Bank Job: एक्झिम बँकेत विविध पदांची भरती, 63 हजारपर्यंत मिळेल पगार

Exim Bank: बॅंक भरती परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी महत्वाची अपडेट आहे. एक्सीम बँक अंतर्गत विविध पदे भरली जाणार आहेत. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.

एक्झिम बॅंकेत मॅनेजमेंट ट्रेनीच्या 45 जागा भरल्या जाणार आहेत. याअंतर्गत बॅंकींग ऑपरेशनमध्ये 35 जागा, डिजीटल टेक्नोलॉजीच्या 7 जागा, राजसभाच्या 2 जागा आणि अॅडमिनिस्ट्रेशची 1 जागा भरली जाणार आहे. 

एक्सीम बँक अंतर्गत व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी पदाच्या रिक्त जागांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी पदाप्रमाणे एमबीए / पीजीडीबीए / अभियांत्रिकी पदवी / पदवी / पदव्युत्तर पदवी / पदव्युत्तर पदवी पूर्ण केलेली असणे आवश्यक आहे. या पदांवर निवड झालेल्या उमेदवारांना 36 हजार ते 63 हजार 840 पर्यंत पगार दिला जाणार आहे. 

स्टाफ सिलेक्शनअंतर्गत बंपर भरती, बारावी उत्तीर्णांना मिळेल चांगल्या पगाराची नोकरी

सामान्य आणि ओबीसी उमेदवारांकडून 600 रुपये अर्ज शुल्क आकारण्यात येईल. एससी/एसटी/पीडब्ल्यूडी/ईडब्ल्यूएस आणि महिला उमेदवारांकडून 100 रुपये शुल्क घेण्यात येणार आहे. 

उमेदवारांची निवड स्क्रीनिंग आणि अर्जांच्या शॉर्टलिस्टिंग आणि त्यानंतर वैयक्तिक मुलाखतीद्वारे केली जाणार आहे. पदाची संख्या वाढवणे, कमी करणे,  उमेदवार निवडणे, नाकारणे संदर्भात बँकेचा निर्णय अंतिम असेल. उमेदवारांची मुलाखत मुंबई किंवा दिल्ली येथे घेतली जाईल.

हेही वाचा :  कमाल झाली! पती-पत्नीचे भांडण विकोपाला, रागात बायकोने घरच पेटवून दिलं

Mumbai Job: मुंबई उच्च न्यायालयात नोकरीची संधी, इच्छुकांनी ‘येथे’ पाठवा अर्ज

तुमची निवड झाली असेल तर तसे ईमेलद्वारे कळविले जाईल. बॅंक भरतीसाठी उमेदवारांकडून केवळ ऑनलाईन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत. इतर कोणतेही माध्यमातून आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, याची उमेदवारांनी नोंद घ्या. 

अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचा. 10 नोव्हेंबर 2023 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. यानंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही, याची नोंद घ्या.

महिला आर्थिक विकास महामंडळात भरती

आर्थिक विकास महामंडळात महाव्यवस्थापक (वित्त व प्रशासन) आणि सल्लागारचे प्रत्येकी 1 पद भरले जाणार आहे. यासाठी ऑफलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत. महाव्यवस्थापक (वित्त व प्रशासन) पदासाठी शासकीय सेवेतून सेवानिवृत्त मुख्य लेखा आणि वित्त अधिकारी या पदासाठी अर्ज करु शकतात. उमेदवाराला शासन नियमाप्रमाणे मानधन देण्यात येणार आहे. उमेदवारांनी आपले अर्ज  महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम), पोटमाळा, गृहनिर्माण भवन (म्हाडा बिल्डींग), कलानगर, वांद्रे (पूर्व), मुंबई – 400051 या पत्त्यावर पाठवायचे आहेत.  27 ऑक्टोबर 2023 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Raj Thackeray : ‘नारायण राणे मुख्यमंत्री झाले अन्…’, राज ठाकरेंनी भरसभेत घेतली फिरकी; सांगितला ‘तो’ किस्सा!

Raj Thackeray Kankavli Sabha : एकेकाळचे दोन शिवसैनिक आज तब्बल 20 वर्षांनी एकाच मंचावर दिसले. …

Maharastra Politics : कोकणात ‘ह्याका गाड, त्याका गाड’… तो काय गाडणार? ठाकरेंवर राणेंचा ‘प्रहार’

Uddhav Thackeray vs Narayan Rane : कोकणात लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं उद्धव ठाकरे विरुद्ध नारायण राणे …