Lalu Prasad Yadav वडिलांच्या प्रकृतीसाठी मुलगी देणार किडनी; पोस्ट पाहून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी

Lalu Prasad Yadav Health update : राष्ट्रीय जनता दल (RJD) चे अध्यक्ष आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांची प्रकृतीबद्दल रोज नवे अपडेट समोर येत असतात. आता लालू प्रसाद यादव यांची प्रकृती सुधारावी म्हणून मुलगी रोहिणी आचार्यने (Rohini Acharya) मोठा निर्णय घेतला आहे. आज रोहिणी वडिलांना किडनी देणार (kidney transplant)  आहे. वडिलांसाठी लेकीने केलेलं त्याग आज प्रत्येक मुलीसाठी गर्वाचा क्षण असणार आहे. 

रोहिणी आचार्य देणार वडिलांना किडनी

लालू प्रसाद यादव यांची मुलगी रोहिणी आचार्य आज वडिलांना किडनी देणार आहे. यावर रोहिणी यांनी केलेलं वक्तव्य पाहून प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी येईल. रोहिणी म्हणाल्या, ‘मला फक्त एक छोटासा मांसाचा गोळा वडिलांना द्यायचा आहे. वडिलांसाठी मी काहीही करु शकते.’ (lalu yadav daughter)

रोहिणी पुढे म्हणाल्या, ‘तुम्ही सर्वांनी फक्त प्रार्थना करा की, सर्व काही सुरळीत पार पडेल आणि माझे वडील पुन्हा तुम्हा सर्वांचा आवाज बुलंद करु शकतील… तुम्ही सर्वांनी दिलेल्या सदिच्छांबद्दल आभार…’ (lalu yadav daughter rohini acharya)

Lalu Prasad Yadav यांची प्रकृती सुधारावी म्हणून मुलगी रोहिणी करणार मोठा त्याग

‘ज्या वडिलांनी मला जगात ओळख दिली. जे माझे सर्वस्व आहेत. त्यांच्यासाठी मी माझ्या जीवनातील एक भाग देत असेल तर, मी स्वतःला भाग्यवान समजते. पृथ्वीवरील देव म्हणजे आई-वडील आहेत आणि त्यांची सेवा करणं हे प्रत्येक मुलाचं कर्तव्य आहे.’ असं देखील रोहिणी म्हणाल्या. 

महत्त्वाचं म्हणजे रोहिणी यांनी वडील लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांच्यासोबत एक फोटो पोस्ट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. रिपोर्टनुसार, लालू प्रसाद यादव गेल्या अनेक दिवसांपासून किडनी निगडीत आजाराशी लढत आहेत. 

हेही वाचा :  राज्याच्या सत्तासंघर्षाचा निकाल पुढील आठवड्यात लागण्याची शक्यता, राजकीय घडामोडींना वेग

एवढंच नाहीतर, गेल्या अनेक वर्षांपासून किडनीच्या आजाराशिवाय इतरही अनेक आजारांनी ते त्रस्त आहेत. सध्या लालू प्रसाद यादव यांची किडनी 28 टक्के काम करत असून प्रत्यारोपणानंतर ते 70 टक्क्यांपर्यंत काम करू लागेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. Lalu Prasad Yadav Health update today Rohini Acharya will denate her kidney to father 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

उरले काही तास, राज्यात 8 मतदार संघात मतदान… दुसऱ्या टप्प्यात तिरंगी लढती

Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात 13 राज्यातील 89 लोकसभा मतदारसंघात निवडणूक होणार आहे. …

विद्यार्थ्याने उत्तरपत्रिकेत लिहिलं ‘जय श्री राम’, शिक्षकाने केलं पास.. विद्यापिठाकडून कारवाई

Trending News : उत्तर प्रदेशमधल्या जौनपूर इथल्या वीर बहाद्दूर सिंह पूर्वांचल युनिव्हर्सिटीतल्या उत्तर पत्रिका तपासणीतल्या …