माहिती आहे का? ‘आई कुठे…’ मधील देविका खऱ्या आयुष्यात आहे शिक्षिका

मुंबई, 19 जुलै : अभिनेत्री राधिका देशपांडे फक्त एक उत्तम अभिनेत्री नाही तर लेखिका, बालनाट्य दिग्दर्शक आणि राधिका क्रिएशन्सची निर्माती तसेच निवेदिका अशा अनेक पातळीवर काम करते.  सध्या ती या सर्वच क्षेत्रांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात काम करते आहे. राधिका देशपांडे सोशल मीडियावरही प्रचंड ऍक्टिव्ह असते. तिच्या कार्यक्रमांबद्दल महिती ती सोशल मीडियावरून शेअर करत असते. नुकतीच तिने आपल्या एका खास चाहत्यासोबत पोस्ट शेअर केली आहे. त्या पोस्टची सध्या चर्चा होत आहे. राधिकाची ही चाहती कोणी मोठी व्यक्ती नसून एक छोटी मुलगी आहे. या मुलीचं नाव सिद्धीषा असं असून ती राधिकाची विद्यार्थिनी आहे. राधिका तिच्या राधिका क्रिएशन्स या संस्थेतर्फे  बालनाट्य वाचनाच्या ऑनलाइन कार्यशाळा घेते. त्या कार्यशाळेत ही चिमुकली 4 वेळेस सहभागी झाली होती. मूळची औरंगाबाद येथील ही मुलगी असून राधिका एका कार्यक्रमासाठी तिथे गेली असता तिची या चिमुकलीची अचानक भेट झाली. राधिकाने तिच्या इन्स्टाग्रामवरून पोस्ट शेअर करत ही माहिती दिली आहे.

तिने या पोस्टमध्ये लिहिलं आहे की, ‘ही चिमुकली मला छत्रपती संभाजी नगरला भेटली. कार्यक्रम होता तो मोठ्यांचा. ‘दुसरं वादळ’ या पुस्तक प्रकाशनाचा. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ही प्रचंड गर्दीतून वाट काढत माझ्याजवळ आली पण नंतर गर्दीत ती हरवली. घाई घाईत मी व्यासपीठावर चढले. पण मी तिथून तिलाच शोधत होते. ‘ती कोण होती?’ हाच विचार करत होते. कार्यक्रम संपल्यावर परत ‘परी’ सारखी ती माझ्याजवळ आली. तिच्या डोळ्यात पाहिल्यावर मी तिला ओळखलं..ही तर सिध्दीषा!’

हेही वाचा – Amruta Pawar: ‘लग्नासाठी मुलगा बघताना बाबा तुम्ही मला…’; लग्नावेळी अमृताबरोबर असं काय झालं होतं?

राधिका देशपांडेने पुढे सांगितलं आहे की, ती मुलगी तिच्या बालनाट्य वाचनाच्या ऑनलाईन कार्यशाळेत सहभागी झाली होती. त्या मुलीने तिला औरंगाबादला येण्याचं आमंत्रण दिले होतं. पण आज राधिका तिथे येणार म्हटल्यावर ती मुलगी आवर्जून तिला भेटायला आली होती.

राधिका खरंतर या मुलीची शिक्षिका आहे. राधिकाने या पोस्टमध्ये पुढे लिहिलं आहे की, ‘या मुलीला भेट म्हणून मी पर्समधील खारुताई काढून दिली. ही मुलं या देशाचं भविष्य आहेत.  एक शिक्षिका म्हणून माझा खारीचा वाटा मी यांना दिला. मी इश स्तवन करते की, माझ्या सर्व विद्यार्थ्यांना सिद्धी प्राप्त होवो.’ अशा शब्दांत राधिकांने तिच्या या छोट्या विद्यार्थिनी विषयी भावना व्यक्त केल्या आहेत.

अभिनेत्री राधिका देशपांडे ती करत असलेल्या विविध उपक्रमांमुळे बऱ्याचदा चर्चेत असते. मध्यंतरी ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत तिने देविका ही भूमिका साकारली होती.  सध्या ती नाटक, निवेदिका ,लेखिका अशा भूमिका पार पाडताना दिसते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.



Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.
@majhinews1
Previous Eknath Shinde : शिवसेनेच्या 12 खासदारांनी बाळासाहेबांच्या विचारांना साथ दिली : एकनाथ शिंदे
Next IPL 2023 च्या आधी मिनी आयपीएल! मुंबई-CSK सह 6 टीममध्ये T20 चा थरार

Check Also

‘अगंबाई अरेच्चा’तील ती चिमुकली; ‘महाराष्ट्र शाहीर’मध्ये महत्त्वाच्या भूमिकेत

मुंबई, 21 सप्टेंबर : दिग्दर्शक केदार शिंदे यांची मराठी नाटकं असो किंवा सिनेमा.  त्यांचा प्रत्येक …

कतरिना कैफला करायचं होतं Kiss; गुलशन ग्रोव्हर यांनी त्या सीनसाठी २ तास केलेला सराव

मुंबई: अभिनेत्री कतरिना कैफ सध्या इंडस्ट्रीतील टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे. सलमान खान, आमिर खान, शाहरुख …