पांढऱ्या केसांसाठी हेअर डायची नाही गरज, ठेवा नैसर्गिक पद्धतीने काळे

White Hair Problem: आजकाल हेल्दी लाइफस्टाइल न राहिल्यामुळे वेळेआधीच केस पांढरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे अनेकदा या पांढऱ्या केसांवर केमिकलयुक्त हेअरडायचा वापरही केला जातो. पण यामुळे स्काल्पचे आरोग्य बिघडते. हा हेअरडाय केसांना कमी आणि स्काल्प अधिक काळा करतो. तर दर महिन्याला पार्लरमध्ये जाऊन केस काळे करण्यापेक्षा घरगुती उपायांनी तुम्ही हा समस्येवर तोडगा काढू शकता. पांढऱ्या केसांना घरगुती उपायांनी कसे काळे करावे जाणून घ्या. (फोटो सौजन्य – Freepik.com)

​केसांसाठी कडिपत्ता​

​केसांसाठी कडिपत्ता​

Curry Leaves For White Hair: केस काळे करण्यासाठी तुम्ही कडिपत्त्याचा वापर करून घेऊ शकता. हा नैसर्गिक घटक असल्याने केसांवर चांगला परिणाम होतो

  • कडिपत्त्याची १०-१२ पाने वाटून त्याची पावडर करा
  • यामध्ये २ चमचा आवळा पावडर आणि २ चमचे ब्राम्ही पावडर मिक्स करा
  • हे सर्व मिक्स करून पाणी घालून पेस्ट करून घ्या
  • ही पेस्ट तुम्ही केसांना लावा आणि साधारण १ तास ठेवा
  • त्यानंतर केस थंड पाण्याने स्वच्छ धुवा
  • आठवड्यातून एकदा असं केल्याने केसांना काळा रंग येतो
हेही वाचा :  Thank You PM Modi : यूक्रेनमध्ये केलेल्या या मदतीसाठी बांगलादेशच्या PM शेख हसीना यांनी मानले मोदींचे आभार

​नारळाचे तेल ठरते उपयोगी​

​नारळाचे तेल ठरते उपयोगी​

Coconut Oil For White Hair: केसांना नियमित नारळाचे तेल योग्य पद्धतीने तुम्ही लावले तर पांढऱ्या केसांची समस्या लवकर दूर होते. तुमचेही केस अधिक प्रमाणात सफेद झाले असतील तर नारळाच्या तेलाचा वापर करावा.

  • नारळाच्या तेलात लिंबाचा रस मिक्स करा
  • हे मिश्रण केसांना लावण्यापूर्वी थोडेसे कोमट करून घ्या
  • केसांना लावा आणि साधारण २ तास तसंच ठेवा
  • त्यानंतर व्यवस्थित तेल जाईल असे केस धुवा
  • यामुळे केसांना नैसर्गिक काळा रंग येईल आणि टिकून राहील

​काळा चहा नैसर्गिक उपाय​

​काळा चहा नैसर्गिक उपाय​

Black Tea For White Hair: केसांचा रंग बदलण्यासाठी काळा चहा अधिक परिणामकारक ठरतो. पांढऱ्या केसांसाठी काळा चहा वापरून तुम्ही नैसर्गिकरित्या केस काळे ठेऊ शकता.

  • एक ग्लास पाण्यात चहा पाडवर घालून काळा चहा उकळून घ्या
  • हे पाणी थंड करा आणि त्यानंतर केसांना लावा
  • साधारण एक तास तसंच राहू द्या आणि मग केस धुवा
  • पांढरे केस काळे करण्यासाठी तुम्ही आठवड्यातून एकदा हा घरगुती उपाय नक्की करून पाहा

​जास्वंदाचा करा उपयोग​

​जास्वंदाचा करा उपयोग​

जेव्हा केसांची काळजी घेण्याची बाब असते तेव्हा जास्वंदाचा उपयोग हा झालाच पाहिजे. जास्वंद हे केसांसाठी खूपच उपयुक्त ठरते. जास्वंदाचा वापर हा केसांची वाढ होण्यासाठी आणि केसगळती थांबण्यासाठी करतात. याशिवाय पांढऱ्या केसांसाठीही याचा उपयोग होतो.

  • ​जास्वंदाचे फूल रात्रभर पाण्यात भिजवा
  • सकाळी या पाण्याने केस धुवा
  • यासह तुम्ही मेहंदी भिजवूनही केसांना लावू शकता आणि नंतर केस धुतल्यास, काळा रंग राहातो
हेही वाचा :  पत्नीची प्रसुती पाहिली, पतीला जडला गंभीर आजार... रुग्णालयावर ठोकला नुकसान भरपाईचा दावा

​मेथी दाणे ठरतात केसांसाठी वरदान​

​मेथी दाणे ठरतात केसांसाठी वरदान​

मेथीचे दाणे हे केसांसाठी उत्तम ठरतात. आरोग्याप्रमाणेच केस निरोगी ठेवण्यासाठी आणि केस काळे करण्यासाठी याचा उपयोग होतो.

  • मेथीच्या दाण्याची पावडर करा
  • यामध्ये ३-४ चमचे आवळ्याचा रस आणि नारळाचे तेल मिक्स करून पेस्ट तयार करा
  • त्यानंतर हा हेअर मास्क केसांना लावा
  • एक तास तसंच ठेवा आणि मग केस धुवा
  • आठवड्यातून एकदा हा हेअर मास्क वापरल्याने केस नैसर्गिकरित्या काळे होतात

ही माहिती आम्ही ब्युटीशियनशी चर्चा करून दिली आहे. तुम्हाला यापैकी कोणत्याही पदार्थांची अलर्जी असल्यास, याचा वापर करू नये.
अशाच अधिक लाइफस्टाइल, हेल्थ, फॅशन, ब्युटी, होम डेकोर, रिलेशनशिप, हॅक्स यावरील अधिक माहितीसाठी क्लिक करा maharashtratimes.com

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पाणीटंचाईमुळे गावातील तरुणांचं लग्न थांबलं, वर्ध्याच्या 8 गावांची 60 वर्षांपासून पाण्यासाठी लढाई

Wardha Drought 8 village : उन्हाळा लागला की पाणी समस्या सगळीकडे बिकट होताना बघायला मिळते. …

मतदान करायचंय पण आधार, पॅनकार्ड सापडत नाही? तब्बल 12 ओळखपत्रांना आहे मान्यता

ECI Lists Out 12 Identity Proofs : राज्यात लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजलं आहे. आतापर्यंत महाराष्ट्रातील दोन टप्प्यातील …