4 वर्ष प्रेमात आहे पण 35 पर्यंत लग्न करायचं नाही पण प्रेयसीची विचित्र अट ऐकून पायाखालची जमीन सरकलीये

प्रश्न : मी 32 वर्षांचा अविवाहित पुरूष आहे. मी एका मुलीसोबत चार वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहे. आमचं लव्ह-लाईफ खूपच चांगलं चाललं होतं, पण अचानक एके दिवशी माझ्या गर्लफ्रेंडने माझ्यासमोर लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. डेट करण्यापूर्वी मी तिला सांगितले होते की, मी 35 वर्षांचा झाल्यानंतरच लग्नाचा विचार करेन पण तिने आता लग्न करण्याचा हट्ट वजा तगादाच मागे लावला आहे. मी आर्थिकदृष्ट्या सुद्धा पूर्णपणे स्थिर आहे,

परंतु मानसिकदृष्ट्या मी अद्याप लग्नासाठी पूर्णपणे तयार नाही. मी तिला हरएक प्रकारे माझी बाजू समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मी तिला कुठेच मला तिचा फसवायचा हेतू नाही हे देखील पटवून देण्याचा प्रयत्न केला. पण ती अजिबातच ऐकत नाही आहे आणि मी लग्नासाठी अजिबातच तयार नाहीये. (गोपनीयतेच्या कारणामुळे आम्ही व्यक्तीची ओळख उघड करत नाही.) (फोटो सौजन्य :- iStock)

मी समजवण्याचा प्रयत्न केला

मी समजवण्याचा प्रयत्न केला

मी तिला सर्व प्रकारे समजावले. जेव्हा मी तिला सांगितले की मी काही वर्षांनी लग्न करणार आहे, तेव्हा ती खूप चिडली. तिने मला ताकीद दिली आहे की जर मी तिच्याशी लग्न करण्यास होकार दिला नाही तर ती तिच्या आई वडिलांनी निवडलेल्या कोणत्याही मुलाशी लग्न करेल. माझे तिच्यावर खूप प्रेम आहे. मी तिला गमावू इच्छित नाही. पण सध्या मला तिच्याशी लग्न करायचे नाही. मला अजूनही या नात्यात येण्यासाठी थोडा वेळ हवा आहे. तिला कसे समजावायचे ते मला सांगा जेणेकरून आमचे नाते टिकेल.

हेही वाचा :  ऋतिक रोशनच्या बायकोच्या डीपनेक मिनी फ्रॉकमध्ये किलर अदा, ऐन गरमीत इंटरनेटचा पारा वर

(वाचा :- अस्से लग्न अवघडच बाई! लग्न करून फसलो असे वाटणा-या प्रत्येकास माहितच हव्या या गोष्टी,घटस्फोटाची वेळच येणार नाही)​

जाणकारांचे उत्तर

जाणकारांचे उत्तर

फोर्टिस हेल्थकेअरच्या मानसिक आरोग्य आणि वर्तणूक विज्ञान विभागाच्या प्रमुख कामना छिब्बर म्हणतात की, बरेच लोक बदल सहजासहजी स्वीकारत नाहीत. तुम्ही देखील त्यापैकीच एक आहात. पण जेव्हा तुम्ही एखाद्याला डेट करत असता तेव्हा त्यांच्या विचारांना आणि भावनांना सामावून घेणंही आवश्यक असतं. तुम्ही गेल्या चार वर्षांपासून एका मुलीसोबत रिलेशनशिपमध्ये आहात असे सांगितले, त्यामुळे तिने आपली इच्छा बोलून दाखवणे यात काही वावगे नाही.
(वाचा :- त्या मुलीच्या भूतकाळाची काळी बाजू माहीत असूनही मी तिला प्रपोज करण्याचं धाडस केलं, पण पुढे जे झालं ते धक्कादायक)​

तुम्ही काही पाऊले मागे या

तुम्ही काही पाऊले मागे या

तुमच्या मैत्रिणीच्या बोलण्यातून हे स्पष्ट होते की ती हे नाते पुढे नेण्यासाठी ती पूर्णपणे तयार आहे. कारण ती या नात्यासाठी आपले 100% देत आहे. अशा स्थितीत मी तुम्हाला म्हणेन की तुम्ही दोघांनीही परस्पर समन्वयाने नात्यात पुढे जाण्याची गरज आहे. याचा अर्थ असा आहे की तुम्ही एक जे वय ठरवले आहे की त्या नंतरच लग्न करणार ती वयाची मर्यादा कमी करून काही पाऊले मागे या. यातून तुम्ही सुद्धा लग्नासाठी तयार आहात हे तिला कळेल आणि ती तुम्हाला तेवढा कमी केलेला वेळ नक्कीच देईल.

हेही वाचा :  लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये शोषण होतंय, वेळीच पडा बाहेर पाहू नका अंत!

(वाचा :- प्रेमात केलेली ‘ही’ एक चूक येऊ शकते चांगलीच अंगलट, ढसाढसा रडल्यानंतरही पार्टनर करणार नाही भावनांचा आदर व किंमत)​

तिला समजावून सांगा

तिला समजावून सांगा

याशिवाय तुम्ही स्वतःला एक प्रश्न विचारा की लग्नासाठी मानसिक तयारी हवी म्हणजे नेमके काय?हा प्रश्न स्वत:ला विचार कारण जेव्हा तुम्हाला याचे उत्तर सापडेल तेव्हा तुम्ही त्यंच्या गर्लफ्रेंडला त्याबाबत नीट अम्जावून सांगू शकाल. पण तुम्हाला उत्तर देता आले नाही तर तिच्या मनात संशय निर्माण होणे साहजिक आहे. पण जर तुम्ही नीट समजावण्यात यशस्वी ठरलात तर ती देखील नक्कीच काही पाउले मागे येईल आणि तुमच्यातला हा वाद संपेल. तुम्हाला तिला केवळ एवढेच आश्वासन द्यायचे आहे की तुम्ही तिला फसवत नाही आहात.
(वाचा :- ‘मी दिया मिर्झा शपथ घेते’ ओठांवर ओठ टेकून प्रेम व्यक्त करत मराठमोळ्या शब्दांत पतीचा स्वीकार,चाहत्यांकडून कौतुक)​

मुलींना भीती वाटणे साहजिक आहे

मुलींना भीती वाटणे साहजिक आहे

एखादी मुलही तुमच्या सोबत 4 वर्षे रिलेशनशिप मध्ये राहते म्हणजे तिची लग्नाची अपेक्षा असणे साहजिक आहे. ती सुद्धा लग्न करायचं म्हणूनच एवढे वर्षे सोबत असते. आपल्या समाजात मुलींची लवकर लग्न व्हावीत असा हट्ट असतो आणि त्यामुळे मुलींवर खूप प्रेशर असतं. अशावेळी त्यांना वाटत असतं की ज्या मुलावर आपण प्रेम केलं आहे त्याच्याशीच आपलं लग्न व्हावं. त्यामुळे त्यांची बाजू सम्जून घेणे सुद्धा महत्त्वाचे आहे.

हेही वाचा :  लग्न नको स्वातंत्र्य हवंय... ४१ वर्षीय व्यक्तीने सांगितली लग्न न करण्याची भन्नाट कारणे, स्टोरी वाचून हडबडून जाल

(वाचा :- सावधान..! ही 3 लोकं दुस-याचा पार्टनर हिरावून घेण्यात असतात माहीर, मित्र-मैत्रीण बनून उद्धवस्त करतात सुखी संसार)​

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

मुंबईकरांचा प्रवास आता आरामदायी होणार; रेल्वेमंत्र्यांनी लोकलसंदर्भात दिल्या महत्त्वाच्या सूचना

Mumbai Local Train Update: मुंबई लोकलही मुंबईकरांची लाइफलाइन आहे. लाखो लोक  लोकलमधून प्रवास करतात. दिवसेंदिवस …

‘वर्ल्ड कप जल्लोषाच्या नावाखाली रेव्ह पार्टी’, ठाण्यात चाललंय काय? जितेंद्र आव्हाडांचा धक्कादायक आरोप

Rave party in Thane : पुण्यातील फर्ग्युसन रस्त्यावरील एल थ्री बार मध्ये झालेल्या ड्रग्ज पार्टीप्रकरणात …