Maruti Celerio CNG Vs Hyundai Santro CNG: यापैकी एक गाडी निवडायची आहे? मग ही बातमी वाचा

Maruti Celerio CNG Vs Santro CNG Mileage, Features & Price: बजेट कार खरेदी करण्याकडे भारतीयांचा कल असतो. त्यामुळे स्वस्तात मस्त गाड्या कोणत्या? याबाबत माहिती घेतली जाते. मारुति सुझुकी सेलेरियो सीएनजी आणि ह्युंदाई सँट्रो सीएनजी या गाड्या बजेटमध्ये बसतात. आज आम्ही तुम्हाला या दोन गाड्यांबाबत सांगणार आहोत. त्यामुळे तुम्हाला योग्य गाडीची निवड करणं सोपं होईल. 

Maruti Celerio CNG: मारुती सुझुकीचा दावा आहे की, सेलेरियो सीएनजीवर 35.60 किमी/किलो मायलेज देते. याला 998 सीसी, K10C, 3 सिलेंडर, BS6 इंजिन आहे. हे इंजिन सीएनजीवर 41.7 किलोवॅट 5300 आरपीएम आणि 82.1 एनएम 3400 आरपीएम टॉर्क जनरेट करते. यात 5 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन आहेत. मारुती सेलेरियो सीएनजीला 7-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, स्टीयरिंग माउंटेड कंट्रोल्स, सेंट्रल डोअर लॉक, पॉवर विंडो, इलेक्ट्रिकली अ‍ॅडजस्टेबल ORVM, डे नाईट IRVM, पॉवर-स्टीयरिंग, 60:40 स्प्लिट रीअर सीट्स, दोन एअरबॅग्ज (ड्रायव्हर आणि फ्रंट पॅसेंजर) मिळतात. सीट बेल्ट रिमाइंडर, ABS, स्पीड अलर्ट सिस्टम, रिव्हर्स पार्किंग असिस्ट सेन्सर, 15-इंच अलॉय व्हील, पुश स्टार्ट/स्टॉप बटण यासह अनेक वैशिष्ट्ये उपलब्ध आहेत. मारुती सुझुकी सेलेरियो सॅन्ट्रो पेक्षा महाग असून किंमत 6.69 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे.

Hyundai Santro CNG: ह्युंदाई सँट्रो सीएनजीमध्ये 1.1 लिटर Epsilon MPi, 4 सिलेंडर, 12 वाल्व (BS6) इंजिन आहे. हे इंजिन सीएनजी मोडवर 44 किलोवॅट (60 PS)/5500 आरपीएम पॉवर आणि 85.3 एनएम (8.7किलो)/4500 आरपीएम टॉर्क जनरेट करते. हे 5 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनसह देखील येते. ही गाडी 30.48 किमी/किलो सीएनजी मायलेज देऊ शकते. ह्युंदाई सँट्रो सीएनजीमध्ये मल्टी-फंक्शन स्टीयरिंग व्हील, पॉवर अ‍ॅडजस्टेबल ORVM, 7 इंच टच स्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टम, पॉवर विंडो, दोन एअरबॅग्ज (ड्रायव्हर आणि पॅसेंजर), पॉवर स्टीयरिंग, एअर कंडिशनर आणि सेंट्रल लॉकिंग यांसारखी अनेक वैशिष्ट्ये आहेत. ह्युंदाई सँट्रो सीएनजीची किंमत 6.41 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे.Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Safety Tips: स्मार्टफोनमध्ये Apps डाउनलोड करताना घ्या काळजी, अन्यथा अकाउंट कधी रिकामे झाले कळणारही नाही

नवी दिल्ली: Smartphone Apps: आजकाल काही धोकादायक Apps मुळे स्मार्टफोन युजर्सची सुरक्षा धोक्यात आली आहे. …

Government new policy: स्मार्टफोन आणि लॅपटॉप स्वस्त होणार? सरकार घेणार ‘हा’ मोठा निर्णय

मुंबई: भारतात स्मार्टफोन, लॅपटॉपला, स्मार्टवॉच, फीचर फोन मोठी मागणी आहे. देश विदेशातील अनेक वेगवेगळ्या कंपन्या भारतात आपले …