‘ईटाईम्स टीव्ही’शी खास बातचीत करताना सोफिया हयात म्हणाली, ‘मी बेशुद्ध होऊन पडल्याने मला चेल्सी अँड वेस्टमिन्स्टर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. माझी सध्या प्रकृती ठीक नाही. माझ्या काही वैद्यकीय चाचण्या झाल्या आहेत, पण मला असं वाटत आहे की हार्नियाची समस्या आहे. त्यामुळे पुढच्या आठवड्यात मी हार्निया स्पेशलिस्टना भेटणार आहे. मी चीन स्टँड योगा केला होता आणि त्यावेळी माझ्या छातीमध्ये मला काहीतरी जाणवले’. तिच्या मते जास्त व्यायाम केल्यामुळे हा प्रकार घडला असावा. अभिनेत्रीने अशी प्रतिक्रिया दिली आहे की ती सध्या आराम करत आहे.
हे वाचा-राजू यांनी रिक्षा चालवून भरलेली पोटाची खळगी; आज दारात उभी ऑडी अन् BMW!
पुन्हा एकदा रुग्णालयाची पायरी चढावी लागल्याने अभिनेत्री खूप खबरदारी बाळगून आहे. अधिक काम करावं लागणार नाही, याबाबतही ती सतर्क आहे. ती पुढे म्हणाली, ‘म्हणून मी सध्या काहीही करत नाहीये. मला जास्त मेहनत करावी लागू नये म्हणून खूप काळजी घेत आहे. मला वाटते की २० ते चाळीशीदरम्यान जास्त व्यायाम तुमच्यासाठी घातक ठरेल, सोशल मीडियाने आपल्याला काहीही सांगितले तरी ते महत्त्वाचे नाही. आपण स्वत:ची काळजी घेणं आवश्यक आहे. जेव्हा मी कोसळले आणि मला रुग्णालयात दाखल करण्यात आलं तेव्हा मला वाटलं की माझे अवयव निकामी झाले आहेत. तिथे खूप चांगली नर्स होती, ज्यांनी माझे डोळे उघडण्यास मदत केली.’
हे वाचा-अखेरच्या व्हिडिओतूनही हसवून गेले राजू; वेदनादायी दिवस सुरू होण्यापूर्वी केलेली पोस्ट
स्पिरिच्युअल हीलर असणारी सोफिया पुढे म्हणते की, ‘मला समजले आहे की मला काही लोकांना माफ करण्याची गरज आहे. मला अरमान कोहलीला माफ करावे लागेल. मी त्याला आधीच माफ केले आहे आणि त्या मतावर ठाम राहू इच्छिते. मला त्याच्याविषयी कोणतीही नाराजी नाही. मी माझ्या पूर्वाश्रमीच्या पतीला आणि मला दुखावलेल्या प्रत्येकालाही माफ करते. ते मला माझ्या आयुष्यात नको आहेत. मृत्यूचा जवळून अनुभव घेतल्यानंतर माफ करणे आवश्यक आहे.’ रिअॅलिटी शो ‘बिग बॉस’ सीझन ७ मध्ये सोफिया आणि अरमानची विशेष चर्चा झाली होती.
Source link
MajhiNews Marathi News, Latest Marathi News, Marathi News Paper, Maharashtra Breaking News | मराठी ताज्या बातम्या