संध्या म्हणाली, ‘सुरुवातीच्या काळात मला माझ्या शरिराबद्दल अनेक गोष्टी ऐकाव्या लागल्या. एका सिनेमाच्या निर्मात्यानं मला ब्रेस्ट वाढवण्यासाठी सर्जरी कर असा सल्ला दिला होता. मी याला कधीच होकार देणार नाही. मी म्हणाले, तुमच्यासाठी मी माझं शरीर बदलणार नाही. उद्या तुम्ही मला माझा नाक बदलायला सांगाल मी ते कधीच करणार नाही’.
हेही वाचा – कपिल शर्मा झाला डिलिव्हरी बॉय; Zwigato चा ट्रेलर आऊट
संध्या पुढे म्हणाली, ‘त्यानंतरही मला कोणीतरी म्हणालं, ‘आपको तो बुब्सही नही हैं’. एका निर्मात्यानं मला म्हटलं, ‘आम्हाला तू आवडली आहे पण या पात्रासाठी आम्हाला तुझे ब्रेस्ट मोठे हवेत. मी त्यांना ब्रेस्ट सर्जरी करण्यास पूर्णपणे नकार दिला’. ती पुढे म्हणाली, ‘शेवटी मी दिग्दर्शकांना स्वत: सांगितलं की मी या रोलसाठी ब्रेस्ट पॅड्स वापरेन. त्यामुळे पेज 3 आणि रागिणी एमएमएस 2 या दोन्ही सिनेमात मी ब्रेस्ट पॅड वापरले होते’.
अभिनेत्री संध्या मृदृलनं आज तिच्या मेहनतीनं सिनेसृष्टीत नाव कमावलं. तिच्या करिअरविषयी सांगताना ती म्हणाली, ‘मी कधीच पैशांसाठी काम केलं नाही. मी अनेकदा आर्थिक संकटातून गेले आहे. पण म्हणून मी त्यातून बाहेर येण्यासाठी कोणतीही काम कधीच स्वीकारली नाहीत. व्यावसायिक सिनेमात मी कधीच काम करू शकले नाही कारण त्या टाइपची अभिनेत्री नाही. मला जशी काम येत गेली ती मी करत गेले पण सध्या मला काम मिळत नाहीये’.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Source link
MajhiNews Marathi News, Latest Marathi News, Marathi News Paper, Maharashtra Breaking News | मराठी ताज्या बातम्या