Aadhaar : आधार वेरिफिकेशनकरता सरकारचा नवा नियम, जाणून घ्या अन्यथा….

मुंबई : Aadhar Latest News : भारतात आधार कार्ड हे महत्वाचे कागदपत्र मानले जाते. आधार कार्डाशिवाय देशात कोणतंही काम पूर्ण होत नाही. UIDAI देखील वेळोवेळी आधारकार्डाशी संबंधीत माहिती देत असतात. आधार वेरिफिकेशन  (Aadhaar Verification) बाबत सरकारने नवा नियम बनवला आहे. 

नव्या नियमांतर्गत आधार कार्डचं ऑफलाइन किंवा इंटरनेट शिवाय वेरिफिकेशन करू शकतात. याबाब तुम्हाला माहित नसेल तर माहिती जाणून घ्या. 

सरकारने जाहिर केले नवे नियम 

नव्या नियमानुसार, वेरिफिकेशनकरता तुम्हाला आता डिजिटल स्वरूपात हस्ताक्षर केलेले डॉक्युमेंट्स देणं गरजेचं आहे.

तसेच डिजिटल साइन्ड कागदपत्र आधारच्या सरकारी संस्था यूनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) मार्फत जाहीर करण्यात आले आहे. या आधारकार्डावर अंतिम चार अंक असणार आहेत. 

ग्राहकाला समजून घ्या 

सरकारने ८ नोव्हेंबर २०२१ ला आधार विनियम, २०२१ ला अधिसूचित केलं आहे की, ९ नोव्हेंबर २०२१ रोजी अधिकृत वेबसाइटवर जाहीर केलं आहे. 

यामध्ये ई-केवाईसी (e-kyc)आधारच्या ऑफलाइन वेरिफिकेशनच्या डिटेल प्रोसेसमध्ये सांगण्यात आलं आहे. येथे केवायसीचा अर्थ ‘ग्राहकांना समजून घ्या’ हे पूर्णपणे इलेक्ट्रॉनिक असणार आहे. यामुळे याला केवायसी म्हटलं जातं. 

हेही वाचा :  Earthquake : भूकंपाने किती नुकसान होऊ शकतं? जाणून घ्या रिश्टर स्केलचे गणित

जाणून घ्या नवा नियम 

आधार होल्डरला एक पर्याय दिला जातो की, आधार ई-केवायसी वेरिफिकेशनच्या प्रोसेसकरता आधार पेपलेस ऑफलाइन (e-KYC) ला अधिकृत एजन्सीला देण्यात येईल. 

या नवीन नियमात, आधार धारकाला आधार ई-केवायसी पडताळणी प्रक्रियेसाठी कोणत्याही अधिकृत एजन्सीला आपला आधार पेपरलेस ऑफलाइन ई-केवायसी देण्याचा पर्याय देण्यात आला आहे.

यानंतर एजन्सी आधार धारकाने दिलेला आधार क्रमांक आणि नाव, पत्ता इत्यादी केंद्रीय डेटाबेसशी जुळवेल. जुळणी बरोबर असल्याचे आढळल्यास पडताळणीची प्रक्रिया पुढे नेली जाते.

आधार मिळतो अधिकार 

आधार पेपरलेस ऑफलाइन ई-केवायसी म्हणजे डिजिटल स्वाक्षरी असलेला दस्तऐवज जो UIDAI द्वारे जारी केला जातो.

या दस्तऐवजात आधार क्रमांकाचे शेवटचे ४ अक्षर, नाव, लिंग, पत्ता, जन्मतारीख आणि फोटो यांची माहिती आहे. सरकारने जारी केलेला हा नवीन नियम आधार धारकांना सत्यापन एजन्सीला नकार देण्याचा अधिकार देतो की त्यांचा कोणताही ई-केवायसी डेटा संग्रहित केला जाऊ नये.

ऑफलाइन आधार वेरिफिकेशनचा प्रकार 

नियमांनुसार, UIDAI खालील प्रकारच्या ऑफलाइन पडताळणी सेवा प्रदान करेल.
– QR कोड पडताळणी
– आधार पेपरलेस ऑफलाइन ई-केवायसी पडताळणी
– ई-आधार पडताळणी
– ऑफलाइन पेपर आधारित पडताळणी

हेही वाचा :  Stocks to Buy: 'या' Stock ची चलती... देईल तुम्हाला घसघशीत परतावा; जाणून घ्याSource link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

धावत्या स्कूल व्हॅनचा मागचा दरवाजा उघडला आणि… काळजचा थरकाप उडवणारा Video

School Van Incident CCTV : शाळकरी मुलांची वाहतूक करणाऱ्या स्कूल बस आणि स्कूल व्हॅनसाठी (School …

रवींद्र वायकर यांच्या खासदारकीच्या वादात मोठा ट्विस्ट! उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातील निकालाविरोधात हायकोर्टात याचिका

Ravindra Waikar : उत्तर पश्चिम मुंबईचे खासदार रवींद्र वायकर यांच्या विरोधात, मुंबई उच्च न्यायालयात याचिका …