गौरी सावंतने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये ती सुष्मिता सेन आणि निर्माती आफिफा नाडियादवालासोबत दिसत आहे. गौरीने या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘आम्ही मुळात महिला आहोत… तुम्ही माझे पात्र साकारणार आहात, ही खूप मोठी गोष्ट आहे. माझ्या समाजासाठी हा सर्वोच्च सन्मान आहे. तुझ्या धैर्याला मी सलाम करते.’
हेही वाचा – Bus Bai Bus: ‘अगं किती साधी दिसतेस’; सोनाली कुलकर्णीने सांगितला तो मास्कचा किस्सा
गौरीच्या या पोस्टवर सुष्मिता सेननेही प्रतिक्रिया दिली आहे. सुष्मिताने लिहिले कि , ‘तूच खरी शक्ती गौरी आहेस. तुम्ही आणि तुमच्या समुदायाबद्दल माझ्या मनात प्रेम आणि आदर आहे.’ गौरी यांनी शेअर केलेल्या या पोस्टवर चाहत्यांनी देखील भरभरून प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. चाहते सुष्मिता सेनला या आगळ्यावेगळ्या भूमिकेत पाहण्यासाठी प्रचंड उत्सुक आहेत.
6 ऑक्टोबर रोजी सुष्मिता सेनने ‘ताली’ या वेब सीरिजमधील तिचा लूक शेअर केला होता. यामध्ये यामध्ये अभिनेत्री ट्रान्सजेंडरच्या भूमिकेत पुन्हा एकदा आपलं कलाकौशल्य सिद्ध करताना दिसणार आहे. सुष्मिताने यामध्ये साडी नेसलेली असून, कपाळावर मोठा टिळा लावलेला आहे. दरम्यान सुष्मिता सेन मुख्य भूमिकेत असलेल्या तालीचं पहिलं पोस्टर रिलीज होताच गौरी सावंतनं सांगितलं होतं कि, ”एका हिजड्याची भूमिका विश्व सुंदरी करणार आहे ही आमच्या ट्रान्सजेंडर कम्युनिटीसाठी फार आनंदाची गोष्ट आहे. सुष्मिता सेन या भूमिकेला पुरेपूर न्याय देईल असं मला वाटतं. जर कोणी मोठ्या अभिनेत्यानं माझं काम केलं असतं कर ते फार फनी वाटलं असतं.”
‘ताली’ या मालिकेत सुष्मिता सेनसोबत ‘आर्य’ फेम अंकुर भाटियाही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. गेल्या महिन्याच्या अखेरीस या वेब सीरिजचे शूटिंग सुरू झाले आहे. या मालिकेचे पहिले शेड्युल पुण्यात सुरू आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Source link
MajhiNews Marathi News, Latest Marathi News, Marathi News Paper, Maharashtra Breaking News | मराठी ताज्या बातम्या