MMS खरा की खोटा?
अलिकडेच प्रसिद्ध सोशल मीडिया इंल्फुएंझर अंजली अरोराच्या नावानं एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर आता अक्षरा सिंहच्या MMS व्हिडीओने खळबळ उडवली आहे. या व्हिडीओमुळे अक्षरावर जोरदार टीका केली जात होती. अश्लील कमेंटद्वारे तिला ट्रोल केलं जात होतं. पण आता खुद्द अक्षरानंचं ट्रोलर्सला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. ती म्हणाली, “या व्हिडीओमध्ये दिसणारी मुलगी मी नाही. दुसऱ्या एखाद्या मुलीवर माझा चेहरा एडिट करून हा व्हिडीओ तयार करण्यात आला आहे. कृपया असे प्रकार करणं थांबवा. माझी अधोगती व्हावी यासाठी हा प्रयत्न केला जात आहे. हे प्रकार प्रामुख्याने भोजपूरी सिनेसृष्टीतच केले जातात. कृपया असे व्हिडीओ व्हायरल करू नका.” अशी विनंती अक्षरानं केली आहे. Video: कोळ्यानं केला अजगराचा गेम! गाडीच्या चाकात अडकवून केली शिकार
MMS व्हिडीओमुळे चाहते नाराज
अक्षरा सिंग ही भोजपूरी सिनेसृष्टीतील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. ५० पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये ती झळकली आहे. अभिनयासोबतच ती संगीतसृष्टीतही सक्रिय आहे. भोजपूरीमधील सर्व मोठ्या अभिनेत्यांसोबत तिने काम केलंय. सोशल मीडियावर देखील ५ कोटींपेक्षा अधिक नेटकरी तिला फॉलो करतात. या पार्श्वभूमीवर अक्षराच्या व्हायरल MMS मुळे चाहत्यांमध्ये एकच खळबळ उडाली होती. यापूर्वी देखील अनेक भोजपूरी अभिनेत्रींचे फेक MMS व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. सायबर पोलीस या प्रकरणी चौकशी करत असून लवकरच गुन्हेगारांना पकडलं जाईल असं आश्वासन दिलं आहे.
Source link
MajhiNews Marathi News, Latest Marathi News, Marathi News Paper, Maharashtra Breaking News | मराठी ताज्या बातम्या