Maharashtra Job: राज्यात ७५ हजार सरकारी नोकऱ्या

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

‘येत्या वर्षभरात राज्यात ७५ हजार सरकारी नोकऱ्या उपलब्ध करून दिल्या जातील’, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. तर, महाराष्ट्रातून अनेक मोठे प्रकल्प गुजरातला जात असल्याचा मुद्दा राजकीय ऐरणीवर आला असताना, ‘केंद्र सरकारने महाराष्ट्रासाठी दोन लाख कोटींचे प्रकल्प मंजूर केले असून, त्यातून रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होत आहेत’, अशी आकडेवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली

पंतप्रधानांच्या घोषणेनुसार राज्य सरकारने स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात ७५ हजार उमेदवारांना शासकीय नोकऱ्या उपलब्ध करून दिल्या आहेत. यातील कोकण विभागातील पात्र उमेदवारांना राज्यस्तरीय रोजगार मेळाव्याअंतर्गत नियुक्तीपत्र प्रदान करण्याचा कार्यक्रम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवारी येथे झाला. या पहिल्या टप्प्यातील कार्यक्रमात ६०० उमेदवारांना नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे या कार्यक्रमास उपस्थिती लावली. ते म्हणाले, ‘महाराष्ट्र सरकार रोजगार देण्याच्या संकल्पाकडे एका ध्येयाने मार्गक्रमण करीत आहे. केंद्राने महाराष्ट्रासाठी दोन लाख कोटींचे प्रकल्प मंजूर केले आहेत. यातून रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होत आहेत’. ‘महाराष्ट्रात गृह आणि ग्रामविकास विभागात मोठ्या प्रमाणात भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे, ही बाब अभिनंदनीय आहे’, असे मोदी यावेळी म्हणाले.

हेही वाचा :  Government Job: राज्यात १५ विद्यापीठांतील रिक्त पदे भरणार

या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी ७५ हजार सरकारी नोकऱ्या उपलब्ध करून देण्याची घोषणा करताना ‘नवनियुक्त अधिकारी-कर्मचाऱ्यांनी पारदर्शक आणि लोकाभिमुख काम करावे’, असे आवाहन केले. आपल्या भाषणात शिंदे यांनी राज्यातील उद्योग बाहेर गेल्यानंतर विरोधी पक्षाकडून सुरू असलेल्या टीकेचा समाचार घेतला. ‘दोन-तीन प्रकल्प कुठे गेले हे माहिती अधिकार कायद्यातून उघड झाले आहे. प्रकल्प का गेले? कोणामुळे गेले? कधी गेले? हे सगळे तपशीलात समोर येईल. उपमुख्यमंत्र्यांनीही उद्योग का बाहेर गेले हे पुराव्यानिशी मांडले आहे’, असे शिंदे म्हणाले. ‘नगरविकास विभागाच्या १४ हजार कोटींच्या प्रस्तावास केंद्राची मान्यता मिळाली आहे. समृद्धी महामार्गाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होण्याबरोबरच लहान उद्योगांनाही याचा लाभ होईल’, असे ते म्हणाले.
टिम इंडियाचा हॅण्डसम हंक ओपनर KL Rahul कितवी शिकलाय? जाणून घ्या

‘न्यायालयांत जाऊ नका’

‘भरती प्रक्रिया अत्यंत पारदर्शी करण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे. मात्र अनेक आरक्षणे असल्यामुळे ही प्रक्रिया किचकट असते. त्यामुळे कृपया तरुणांनी न्यायालयांत जाऊन भरती प्रक्रिया रद्द करू नये’, असे आवाहन उपमुख्यमंत्री फडणवीस यानी यावेळी केले. ‘नोकरभरती पारदर्शी पद्धतीने व्हावी यासाठी अनेक पदे एमपीएससीला दिली आहेत’, असे ते म्हणाले. ‘मागील सरकारच्या काळात या भरतीत घोटाळे झाल्याने तरुणांच्या मनात शंका निर्माण झाली. मात्र आता टीसीएससारखी उत्तम एजन्सी आणि बँकांची परीक्षा घेणारी केंद्र सरकारची एजन्सी आहे. त्यांच्यामार्फत निवड पद्धतीने नेमणुका होतील. वर्षभरात ७५ हजार परीक्षा आटोपून ही नियुक्ती करायची आहे’, अशी पुस्ती फडणवीस यांनी जोडली.

हेही वाचा :  केंद्रीय लोकसेवा आयोग मार्फत भारतीय वन सेवा पूर्व परिक्षा 2023

‘वेडात मराठे…’मध्ये वीर म्हणून झळकणार सत्या महेश मांजरेकर, कितवी शिकलाय जाणून घ्या

नियुक्तीपत्र मिळालेले उमेदवार…

अमरावती-१०८,

नागपूर-१९१,

औरंगाबाद-२३८,

नाशिक-४५५,

पुणे-३१६.

Police Recruitment: पोलीस भरतीत शेकडो उमेदवारांसाठी शेवटची संधी

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत फायरमन पदांची भरती

Pimpri Chinchwad Municipal Corporation Invites Application From 150 Eligible Candidates For Fireman Posts. Eligible Candidates …

अहमदनगर जिल्हा न्यायालय अंतर्गत सफाईगार पदांची भरती

Ahmednagar District Court  Bharti 2024 – Ahmednagar District Court Invites Application From 02 Eligible Candidates …