राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीचा धुरळा, कुणाची सरशी? कोण मारणार बाजी?

Maharashtra Election : राज्यात गावागावांमध्ये निवडणुकीचा धुरळा उडायला सुरुवात होतेय. गावगाड्याचा कारभारी निवडण्यासाठी 2 हजार 359 ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक होतेय. निवडणुकीत राज्यातली जनता थेट सरपंचाची निवड करणार आहे. 2 हजार 489 सरपंच जनतेतून निवडले जाणार आहेत. त्यामुळे गावागावात चुरशीचं वातावरण तयार झालंय.. 

ग्रामपंचायत निवडणुकीचा धुरळा 
राज्यात 5 नोव्हेंबरला एकूण 2359 ग्रामपंचायतीत निवडणूक होतायत. तर 2950 सदस्य निवडीसाठीही पोटनिवडणूक होणार आहे. 2489 सरपंच थेट जनतेतून निवडले जाणार आहेत. तर 130 सरपंचांच्या रिक्तपदांच्या पोटनिवणुकांसाठीही मतदान होणार आहे. 
6 नोव्हेंबरला मतमोजणी पार पडेल. 

विभागवार किती ग्रामपंचायतीत निवडणुकीचा धुरळा उडणार आहेत तेही पाहुयात..

विभागवार ग्रामपंचात निवडणूक
कोकण (360),  उत्तर महाराष्ट्र (457), पश्चिम महाराष्ट्र (656), मराठवाडा (254), तर विदर्भात (632) जागांसाठी मतदान होणार आहे. या ग्रामपंचायत निवडणुकीत दिग्ज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागलीय. 

नागपूर – 365 ग्रामपंचायती 
देवेंद्र फडणवीस – भाजप 
चंद्रशेखर बावनकुळे – भाजप 
सुनील केदार – काँग्रेस 
अनिल देशमुख – शरद पवार गट

पुणे – 231 ग्रामपंचायती
अजित पवार – राष्ट्रवादी (अजित पवार गट)
हर्षवर्धन पाटील – भाजप
सुप्रिया सुळे – राष्ट्रवादी (शरद पवार गट)

हेही वाचा :  पोट, मांड्या, कंबरेची चरबी झटक्यात जाईल जळून, फॉलो करा एक्सपर्टने सांगितलेला 7 दिवसांचा Weight Loss Diet Plan

रायगड – 210 ग्रामपंचायती 
भरत गोगावले – शिंदे गट 
सुनील तटकरे – राष्ट्रवादी (अजित पवार गट)
अनंत गीते – ठाकरे गट

जळगाव – 168 ग्रामपंचायती 
गिरीश महाजन – भाजप 
गुलाबराव पाटील – शिंदे गट
एकनाथ खडसे – राष्ट्रवादी (शरद पवार गट)

अहमदनगर – 194 ग्रामपंचायती 
राधाकृष्ण विखे पाटील – भाजप
बाळासाहेब थोरात – काँग्रेस 
प्राजक्त तनपुरे – राष्ट्रवादी (शरद पवार गट)

बीड – 186 ग्रामपंचायती 
धनंजय मुंडे – राष्ट्रवादी (अजित पवार गट)
पंकजा मुंडे – भाजप
संदीप क्षीरसागर –  राष्ट्रवादी (शरद पवार गट)

सातारा – 133  ग्रामपंचायती  
शंभूराज देसाई – शिंदे गट
बाळासाहेब पाटील – राष्ट्रवादी (शरद पवार गट)
उदयनराजे भोसले – भाजप

सोलापूर – 109 ग्रामपंचायती  
बबनदादा शिंदे – राष्ट्रवादी (अजित पवार गट)
अभिजीत पाटील – राष्ट्रवादी (शरद पवार गट)
दिलीप सोपल – ठाकरे गट

ग्रामपंचायत निवडणुकीत पक्ष नसतात तर पॅनल असतात. तरीही लोकसभा निवडणुकीपूर्वी गावगाड्याची ही निवडणूक होतेय.. त्यामुळे ग्रामपंचायतींच्या निकालानंतर गावागाड्याचा कल काहीसा का होईना, स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा :  Gram Panchayat Election : शिंदे गटाची मोठी कसोटी; राज्यातील 7751 ग्रामपंचायत निवडणुकांचे बिगुल वाजले, पाहा कार्यक्रम



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

राज ठाकरे खरंच दुपारी झोपेतून उठतात का? स्वत: खुलासा करत म्हणाले, ‘माझ्याबद्दल…’

Raj Thackeray Morning Wake Up Time: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे सध्या त्यांनी लोकसभा …

लोकांना हसवून करा ‘इतकी’ कमाई! स्टॅंडअप कॉमेडीमध्ये करिअरची सर्व माहिती

Career in Standup Comedy: तुम्हाला लोकांना हसवायला आवडतं? तुम्ही लोकांना हसवू शकता? तुम्हाला लाफ्टर शो …