MPSC : महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा (800 पदे रिक्त)

mpsc Non-Gazetted Group-B Joint Pre-Examination 2022 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांतर्गत खालील संवर्गातील एकूण ८०० जागांसाठी भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जुलै 2022 आहे.

एकूण जागा : ८००

रिक्त पदांचे नाव आणि पदसंख्या :

1) सहायक कक्ष अधिकारी:- 42 पदे
2) राज्यकर निरीक्षक :-77 पदे
3) पोलीस उपनिरीक्षक:-603 पदे
4) दुय्यम निबंधक/मुद्रांक निरीक्षक:-78 पदे

आवश्यक शैक्षणिक पात्रता :

१ सांविधिक विद्यापीठाची पदवी किंवा तिच्याशी समतुल्य असणारी शासनाने घोषित केलेली इतर कोणतीही तत्सम अर्हता.
२ पदवी परीक्षेस बसलेले उमेदवार प्रस्तुत संयुक्त पूर्व परीक्षेस तात्पुरते पात्र असतील, परंतु संयुक्त पूर्व परीक्षेच्या निकालाआधारे संबंधित संवर्गाकरीता घेण्यात येणा-या मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरणा-या उमेदवारांनी संबंधित संवर्गाच्या मुख्य परीक्षेकरीता अर्ज स्वीकारण्यासाठी विहित केलेल्या अंतिम दिनांकापर्यंत पदवी परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक राहील
३ अंतर्वासिता (Internship) किंवा कार्यशाळेतील कामाचा अनुभव आवश्यक असेल अशा पदवीधारकाने ही अट मुख्य परीक्षेचे अर्ज स्वीकारण्याच्या विहित अंतिम दिनांकापर्यंत पूर्ण केली असली पाहीजे..
४ मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.

शारीरिक मोजमापे/अर्हता :
पोलीस उपनिरीक्षक पदासाठी विकल्प नमूद करणा-या उमेदवारांकडे उपरोक्त अर्हतेसोबत खालीलप्रमाणे किमान शारीरिक अर्हता असणे आवश्यक आहे :

पुरुष :
उंची – १६५ सें मी
छाती न फुगविता : ७९ सें मी
फुगविण्याची क्षमता किमान ५ सें मी

महिला : १५७ सें मी

परीक्षा फी :
अमागास – रु. 394/-
मागासवर्गीय- रु. 294/-

पगार: 38,600-122,800 अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे इतर भत्ते

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख – 25 जून 2022

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 जुलै 2022

अधिकृत वेबसाईट – mpsc.gov.in

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

दरम्यान, महाराष्ट्र दुय्यम सेवा MPSC अराजपत्रित गट-ब संयुक्त परीक्षेत आता ‘दुय्यम निबंधक (श्रेणी 1)/मुद्रांक निरीक्षक, अराजपत्रित गट-ब’ संवर्गाचा समावेश करून आयोगाने सुधारित परीक्षा योजना आपल्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे. या निर्णयामुळे आता PSI-STI-ASO संयुक्त पूर्व परीक्षेत दुय्यम निबंधक (श्रेणी 1)/मुद्रांक निरीक्षक [Sub Registrar ( Grade – 1 ) / Inspector of Stamps] ह्या पदाचा देखील २०२२ च्या परीक्षेपासून समावेश असेल. तेव्हा महाराष्ट्र दुय्यम सेवा गट-ब मधील या ४ पदांसाठी या पुढे संयुक्त पूर्व व स्वतंत्र मुख्य परीक्षा आयोगामार्फत घेतली जाणार आहे.

संवर्ग / पदे :

सहाय्यक कक्ष अधिकारी
फक्त बृहन्मुंबईतील विविध व मंत्रालयीन विभाग व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे कार्यालय

राज्य कर निरीक्षक
राज्य शासनाच्या राज्य कर व विभागाच्या महाराष्ट्रातील कोणत्याही कार्यालयात.

पोलीस उप निरीक्षक
राज्य शासनाच्या पोलीस दलाच्या कोणत्याही कार्यालयात

दुय्यम निबंधक (श्रेणी-१)/ मुद्रांक निरीक्षक
राज्य शासनाच्या नोंदणी व मुद्रांक महाराष्ट्रातील कोठेही.

परीक्षेचे टप्पे :
१ प्रस्तुत चारही संवर्ग / पदावरील भरतीकरीता एकच संयुक्त पूर्व परीक्षा घेण्यात येईल.
२ संयुक्त पूर्व परीक्षेच्या जाहिरातीस अनुसरुन अर्ज करणा-या उमेदवारांकडून ते यांपैकी एक किंवा त्यापेक्षा जास्त संवर्ग पदांसाठी बसू इच्छितात किंवा कसे, याबाबत विकल्प (Option) घेण्यात येईल.
३ संबंधित संवर्ग/पदाकरीता उमेदवाराने दिलेला/ले विकल्प हा/हे संबंधित पद भरतीकरीता अर्ज समजण्यात येईल/येतील.
४ संयुक्त पूर्व परीक्षेस अर्ज करताना दिलेला विकल्प तसेच, भरावयाच्या पदसंख्येच्या आधारे, संबंधित संवर्ग/पदाच्या मुख्य परीक्षेसाठी पात्र करावयाच्या उमेदवारांची संख्या निश्चित करुन, सामाईक पूर्व परीक्षेच्या आधारे चारही संवर्ग/पदांकरीता स्वतंत्र निकाल जाहीर करण्यात येईल.
५ संयुक्त पूर्व परीक्षेच्या निकालाच्या आधारे संबंधित संवर्ग/पदाकरीता घेण्यात येणा-या मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरणा-या उमेदवारांची स्वतंत्र मुख्य परीक्षा घेण्यात येईल.

६ चारही संवर्ग / पदांकरीता मुख्य परीक्षेचा पेपर क्रमांक १ सामाईक असेल व सदर पेपरची परीक्षा एकाच दिवशी एकत्र घेण्यात येईल.
७ मुख्य परीक्षेचा पेपर क्रमांक २ मात्र संबंधित संवर्ग/पदांच्या कर्तव्ये व जबाबदाऱ्या विचारात घेऊन स्वतंत्रपणे घेण्यात येईल. ग्वांगडोंग
८ संबंधित संवर्ग / पदाच्या परीक्षा योजना व अभ्यासक्रमाच्या आधारे पात्र उमेदवारांची मुख्य परीक्षा घेण्यात येईल.
९ मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी उमेदवारांची संख्या विहित मर्यादेत सिमित करण्यासाठी पूर्व परीक्षा घेण्यात येते. पूर्व परीक्षेसाठी आयोगाने विहित केलेल्या किमान सीमारेषा किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळविणा-या उमेदवारांस मुख्य परीक्षेसाठी पात्र समजण्यात येते.
१० पूर्व परीक्षेचे गुण अंतिम निवडीच्या वेळी विचारात घेतले जाणार नाहीत.

या नवीन पदासाठीची वयोमर्यादा आणि शैक्षणिक पात्रता ही : STI व ASO प्रमाणेच असेल.

Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

केंद्रीय विद्यालय पुणे येथे विनापरीक्षा थेट भरती ; असा करा अर्ज

KVS Pune Bharti 2022: KVS पुणे (केंद्रीय विद्यालय – दक्षिणी कमांड पुणे) ने PGT, TGT, …

भारतीय नौदलात 2800 जागांसाठी मेगा भरती ; वेतन 40000 पर्यंत मिळेल

Navy Agniveer Bharti 2022 : भारतीय नौदलात अग्निवीर SSR भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू आहे. अर्ज …