Dhaakad Teaser : ‘धाकड’चा टीझर प्रदर्शित, कंगना रनौत पुन्हा अॅक्शन मोडमध्ये

Dhaakad Teaser : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतच्या (Kangana Ranaut) बहुचर्चित ‘धाकड’ (Dhaakad) सिनेमाचा टीझर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. गेले अनेक दिवस प्रेक्षक या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत. हा सिनेमा 20 मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

‘धाकड’चा टीझर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. या टीझरमध्ये कंगना अॅक्शन मोडमध्ये दिसत आहे. सिनेमात प्रेक्षकांना अॅक्शनचा तडका पाहायला मिळणार आहे. रिपोर्टनुसार सिनेमात कंगना सात वेगवेगळ्या लूकमध्ये दिसणार आहे. ‘धाकड’ सिनेमासाठी कंगनाने खूप मेहनत घेतली आहे.

 

 

 

 

 

View this post on Instagram

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by Taran Adarsh (@taranadarsh)



कंगनाचा ‘धाकड’ सिनेमा हिंदीसह तामिळ, तेलुगू आणि मल्याळम भाषेत प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात कंगना रनौत मुख्य भूमिकेत आहे. सिनेमात कंगनाचा वेगळा अवतार पाहायला मिळणार आहे. सिनेमात कंगना  एका डिटेक्टिव्हची भूमिका साकारणार आहे. कंगनाचा हा सिनेमा आधी 27 मे रोजी प्रदर्शित होणार होता. पण आता सिनेमाची रिलीज डेट बदलण्यात आली आहे. 

संबंधित बातम्या

Alia Ranbir Wedding: आलिया-रणबीरनं लग्नाची तारीख पुढे ढकलली? पाहा काय म्हणाला अभिनेत्रीचा भाऊ…

Sonu Nigam On The Kashmir Files : ‘म्हणून मी अजूनही द कश्मीर फाइल्स नाही पाहिला…’; सोनू निगमनं सांगितलं कारण

मार्व्हल स्टूडियोजचा Doctor Strange 2 ‘या’ दिवशी होणार रिलीज; चाहत्यांची उत्सुकता शिगेला



Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.
@majhinews1
Previous BECIL Recruitment 2022: टायपिंग येत असेल तर ही नोकरी तुमच्यासाठीच…
Next डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सर्व शाळांमध्ये विविध कार्यक्रम

Check Also

VIDEO पाहून तुमच्याही अंगात संचारेल; ‘मराठी पोरगी’ने अख्ख्या देशाला लावलंय वेड

मुंबई, 21 सप्टेंबर :  सोशल मीडियावर बरेच व्हिडीओ व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडीओ सध्या …

हार्दिक अक्षयाच्या केळवणाला सुरूवात; लग्न उरकून लगेच बिग बॉसमध्ये एंट्री

मुंबई, 21 सप्टेंबर : तुझ्यात जीव रंगलाची हिट जोडी म्हणजे सगळ्यांच्या लाकड्या पाठक बाई आणि …