Breaking News
  • Aadhar Card मध्ये किती वेळा बदलता येईल नाव, पत्ता आणि DOB? जाणून घ्या सविस्तर…
  • Online Shopping: Amazon- Flipkart ला जोरदार टक्कर, ‘या’ सरकारी वेबसाइटवर सर्वात स्वस्त मिळतायत वस्तू
  • “उद्धव ठाकरेंचा तो गुण, कोणत्याही ठाकरेंकडे नाही….” निवडणूक चिन्ह गोठवल्यानंतर मनसेकडून टिकास्त्र
  • IAS Tina Dabi पेक्षा अधिक सुंदर आहे तिची बॅचमेट; पाहा जबरदस्त फोटो
  • भाजी खरेदी करण्यापूर्वी हे वाचा: ‘या’ महाराष्ट्रीयन भाजीला मिळतोय उच्चांकी दर…!

लखनौत डेब्यू, रांचीत ड्रॉप; एक मॅच खेळून या खेळाडूंना का काढलं? फॅन्सचा सवाल

रांची, 9 ऑक्टोबर: भारत आणि दक्षिण आफ्रिका संघातल्या दुसऱ्या वन डेत टीम इंडियाचा कॅप्टन शिखर धवननं दोन बदल केले. त्यानं टॉसवेळी संघातल्या या बदलांची माहिती दिली आणि त्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या. शिखर धवननं शाहबाज नदीम आणि वॉशिंग्टन सुंदरला संघात जागा दिली. पण त्याऐवजी त्यानं लखनौ वन डेत पदार्पण करणाऱ्या दोन्ही खेळाडूंचा पत्ता कट केला. त्यामुळे केवळ एक मॅचसाठी या दोघांना संधी देऊन बीसीसीआयनं या खेळाडूंवर अन्याय केला असल्याचं चाहत्यांनी म्हटलं आहे.

ऋतुराज-बिश्नोईला विश्रांती

लखनौच्या पहिल्या वन डेत ऋतुराज गायकवाड आणि रवी बिश्नोई या दोन युवा खेळाडूंनी भारताच्या वन डे संघात पदार्पण केलं होतं. गेल्या अनेक दौऱ्यात पदार्पणाच्या सामन्याची वाट पाहणाऱ्या ऋतुराजला लखनौत भारताची वन डे कॅप मिळाली. ऋतुराजनं त्या सामन्यात 19 धावांची खेळी केली. तर रवी बिश्नोईनं गोलंदाजीत 8 ओव्हर्समध्ये 69 धावा मोजून केवळ 1 विकेट काढली होती. पण पदार्पणाचा सामना खेळून पुढच्याच सामन्यात या दोघांनाही ड्रेसिंग रुममध्ये बसावं लागलं आहे.

दरम्यान ऋतुराज गायकवाडनं लिस्ट ए सामन्यांमध्ये दमदार कामगिरी केली आहे. डोमेस्टिक क्रिकेटमध्ये त्याचे आकडे जबरदस्त आहेत. त्यानं लिस्ट ए क्रिकेटमध्ये 66 इनिंगमध्ये 54 च्या सरासरीनं 3355 धावा केल्या आहेत. त्यात 11 शतकं आणि 16 अर्धशतकांचा समावेश आहे. लखनौ वन डेत सलामीचा शुभमन गिल आणि शिखर धवन एकेरी धावसंख्येवरच माघारी परतले होते. पण तरीही ऋतुराजला पदार्पणाच्या सामन्यानंतर पुन्हा ड्रेसिंग रुममध्ये बसावं लागलं.

हेही वाचा – T20 World Cup: रोहित अँड कंपनीसाठी पुढचे 8 दिवस खास, कसं सुरु आहे टीम इंडियाचं प्रॅक्टिस सेशन? Video

चाहत्यांकडून सवाल

टीम इंडियाच्या या निर्णयावर अनेक जणांनी सोशल मीडियात आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. आणि बीसीसीआयवर ताशेरे ओढले आहेत.

शाहबाज अहमदचं पदार्पण

दरम्यान बंगालचा डावखुरा फिरकी गोलंदाज शाहबाज अहमदनं रांची वन डेत भारतीय संघात पदार्पण केलं. भारताकडून वन डे खेळणारा तो आजवरचा 247वा खेळाडू ठरला. त्यानं आतापर्यंत 13 फर्स्ट क्लास मॅचमध्ये 28 तर 21 लीस्ट ए मॅचमध्ये 18 विकेट्स घेतल्या आहेत. टीम इंडियाचा कॅप्टन शिखर धवनकडून त्याला वन डे कॅप देण्यात आली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.



Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.
@majhinews1
Next सीन शूट करताना प्रसिद्ध अभिनेत्रीला स्पर्श करायलाही तयार नव्हते रझा मुराद , कारण दिलं होतं की…

Check Also

MCA अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल करताच संदीप पाटलांविरोधात तक्रार दाखल, हे आहे कारण

मुंबई, 9 ऑक्टोबर: मुंबई क्रिकेट असोसिएशनची त्रैवार्षिक निवडणूक येत्या 20 ऑक्टोबरला होणार आहे. त्यासाठी काल शरद …

‘होय मी 100 टक्के फिट!’ वर्ल्ड कपआधी इंग्लंडच्या कॅप्टननं दिली सर्वांना वॉर्निंग

पर्थ, 9 ऑक्टोबर: टी20 वर्ल्ड कपसाठी इंग्लंडचा संघ ऑस्ट्रेलियात दाखल झाला आहे. सध्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध इंग्लंड टी20 …