मुंबईत होणार आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीची महत्त्वपूर्ण बैठक, ४०वर्षांनंतर भारताला मिळाले यजमानपद


आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीची १४० वी बैठक मुंबईत होणार आहे. शनिवारी बीजिंगमध्ये झालेल्या १३९ व्या ऑलिम्पिक समितीच्या बैठकीत भारताने पुढील बैठकीचे यजमानपद मिळवले. या काळात कोणत्याही देशाने भारताला विरोध केला नाही. आता २०२३ मध्ये, भारत दुसऱ्यांदा ऑलिम्पिक समितीच्या बैठकीचे यजमानपद भूषवणार आहे, तर ही बैठक प्रथमच मुंबईत होणार आहे.

भारताकडून अभिनव बिंद्रा, नरिंदर बत्रा आणि नीता अंबानी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या १३९ व्या बैठकीत सहभागी झाले होते. ऑलिम्पिकमध्ये एकेरी स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा अभिनव हा भारताचा पहिला खेळाडू आहे. बत्रा भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षा आहेत, तर नीता अंबानी भारतीय ऑलिम्पिक समितीच्या सदस्य आहेत. भारताचे क्रीडा आणि युवा मंत्री अनुराग ठाकूरही या बैठकीला उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांनी मानले नीता अंबानींचे आभार

या बैठकीत महत्त्वपूर्ण कामगिरी केल्याबद्दल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नीता अंबानी यांचे ट्विट करत आभार मानले आहेत. त्यांनी लिहले की, “२०२३ च्या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक कमिटी सेशनचे आयोजन करणे ही मुंबईसाठी केवळ अभिमानाची गोष्ट नाही तर भारताला क्रीडा क्षितिजावर पुढे नेण्याची संधी देखील आहे. २०२३ चे सेशन मुंबई, महाराष्ट्राकडे आणण्याकरता श्रीमती नीता अंबानी यांचे आभार.”

हेही वाचा :  Shiv Jayanti 2022 : “छत्रपतींचा जन्मदिवस म्हणजे आपल्यासाठी तो सण आहे आणि म्हणून तो…” ; राज ठाकरे यांचं विधान!

चार दशकांनंतर भारतात आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे अधिवेशन होणार आहे. शेवटचा कार्यक्रम १९८३ मध्ये झाला होता. सत्रात, आयओसी सदस्य ऑलिम्पिक चार्टर आणि ऑलिम्पिकच्या यजमान शहराची निवड यासारख्या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करतात.

The post मुंबईत होणार आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीची महत्त्वपूर्ण बैठक, ४०वर्षांनंतर भारताला मिळाले यजमानपद appeared first on Loksatta.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

“मराठी कलाकार स्वत: सेटवर हिंदीत बोलतात”, अजय-अतुलच्या जोडीतील अतुलने केली तक्रार

मराठी राजभाषा दिनाच्या निमित्तानं दिलेल्या मुलाखतती अतुलने ही तक्रार केली आहे. दिग्दर्शक नागराज मंजुळे आणि …

Russia – Ukraine War : ठाणे जिल्ह्यातील ३१ विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले

हे सर्व विद्यार्थी वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी युक्रेनमध्ये गेलेले आहेत. ठाणे जिल्ह्यातील विविध शहरांमधील ३१ विद्यार्थी …