Breaking News

Nagpur University Exams 2022: MCQ च्या दृष्टीने नागपूर विद्यापीठाची वाटचाल

म.टा. प्रतिनिधी, नागपूर

राज्यातील विद्यापीठ परीक्षांमध्ये एकसूत्रता यावी, यासाठी एकसमान परीक्षापद्धती राबविण्याच्या दृष्टीने विचार करावा, असा आदेश उच्च न्यायालयाने उच्च व तंत्र शिक्षण विभागाला दिला असला, तरी एकसूत्रतेबाबत अद्याप कोणताच निर्णय न झाल्याने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने ऑफलाइन बहुपर्यायी प्रश्नपद्धतीच्या (MCQ) निर्णयावर ठाम राहत त्यादृष्टीने वाटचाल सुरू ठेवली आहे.

परीक्षा सुरळीत पार पडावी, यासाठी विद्यापीठातर्फे गुरुवारी नागपूर आणि नागपूर ग्रामीण मधील सर्व विभाग प्रमुखांसोबत बैठक घेण्यात आली. यामध्ये परीक्षेसंबंधी आवश्यक सूचना महाविद्यालयांना देण्यात आल्या. दोन सत्रांमध्ये ही बैठक झाली. पहिल्या बैठकीला ३७५ विभागप्रमुख उपस्थित होते; तर दुसऱ्या सत्रात ग्रामीणमधल्या १७० पेक्षा अधिक विभाग प्रमुखांनी हजेरी लावली. यावेळी कुलगुरू सुभाष चौधरी आणि प्र-कुलगुरू संजय दुधे यांनी मार्गदर्शन केले.

University Exams: एमसीक्यू पद्धतीने ऑफलाइन परीक्षा घ्याव्यात

तत्पूर्वी, पदवी अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा बुधवार, ८ जूनपासून तर पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाची परीक्षा १५ जूनपासून सुरू करण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे. प्रथम वर्ष व अंतिम वर्ष वगळून इतर सर्व वर्षाच्या सम सत्रातील परीक्षा २२ जूनपासून होतील.

नागपूर विद्यापीठ उन्हाळी परीक्षा: कॉलेजांनाच द्यावे लागणार प्रश्नसंच

Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.
@majhinews1
Previous जनतेच्या मनातल्या मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली ही भावना, म्हणाल्या… करून दाखवते…
Next Shweta Tiwari : उफ़ तेरी अदा ! ऑफ शोल्डर ड्रेसमध्ये ४० वर्षांच्या श्वेता तिवारीने केले हॉट फोटोशूट, सोशल मीडियावर नुसती हिरवळ

Check Also

आता तुम्हालाही लावता येईल पावसाचा अंदाज, हवामान खात्यात नोकरीसाठी ‘येथे’ पाठवा अर्ज

Meteorological Department Recruitment: कामावर जाणाऱ्या नोकरदार वर्गापासून ते शेतकऱ्यापर्यंत सर्वांनाच पाऊस नेमका कधी पडेल? याची …

Narayan Rane Education Details: केंद्रीय मंत्री नारायण राणे कितवी शिकलेयत? जाणून घ्या

Narayan Rane Education Details: भारत सरकारचे केंद्रीय मंत्री आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे (Narayan …