मुंबईवर H3N2 वायरसची सावली, सर्दी-खोकल्याला घेऊ नका हलक्यात, डॉ. हे 6 उपाय वाचवू शकतात जीव

Corona Virus चा धोका आता कुठे टळतो न टळतोच आता नवे संकट उभे ठाकले आहे. हे संकट आहे ‘H3N2’ Virus चे! इन्फ्लूएंझा व्हायरस असलेल्या ‘H3N2’ विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता या विषाणूने एक मोठी चिंता निर्माण केली आहे. हा एक अतिशय सौम्य विषाणू मानला जात होता परंतु हाच आपला मोठा गैरसमज ठरला असून या व्हायरसमुळे आतापर्यंत हरियाणा आणि कर्नाटकमध्ये दोन जणांचा मृत्यू झाला आहे. 9 मार्चपर्यंत देशात या विषाणूची प्रकरणे 3,038 पर्यंत पोहोचली आहेत.

पण अनेक डॉक्टरांच्या आणि जाणकारांच्या मते हा व्हायरस इतका प्राणघातक नाही आणि त्याची लक्षणे इतकी गंभीर नाहीत की एखाद्याला रुग्णालयात दाखल करावे लागेल. पण डॉक्टरांचा हाच दावाच कुठेतरी धोक्यात आल्याचं दिसतंय. कारण गेल्या आठवड्यात झालेल्या दोन मृत्यूंमुळे चिंता अधिक वाढली आहे. मंडळी, म्हणूनच तुम्ही सुद्धा या व्हायरसच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका. ग्रेटर नॉएडा स्थित फोर्टिस हॉस्पिटलमध्ये पल्मोनोलॉजिस्ट अँड चेस्ट स्पेशलिस्ट डॉक्टर राजेश गुप्ता आपल्याला सांगत आहेत की, कोणत्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये आणि व्हायरसपासून बचाव करण्यासाठी कोणते उपाय केले पाहिजेत. (फोटो सौजन्य :- iStock)

H3N2 व्हायरस किती घातक आहे?

h3n2-

TOI च्या एका रिपोर्टनुसार, 2 जानेवारी ते 9 मार्च, म्हणजेच 9 आठवड्यांच्या आत H3N2 विषाणूची प्रकरणे वेगाने वाढली आहेत. या दरम्यान, 3,038 पॉझिटिव्ह प्रकरणे नोंदवली गेली आहेत. सुरुवातीला हा सौम्य विषाणू मानला जात होता पण आता या विषाणूमुळे मृत्यूही सुरू झाले आहेत. वाढत्या प्रकरणांबाबत केंद्र सरकारने बैठकही घेतली असून, काही महत्त्वाच्या सूचनाही जाहिर केल्या आहेत.

हेही वाचा :  H3N2 Influenza : राज्यात दोन संशयित रुग्णांचा मृत्यू, देशात मृत्यूचा आकडा वाढतोय

(वाचा :- Reduce Blood Sugar : इन्सुलिनने खचाखच भरली आहेत आंब्याची पानं, असा करा वापर, गोड खाऊनही होणारच नाही डायबिटीज)​

दिसतात ही लक्षणे

दिसतात ही लक्षणे
  1. खोकला
  2. ताप
  3. घशात कफ जमा होणे
  4. धाप लागणे
  5. थकवा जाणवणे
  6. डोकेदुखी
  7. चक्कर येणे
  8. उलट्या होणे

यांसारखी लक्षणे दिसल्यास त्वरित उपचार घ्यायला सुरुवात करा आणि या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका. कारण ही लक्षणे H3N2 व्हायरसची असू शकतात. तरी अशावेळी घाबरुन न जाता डॉक्टरांकडून तपासणी करून घ्यावी आणि स्वत:ला इतरांपासून दूर ठेवावे.
(वाचा :- Colorectal Cancer Signs : टॉयलेटमध्ये दिसली ही 6 भयंकर लक्षणं तर सावधान, आतडी अक्षरश: पिळवटून टाकतो हा कॅन्सर)​

या विषाणूचा जास्त धोका कोणाला आहे?

या विषाणूचा जास्त धोका कोणाला आहे?

असे म्हटले जात आहे की वृद्ध आणि लहान मुले या विषाणूला सहज बळी पडू शकतात. याशिवाय दमा, लठ्ठपणा, हृदयविकार, मधुमेह आणि कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती असलेल्या लोकांना देखील या विषाणूचा लगेच संसर्ग होण्याचा धोका असतो. एक गोष्ट लक्षात ठेवा की योग्य वेळी उपचार घेतल्यास तुम्ही अजिबात घाबरण्याचे कारण नाही. फक्त वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यायला विसरू नका.
(वाचा :- Rapper Badshah Weight Loss रॅपर-गायक बादशाहला या 4 समस्यांमुळे करावं लागलं वेटलॉस, या आजारात थांबतो थेट श्वासच)​

हेही वाचा :  म्हाडा लॉटरीसाठी अर्ज भरला का? 4082 घरांसाठी 1.45 लाख अर्ज

संक्रमण झाल्यास बरे होण्यास किती वेळ लागू शकतो?

संक्रमण झाल्यास बरे होण्यास किती वेळ लागू शकतो?

हा संसर्ग साधारणपणे पाच ते सात दिवस टिकतो. तीन दिवसांनंतर ताप कमी होऊ शकतो. सौम्य संसर्गाच्या बाबतीत, खोकला दीर्घकाळ टिकू शकतो. जर खोकला वाढत असेल आणि तीन दिवसांनी ताप वाढत असेल तर ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधा.
(वाचा :- H3N2 Virus चिंता वाढली, करोनानंतर एच3एन2 व्हायरसचं थैमान सुरू,झाला 1 मृत्यू, मरण्याआधी दिसली ही 3 भयंकर लक्षणं)​

काय आहेत बचावात्मक उपाय?

काय आहेत बचावात्मक उपाय?
  1. या थुंकीच्या थेंबातून पसरणा-या व्हायरसचे इनफेक्शन रोखण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे स्वच्छतेची किंवा साफ-सफाईची विशेष काळजी घेणे.
  2. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा
  3. सार्वजनिक ठिकाणी मास्क घाला
  4. आपले हात साबण आणि पाण्याने स्वच्छ धुवा विशेषत: जेवण्यापूर्वी आणि कुठूनही आल्यानंतर
  5. नेहमी हँड सॅनिटायझर वापरा
  6. मुख्य म्हणजे संक्रमित लोकांच्या संपर्कात जाणे टाळा.

(वाचा :- Men Yoga : जे पुरूष स्मोक-ड्रिंक करतात पण बाबा होण्यात अडचण नकोय अशांसाठी जबरदस्त उपाय, दिवसातून काढा 2 मिनिटं)​

या गोष्टींची घ्या विशेष काळजी

या गोष्टींची घ्या विशेष काळजी

तुम्ही गरोदर असल्यास किंवा मुलामध्ये कोणतीही लक्षणे दिसत असल्यास, लक्षणे जाणवल्याच्या 48 तासांच्या आत डॉक्टरांशी संपर्क साधा. तुमची लक्षणे किती गंभीर आहेत, तुम्हाला उपचारांची गरज आहे की नाही किंवा तुमच्या लक्षणांवर घरी उपचार करता येतील का हे डॉक्टर तुम्हाला सांगतील.
(वाचा :- 94 किलोच्या या मुलाने ही साधीसोपी घरगुती ट्रिक वापरून घटवलं तबब्ल 25 किलो वजन,दिसू लागला हिरोप्रमाणे Slim-Trim)​

हेही वाचा :  भारतावर H3N2-COVID-19 चा डबल अटॅक,डॉक्टरांची चेतावणी - 5 लक्षणं ओळखून ताबडतोब करा हे 8 उपाय

संक्रमित झाल्यावर काय करावे?

संक्रमित झाल्यावर काय करावे?

जर तुम्ही कोणत्याही प्रकारे विषाणूच्या तावडीत सापडले असाल, तर लक्षणांवर उपचार करण्यासाठी आणि लवकर बरे होण्यासाठी तुम्ही आहाराची विशेष काळजी घेतली पाहिजे. या दरम्यान, तुम्ही भरपूर पाणी तर प्या पण सोबत रस, लस्सी, ताक, लिंबू पाणी आणि सूप यासारख्या द्रवपदार्थांचे सेवन करावे. हायड्रेटेड राहिल्याने तुम्ही लवकर आजारातून बाहेर होऊ शकता.
(वाचा :- जेवताना ही 2 कामं करणा-यांचं पोट कधीच होत नाही साफ व पचनक्रियेचे वाजतात 12, या 8 नियमांची घ्या कटाक्षाने काळजी)​
टीप : हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी असून यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. अधिक माहितीसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य ते बदल करा.

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Loksabha : बारामतीच्या सभेत बोलताना रोहित पवारांना अश्रू अनावर, अजितदादांनी केली नक्कल, म्हणाले ‘आमच्या पठ्ठ्यानं…’

Rohit Pawar burst into tears : येत्या सात मे रोजी होणाऱ्या तिसऱ्या टप्प्यातील लोकसभेच्या (Loksabha Election) …

‘मुंबईत गिरगावमध्ये नोकरीची संधी पण मराठी उमेदवार नको’; महिला HR ची संतापजनक पोस्ट

HR LinkedIn Post Related to Marathi People : सध्या सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत …