स्वातंत्र्यानंतर 75 वर्षांत पहिल्यांदाच भारतातील ‘या’ 6 गावांमध्ये झालं झेंडावंदन! कारण जाणून वाटेल आश्चर्य

First Time In 75 Years Of Independence: आज देशभरामध्ये स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जात आहे. मात्र छत्तीसगडमध्ये यंदाचा स्वातंत्र्यदिन अधिक खास असणार आहे. येथील नक्षलग्रस्त गावांमध्ये 75 वर्षांमध्ये पहिल्यांदाच तिरंगा फडकावला जाणार आहे. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 75 वर्षांनी पहिल्यांदाच या देशांमध्ये तिरंगा फटकला आहे. छत्तीसगडमधील पोलिसांकडूनच ही माहिती देण्यात आली आहे.

या ठिकाणी सुरक्षा दलांचे तळ

सुरक्षा दलांकडून या गावांच्या आसपास नक्षवाद्यांविरोधात लढण्यासाठी तळ निर्माण करण्यात आले आहेत. यामुळेच आज या गावांमध्ये स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच तिरंगा झळकावण्यात आला. बस्तर विभागाअंतर्गत येणाऱ्या सुकमा आणि बीजापूर हे 7 नक्षलग्रस्त जिल्ह्यांपैकी आहेत जिथे सातत्याने सुरक्षा यंत्रणांचा संघर्ष सुरु असतो. मागील 3 दशकांपासून छत्तीसगडमधील या 7 जिल्ह्यांमध्ये सातत्याने नक्षलवाद मोडून काढण्यासाठी सुरक्षा यंत्रणा प्रयत्न करत आहेत. 

या गावांमध्ये पहिल्यांदाच झेंडावंदन

पीटीआय या वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार बस्तर विभागाचे पोलीस महानिरीक्षक सुंदरराज पी यांनी स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला या अनोख्या झेंडावंदनासंदर्भात माहिती दिली. “मंगळवारी बीजापुर जिल्ह्यातील चिन्नागेलुर, तिमेनार, हिरोली तसेच सुकामा जिल्ह्यातील बेद्रे, दुब्बामरका आणि टोंडामरका गावांमध्ये तिरंगा फडकावला जाईल. स्वातंत्र्य मिळाल्यापासून या ठिकाणी कधीही तिरंगा फडकावला गेला नव्हता,” असं सुंदरराज यांनी सांगितलं. तसेच सुकमा येथील पिडमेल, डुब्बाकोंटा, सिलगेर आणि कुंडेड गावांमध्येही पहिल्यांदाच स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. या गावांमध्ये याच वर्षी 26 जानेवारी रोजी पहिल्यांदा तिरंगा फटकावण्यात आला होता. या गावांमध्ये नक्षवाद्यांचा प्रभाव असल्याने यापूर्वी येथे कधीच झेंडावंदन झालेलं नव्हतं.

हेही वाचा :  शिंदे सरकारमधील मारकुटे मंत्री, आमदार संतोष बांगर यांच्यानंतर दादाजी भुसे यांची दादागिरी

मोदींनी सांगितलं हे वर्ष महत्त्वाचं का

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज लाल किल्ल्यावरुन दिलेल्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणामध्येही नक्षग्रस्त भागांमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये सुधारणा झाल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या भाषणामध्ये आगामी वर्ष महत्त्वाचं का आहे यासंदर्भातही भाष्य केलं. “मी आज देशाच्या स्वातंत्र्यांच्या लढ्यामध्ये ज्यांनी योगदान दिलं, बलिदान दिलं, तपस्या केली त्या सर्वांना मी आदरपूर्वक नमक करतो. आज अरबिंदो यांची 150 वी जयंती या वर्षी पूर्ण होत आहे. हे वर्ष स्वामी दयानंद सरस्वतींच्या 150 व्या जयंतीचं वर्ष आहे. राणी दुर्गावतीच्या 500 व्या जन्मतिथीचं वर्ष आहे. हा फार पवित्र योग असून फार उत्साहात तो साजरा केला जाईल. मीराबाई यांच्या 525 वी जन्मतिथीही या वर्षी आहे. या वर्षी आपल्या आपण 26 जानेवारी साजरा करु तो 75 वा असेल. अनेक अर्थांनी अनेक संधी, अनेक शक्यता, नवीन प्रेरणा आपल्याला मिळणार आहे,” असं पंतप्रधान मोदी म्हणाले.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘Double Digit पगारवाढीचा एकमेव मार्ग म्हणजे..’; Appraisals बद्दल कॉर्पोरेट कर्मचाऱ्यांना सल्ला

Double Digit Appraisal Salary Hike: सध्या कॉर्पोरेटमध्ये वार्षिक आढावा म्हणजेच अ‍ॅन्यूअल रिव्ह्यू आणि पगारवाढ निश्चित करण्याचा …

महाराष्ट्रात पुन्हा ‘सैराट’! लव्ह मॅरेजला विरोध करत आई-वडिलांनीच केली लेकीची हत्या

Maharashtra Crime News: महाराष्ट्राला हादरवणारी घटना परभणीत घडली आहे. प्रेम विवाहाला विरोध करत आई-वडिलांनीच पोटच्या …