आलियाला नुकतंच ‘टाइम १०० इम्पॅक्ट’ या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलंय. या दरम्यान दिलेल्या मुलाखतीत तिनं अनेक गोष्टींवर गप्पा मारल्या. अभिनेत्री ते निर्माती या प्रवासाबद्दलही सांगितलं. इतकंच नाही तर तिच्या बॅंक बॅलेन्सबद्दलही तिनं खुलासा केला.
आलियानं तिच्या निर्मिती संस्थेअंतर्गत ‘डार्लिंग्ज’ या चित्रपटाती निर्मिती केली. या चित्रपटात तिनं मुख्य भूमिकाही साकारली होती. या चित्रपटाती निर्मिती तिला करायची होती, मात्र त्यासाठी कर्ज घ्यायचं नाही, हे देखील तिनं ठवललं होतं. त्यामुळं तिनं तिचं मानधन फार कमी घेतलं होतं. असं तिनं मुलाखतीत सांगितलं.
तर बॅंक बॅलेन्सबद्दल विचारलं असता, आलिया म्हणाली की, आजही तिच्या अकाऊंटमध्ये किती पैसे आहेत, हे तिला माहिती नाही. कारण तिचा आर्थिक कारभार आईच्या हातात असतो. लग्न झाल्यानंतरही तिच माझे व्यवहार, बॅंक अकाऊंट्स सांभाळतेय, असं तिनं सांगितलं.
दरम्यान, आलियाच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर आलिया ‘हार्ट ऑफ स्टोन’ या चित्रपटात गॅल गॅडोट आणि जेमी डोर्नन या लोकप्रिय कलाकारांसह दिसणार आहे. या अॅक्शन थ्रिलरची पहिली झलक नुकतीच प्रदर्शित झाली. ‘टुडूम: अ नेटफ्लिक्स ग्लोबल फॅन इव्हेंट’मध्ये हा व्हिडीओ प्रदर्शित करण्यात आला होता. यात आलिया अगदी काही सेकंदांसाठी दिसतेय. ती कमी वेळासाठी त्यात दिसत असली तरीही प्रेक्षकांना आनंदच झालाय.
बॉलिवूडकरही आलियाला तिच्या या यशासाठी शुभेच्छा देत आहेत. तिचे सहकलाकार, प्रतिस्पर्धी अभिनेत्री, कुटुंबीय या सर्वांनी प्रतिक्रिया देत आलियाच्या यशाची वाहवा केली आहे. ‘हार्ट ऑफ स्टोन’ या सिनेमात ती केया ही भूमिका साकारणार आहे. हॉलिवूडमध्ये या सिनेमाची विशेष चर्चा आहे; पण भारतीय प्रेक्षकांनाही त्याबाबत उत्सुकता आहे.
Source link
MajhiNews Marathi News, Latest Marathi News, Marathi News Paper, Maharashtra Breaking News | मराठी ताज्या बातम्या