म्हाडा लॉटरीसाठी अर्ज भरला का? 4082 घरांसाठी 1.45 लाख अर्ज

Mhada Lottery 2023 : म्हाडा लॉटरीमधील (Mhada Lottery 2023) 4082 सदनिकांसाठी ऑनलाइन अर्ज  सादरीकरण आणि अनामत रकमेचा भरणा करण्यासाठी 24 तासांची अंतिम मुदतवाढ संपली आहे.  म्हाडाच्या मुंबई गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळातर्फे जाहीर करण्यात आलेल्या लॉटरीसाठी  4082 घरांसाठी 1.45 लाख अर्ज  दाखल झाले आहेत.

मुंबई मंडळातर्फे अर्ज भरणा करण्याची मुदत11 जुलै रोजी संध्याकाळी सहा वाजता संपली आहे. परंतु अर्जदार अनामत रकमेचा ऑनलाइन भरणा रात्री 11.59 पर्यंत करू शकणार आहेत. तसेच RTGS / NEFT द्वारे अनामत रकमेचा भरणा अर्जदार 12 जुलै, 2023  रोजी संबंधित बँकेच्या कार्यालयीन वेळेपर्यंत करू शकतात.

17 जुलै २०२३ रोजी दुपारी 3 वाजता सोडतीसाठी प्राप्त अर्जांची प्रारूप यादी म्हाडाच्या https://housing.mhada.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे. 19 जुलै, 2023 रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत प्रारूप यादी प्रसिद्ध झाल्यापासून ऑनलाईन दावे-हरकती दाखल करता येणार आहेत. 24 जुलै 2023 रोजी दुपारी तीन वाजता सोडतीसाठी स्विकृत अर्जांची अंतिम यादी म्हाडाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे.
मुंबईतील विविध गृहनिर्माण प्रकल्पांतर्गत 4082 सदनिकांच्या विक्रीसाठी 22  मे 2023 रोजी दुपारी तीन वाजेपासून ऑनलाइन अर्ज नोंदणी व स्वीकृती प्रक्रियेला सुरुवात झाली होती. मानवी हस्तक्षेपविरहित संपूर्णता ऑनलाइन अशा IHLMS 2.0 या संगणकीय प्रणालीद्वारे ही सोडत प्रक्रिया राबविण्यात आली आहे. 

हेही वाचा :  थकित कर्जवसुलीसाठी म्हाडाची शक्कल; मुंबई - नागपूर समृद्धी महामार्गालगत बांधणार म्हाडाची घरं

कुठे आहेत म्हाडाची घरे?

सोडतीमधील अत्यल्प उत्पन्न गटात पहाडी गोरेगाव पश्चिम येथील प्रधानमंत्री आवास योजनेतील सदनिका तसेच अॅअन्टॉप हिल व विक्रोळीच्या कन्नमवार नगरमधील सदनिकांचा समावेश आहे. अल्प उत्पन्न गटकरिता पहाडी गोरेगाव, लोकमान्य नगर दादर, अँटॉप हिल वडाळा, सिद्धार्थनगर – गोरेगाव पश्चिम, डीएन नगर -अंधेरी, पंत नगर -घाटकोपर, कन्नमवार नगर विक्रोळी, चारकोप कांदिवली, महावीर नगर कांदिवली, जुने मागाठाणे बोरिवली, गव्हाणपाडा मुलुंड, पीएमजीपी मानखुर्द, मालवणी मालाड आदी ठिकाणी सदनिका उपलब्ध आहेत. तसेच उन्नतनगर गोरेगाव पश्चिम, महावीर नगर कांदिवली, जुहू, अंधेरी पश्चिम, अंधेरी पूर्व, सहकार नगर चेंबुर, लोकमान्य नगर दादर, अँटॉप हिल वडाळा, भायखळा, टिळकनगर चेंबुर, चांदिवली पवई, गायकवाड नगर मालाड, प्रतीक्षा नगर सायन, चारकोप कांदिवली येथील गृहप्रकल्पांतरगत मध्यम उत्पन्न गटातील सदनिकांचा समावेश आहे. उच्च उत्पन्न मध्ये जुहू – अंधेरी पश्चिम, वडाळा पश्चिम, ताडदेव, लोअर परळ, शिंपोली कांदिवली, तुंगा पवई, चारकोप कांदिवली, सायन पूर्व येथील सदनिकांचा समावेश आहे.

म्हाडाच्या लॉटरीला उत्तम प्रतिसाद

11 जुलै रोजी संध्याकाळी अर्ज सादर करण्याची लिंक संपुष्टात येईपर्यंत संगणकीय सोडत प्रणालीमध्ये उत्पन्न गटनिहाय अत्यल्प उत्पन्न गटातील 843 सदनिकांकरीता 35,231 अर्ज प्राप्त झाले आहेत. अल्प उत्पन्न गटातील 1034 सदनिकांकरीता 73,414 अर्ज प्राप्त झाले आहेत. मध्यम उत्पन्न गटातील 138 सदनिकांकरीता 10,500 अर्ज प्राप्त झाले आहेत आणि उच्च उत्पन्न गटातील 120 सदनिकांसाठी 2928 अर्जदारांनी अर्ज केले आहेत. तसेच प्रधान मंत्री आवास योजने अंतर्गत 1947 सदनिकांसाठी 23776 अर्ज प्राप्त झाले आहेत. सदनिकांच्या वितरणाकरिता प्राप्त अर्जांची संगणकीय सोडत वांद्रे पश्चिम येथील रंगशारदा नाट्यगृहात काढण्यात येणार असून सोडतीचा दिनांक व वेळ लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.

हेही वाचा :  गुलाबी लेहंगा व हिरवागार ब्लाऊज,चक दे इंडियातील बलबीरचा नववधू लूक घालतोय भुरळ,हातातील ती एक गोष्ट वेधतीये लक्ष

 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘मुंबईत गिरगावमध्ये नोकरीची संधी पण मराठी उमेदवार नको’; महिला HR ची संतापजनक पोस्ट

HR LinkedIn Post Related to Marathi People : सध्या सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत …

देवीच्या जागरणात अघटित घडलं! काली मातेच्या भूमिकेतील मुलाकडून चुकून 11 वर्षांच्या मुलाची हत्या

Crime News Today: उत्तर प्रदेशच्या देवी जागरणचा एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात …