. आर्थिक गुन्हे शाखेनं ही कारवाई केली.

हेही वाचा :  40 हजार 446 कोटींचा फटका! भारताशी पंगा घेणं कॅनडला खरंच पडणार 'महागात'

साधारण वर्षभरापूर्वीच म्हणेजच फेब्रुवारी 2022 मध्ये भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी हा घोटाळा उघडकीस आणला होता. संजय राऊत आणि त्यांच्या मित्रपरिवाराने 100 कोटी रुपयांचा जंबो कोविड सेंटर घोटाळा केल्याचा आरोप सोमय्या यांनी केला होता. राऊत यांच्याशी संबंधीत असलेले भागिदार सुजीत पाटकर यांची बनावट, कागदी कंपनी असल्याचा दावा करत किरीट सोमय्यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडे केली होती. 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘मुंबईत गिरगावमध्ये नोकरीची संधी पण मराठी उमेदवार नको’; महिला HR ची संतापजनक पोस्ट

HR LinkedIn Post Related to Marathi People : सध्या सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत …

देवीच्या जागरणात अघटित घडलं! काली मातेच्या भूमिकेतील मुलाकडून चुकून 11 वर्षांच्या मुलाची हत्या

Crime News Today: उत्तर प्रदेशच्या देवी जागरणचा एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात …